आठवण तुझी येता,
फुले अंगावर काटा,
असे मी नाही म्हणत,
म्हणे वजनाचा काटा !
तुझ्या देहाच्या ह्या सीमा,
आठी दिशांना फैलती,
म्हणुनीच सारे तुला,
’अष्टफैलू’ गं म्हणती !
पहा अजस्त्र केव्हढा,
तुझा देह बलडंड,
आता बाहू म्हणू ह्यांना,
की भीमाचे गं हे दंड !
जेव्हा पाऊल टाकीशी,
दणदणते धरणी,
देवा काय वर्णावी ही,
तुझी ’अगाध’ करणी !
काल हॉटेलात गेली,
तेव्हा मालक बोलला,
आधी डिपॉझीट ठेवा,
मग ऑर्डरचं बोला !
जेव्ह जाते शिंप्याकडे,
द्याया कपड्याचे माप,
शिंपी पुटपुटे मनी,
अ ब ब ब, बाप बाप !
केली घोडेस्वारी हिने,
कमी करण्या वजन,
हिच्याऐवजी हो झाले,
कमी घोड्याचे वजन !
ऑटोरिक्शावाले हिला,
बघुनीच सुसांटती,
संपेस्तोवर पेट्रोल,
गाडी बेफाम हाणिती !
म्हणे जाऊनी वैद्याला,
झाली भूक कमी फार,
न्याहारीला फक्त घेते,
दुध लिटर मी चार !
येतो थकवा हो फार,
’भारी’ पडतात कष्ट,
आता घ्यावीशी वाटते,
मला थोडी बेड-रेस्ट !
’नको नको’ म्हणे वैद्य,
उगा बेडला का कष्ट?
द्यावी लागेल बेडला
कायमची ’बेड-रेस्ट’ !
-मानस६
ही ही ही
ही ही ही

मस्तच
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
उत्तम!!!
उत्तम!!!
अरे,
अरे, काहीच्या काही कविता विभागत टाक
हाहाहा....
हाहाहा....



.................................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा...
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो....
ऑटोरिक्शा
ऑटोरिक्शावाले हिला,
बघुनीच सुसांटती,
संपेस्तोवर पेट्रोल,
गाडी बेफाम हाणिती !
मला वाटले-
संपे पेट्रोल म्हणूनी
पंपावर धावती
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
(No subject)
आत्ता पाहिली
आत्ता पाहिली

मस्त आहे, मजा आली
मस्त आहे, मजा आली
हे हे..
हे हे..:D
(No subject)
हा हा हा हा .....
हा हा हा हा .....
खुप छान आहे..
खुप छान आहे..
हा! हा! हा! हा!!!!! मथळा
हा! हा! हा! हा!!!!!

मथळा वाचून मला 'फिटे अंधाराचे जाळे' या गीताचे विडंबन असावे असे वाटले होते.
शरद
टू मच..
टू मच..
(No subject)
(No subject)
छान विनोदी कविता .
छान विनोदी कविता .
छान!
छान!
(No subject)
फार आवडली.
फार आवडली.