No Pun Intended :- Part 2

Submitted by अतरंगी on 15 October, 2018 - 01:05

No Pun Intended च्या पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर आम्ही वाचकांसमोर भाग २ सादर करत आहोत. Happy
ज्या नविन मायबोलीकरांना या विषयी कल्पना नाही त्यांनी ईथे क्लिक करा

अगदी थोडक्यात सांगायचं तर हा माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम आहे....
( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)

जावई विकत घेणे आहे:- आदितीची आई

मांजर माझी लाडकी:-उपाशी बोका

चोरांची वस्ती:- अलिबाबा

काय घडतंय मुस्लिम जगात ? :-अल्ला

अनादी मी अनंत मी:- अव्यक्त मी

खरंच हे शक्य आहे ? :- अशक्यकुमार

शरीरात आत्मा असतो का ?:- अश्वत्थामा

सिनेतारकांच्या सौंदर्यावर कमेंट करणे योग्य आहे का ? :- आंबट शौकीन

मी तुझ्या दारात होतो:- आउट डोअर्स

आलो इथे कशाला माझे मला कळेना... :-आगंतुक

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता ?:- आचार्य

नेतागिरी एक बिनभांडवली धंदा: माझा उद्योग:- आमदार

ब्रिटिशराज आणि नुकसान भरपाई:- एलिझबेथ

क्रिकेट- एक गंभीर व्यसन:- कपिल

युद्धस्य कथा रम्य: :- कर्नल

महाभारत भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?:- कर्ण

मला काहीच सुचत नाही:- कल्पना

तुला कशी कळणार कविता ?:- कवी

कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग:-काजवा

मोहम्मद रफी- विसरलेले सोनेरी पान:- किशोरदा

मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी. :- कोकणस्थ

स्वतःचा शोध कधी घेतला आहे का ? :- गूगल

मधुमेही लोकांसाठी नाश्ता (सकाळचा, संध्याकाळचा):- जिलेबि

२४ खून माफ.....!!!:- जॅक द रिपर

शिक्षण आणि मूल्य माझे मनोगत:-

मुलाचा अभ्यास कसा घ्यावा:- शिक्षण

कायदेशीर सल्ला /मदत मिळेल का ?:- न्यायाधीश

पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी:- पेट्रोल पंप

पुण्यात फ्रेश पदवी धारकांनी नोकरी कशी शोधावी? :- बेकार तरुण

आज कुणी का राम व्हावे?:- भरत

विचाराचा विचार:- विचारवंत

दगडात देव आहे का?, :- विज्ञानवादी

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते? :- लिंबू मिरची

पैसे कुठे इन्व्हेस्ट करू?:- लक्ष्मी

तशी माझी सासू फार गोड आहे. :- जावई

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचित्र चाळे करावे वाटतात का? : अतरंगी>>>>>>>

असा धागा आहे का? नसेल तर हा फाऊल आहे Happy

आयडी आणि धागा दोन्ही अस्तित्वात असायला हवा.

सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन : - इंग्रजी माध्यमाचा मुलगा.

(हा आयडी खरच आहे).

पेट्रोल का भाव खातय? :- पेट्रोल पंप

अत्यन्त महत्वाचे:- अवांतर

जोक कसा मारायचा:- अस्सल पुणेरी

शीतपेय आणि आपले आरोग्य : मिरींडा
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? : मनिम्याऊ

जावई हा ठग:- आदितीची आई

सध्याचं राजकारण: केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठीच..:- आमदार

हॉटेल चालवणे 'खायचे काम' नाही...:- इडलीवाला

मांजराने चाटली दुधाची वाटी:- उपाशी बोका

Pages