लहानपणी वाचलेले पुस्तक

Submitted by पल्वली on 25 October, 2018 - 02:28

नमस्कार मंडळी,

मी एका पुस्तकाच्या शोधात आहे. माझ्या एका काकांनी त्यांची मुले वाचत नाहीत म्हणून त्यांच्या कडची पुस्तकांची पेटी मला आणून दिली होती. माझ्या आयष्यातील सर्वात मोठा खजिना मला मिळाला असं मला पुढे अनेक वर्ष वाटत राहिलं Happy दरवर्षी मी महिन्याच्या सुट्टीत रोज एक ह्या रेट ने मी ती सगळी पुस्तके वाचून काढत असे. तर त्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक दुर्गा भागवतांनी लिहिलेलं होतं , त्यांच्या लहानपणाविषयी . मला त्या पुस्तकाचे नाव काही केल्या आठवत नाहीये. फार काही तुरळक संदर्भ आठवतायत. त्यातले एक दोन प्रसंग , पहिला ज्यात त्यांचा नोकर त्यांना एक गाणे म्हणून दाखवतो, 'शुभमंगल सावधान, नवरा नवरीचा गेला प्राण'. आणि दुसरा म्हणजे त्या मुलींच्या मागे एक घार लागते आणि ती त्यांच्यावर डूख धरते.

मायबोलीच्या तळ्यात मी हा एक खडा टाकते आहे! खात्री आहे कि कोणी ना कोणी हे पुस्तक वाचला असेल आणि त्यांना त्याचे नाव आठवेल!
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users