गाण्याचे शब्द हवे आहेत...

Submitted by प्रिया on 27 March, 2009 - 16:15

एखाद्या मराठी गाण्याचे शब्द हवे आहेत? प्रथम मराठी गाणी माहिती आगार (Database) इथे ते गाणे आहे का शोधा. तिथे नसेल तर इथे त्या गाण्याची जितकी माहिती तुमच्याजवळ असेल तेवढी लिहा, जेणेकरुन गाणे शोधून लिहीणार्‍याला थोडी मदत होईल. मात्र इथे कृपया गाणे ध्वनी स्वरुपात मागू नये. मिळतील तसे गाण्याचे शब्दच फक्त आगारात लिहीले जातील. लिहीणारे सगळेच हौशे/ नवशे असल्याने थोडा विलंब झाला तर समजून घ्यावे ही विनंती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे एका गाण्याचे शब्द आहेत ....
"हसलीस एकदा भिजल्या शारदं राती
बहरली फुलांनी निशीगंधा........"
हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे. आणि या गाण्याची चाल मला कुठं मिळेल...

हे चित्रपटगीत नाही..भूपेंद्र यांनी गाइले आहे..कवी बहुधा शांताराम नांदगावकर
विविधभारतीवर वाजते कधीमधी

खालील गाण्याचें शब्द हवें आहेत.
१) यमुना जळीं खेळे खेळ कन्ह्या कां?
२)नको रें कृष्णा रंग टाकू साडी भीजत
३) रुसली ही राधा कान्हा तुझ्या वीना
४) नको अडवु कान्हा मजला जाउन दे पाण्याला
कुमार

मम मनी कृष्ण सखा .. ह्या गाण्यात शिशुपाल ... इथे शिशुपाल नंतरच्या ओळी काय आहेत?
काही केल्या कळलं नाही मला Sad

मम मनी कृष्ण सखा रमला
मम मनी कृष्ण सखा रमला
नच रणी आप्तवधा सजला ।। धृ ।।
नवल नाही, नच दृश्य इतरा झाला
दहन झाले शिशुपाल समजे भोळा

हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती

लेऊन शुभ्रतर किरणांचे फुलपंख
चरणातून पेरीत प्रीतपैंजणे लाख
उधळीत अशी तू आलीस भाव कसा ती?
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती

तू हसून बोललीस होऊन लज्जित थोडी
उलगडली नयनी तुझ्या गुलाबी कोडी
नजरेतून गळती प्रणयधुंद बरसाती
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती

हे युगायुगांचे प्रीतीचे अनुबंध
तेजातून उधळीत ह्रदयातील आनंद
येईल निशेच्या दारी सौख्य प्रभाती
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती

---------------------------
('सांगू कसे मनी जे दाटले', या सुंदर गाण्याला आपल्या मनात पोचवणार्‍या गायक श्रीकांत पारगावकरांनाही दाद द्यायला विसरू नका रे मित्रांनो)

भरत, मनापासून धन्यवाद.
मला 'अर्थ' च ऐकू यायचे. पण मैत्रिणी म्हणाल्या की तो शब्द 'लेख' आहे.म्हणून मनात गोंधळ होता. तो आता गेला.

नितीन हे पहा.
http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/1257.html

अपर्णा मयेकर यांनी गायिलेले 'तुझे हसणे' हे सुरुवातीचेह शब्द असलेले गीत आहे...बहुधा ती मुक्तछंदातली एक कविता आहे...त्याचे शब्द कुणाला माहीत आहेत का?

नमस्कार!
मला एक जुणे गाणे हवे आहे!
मी नेट वर सगळीकडे शोधले पण सापडले नाही!
मला त्या गाण्याची फक्त एक ओळ आठवत आहे ती अशी -
तुझ्या चंद्र शाळेत नेशील का................

क्रुपया करुन कोणाकडे असल्या द्यावे ही विनंती!

मला गजानन वाटवे यांच "आई मला आकाशीचा चंद्र हवा ग" हे गाण हव आहे कुणाला माहीती असल्यास प्लीज पोस्ट कराल?

पूनश्य विचारणा...!

कोणी मला या गाण्या विषयी अधिक माहिती देऊ शकाल का?

आषाढ घन सुन्दरा | आषाढ घन सुन्दरा |
अन्बरा .. मी प्रणयीनी अधिरा धरा |
आषाढ घन सुन्दरा |

मला पण एका गाण्याचे शब्द हवे आहेत----- सुवर्ण रथ दिव्य तो रवीचा सप्त अश्व गतिमान, उधळी गुलाल धूलिका अरुण सारथि महान,...................रामराज्य सिनेमातील हे गीत मला पूर्ण हवे आहे.कुणाला येत असेल तर क्रुपया पाठ्वावे.

कालच्या खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमाच्या शेवटी रविंद्र साठे यांनी एका गाण्याच्या काही ओळी म्हटल्या. त्या कोणाच्या (गीतकार) आहेत ? आणि पुर्ण गाणे/ कविता कुठे मिळु शकेल?

आमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात रहाणे,
लाथा खाणार्‍याहुन लाथा देणारेच शहाणे,
जाता जाता एक बात पण मनात घट्ट धरावी...
लाथा खाता आपणही एखादी ठेवुन द्यावी
पाहिलेत जे इथे तुम्ही ते, इथेच विसरुन जाणे.

खुपते तिथे गुप्ते ... १० व्या मिनिटानंतर

'संन्यस्थखड्ग' या नाटकातील 'सुकातातची जगी या' या पदाचे शब्द हवे आहेत. गूगल वर एकही सर्च रिझल्ट येत नाही! Sad

धन्स!

<आमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात रहाणे,
लाथा खाणार्‍याहुन लाथा देणारेच शहाणे,
जाता जाता एक बात पण मनात घट्ट धरावी...
लाथा खाता आपणही एखादी ठेवुन द्यावी
पाहिलेत जे इथे तुम्ही ते, इथेच विसरुन जाणे.
<> कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे का?

नम्स्कार,
मला एका गाण्याचे शब्द हवे आहेत. मला महित असलेल्या ओळी
" कुजबूज कुजबुज कुजबुज रे चन्दनाच्या झाडाखाली रान का वाजे
चन्दनाच्या झाडाखाली आल्या सावल्या दिवसाच्या उन्हान त्या होत्या कावल्या"

मला "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया" या गाण्याचे शब्द हवे आहेत, क्रुपया मला लिMक सुचवा.

एका गाण्याचे शब्द हवे आहेत.
मराठी असे आमुची मायबोली
जरी ----------- नसे
--- या ठिकाणी काय आहे?

कृपया मार्गदर्शन करावे.

Pages