...तुटे वजनाचा काटा !

Submitted by मानस६ on 28 March, 2009 - 00:20

आठवण तुझी येता,
फुले अंगावर काटा,
असे मी नाही म्हणत,
म्हणे वजनाचा काटा !

तुझ्या देहाच्या ह्या सीमा,
आठी दिशांना फैलती,
म्हणुनीच सारे तुला,
’अष्टफैलू’ गं म्हणती !

पहा अजस्त्र केव्हढा,
तुझा देह बलडंड,
आता बाहू म्हणू ह्यांना,
की भीमाचे गं हे दंड !

जेव्हा पाऊल टाकीशी,
दणदणते धरणी,
देवा काय वर्णावी ही,
तुझी ’अगाध’ करणी !

काल हॉटेलात गेली,
तेव्हा मालक बोलला,
आधी डिपॉझीट ठेवा,
मग ऑर्डरचं बोला !

जेव्ह जाते शिंप्याकडे,
द्याया कपड्याचे माप,
शिंपी पुटपुटे मनी,
अ ब ब ब, बाप बाप !

केली घोडेस्वारी हिने,
कमी करण्या वजन,
हिच्याऐवजी हो झाले,
कमी घोड्याचे वजन !

ऑटोरिक्शावाले हिला,
बघुनीच सुसांटती,
संपेस्तोवर पेट्रोल,
गाडी बेफाम हाणिती !

म्हणे जाऊनी वैद्याला,
झाली भूक कमी फार,
न्याहारीला फक्त घेते,
दुध लिटर मी चार !

येतो थकवा हो फार,
’भारी’ पडतात कष्ट,
आता घ्यावीशी वाटते,
मला थोडी बेड-रेस्ट !

’नको नको’ म्हणे वैद्य,
उगा बेडला का कष्ट?
द्यावी लागेल बेडला
कायमची ’बेड-रेस्ट’ !

-मानस६

गुलमोहर: 

ही ही ही Happy
मस्तच Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अरे, काहीच्या काही कविता विभागत टाक Happy

हाहाहा.... Lol Lol Lol
.................................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

ऑटोरिक्शावाले हिला,
बघुनीच सुसांटती,
संपेस्तोवर पेट्रोल,
गाडी बेफाम हाणिती !

मला वाटले-
संपे पेट्रोल म्हणूनी
पंपावर धावती

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

हा! हा! हा! हा!!!!! Biggrin Rofl

मथळा वाचून मला 'फिटे अंधाराचे जाळे' या गीताचे विडंबन असावे असे वाटले होते.

शरद