अंधार (शतशब्दकथा)

Submitted by सेन्साय on 12 October, 2018 - 11:48

"एक शब्द नाही हां बोलायचास तू ह्यापुढे .... तुझी नं लायकीच नाही माझ्यावर प्रेम करायची Sad तुला काय कळणार रे खऱ्या प्रेमाची किंमत Angry कायम पैशात प्रत्येक गोष्ट मोजणारा तू ! तुला कधी माझ्या भावना कळल्याच नाहीत कारे ! असा आपल्या साखरपुड्याच्या तारखेलाच अचानक नाहीसा का झालास. तुला तुझी ती बिझनेस डील जास्त महत्वाची वाटली असेल नं ... आपल्या नात्यापेक्षा Sad आणि आज अचानक सहा महिन्यानी उगवतोयस.. तेही फोनवर !

असो ... आता मी येथेच थांबायचा निर्णय घेतलाय ... मला माझ्या आयुष्याची अजून फरफट नकोय ! गुडबाय .. "

एवढे बोलून समीक्षाने रिसिव्हर जोरात आपटला. आणि पलीकडे ह्या अनपेक्षित फायरिंगमुळे कुंदन हताश होवून आपल्या व्हीलचेअरला धक्का देत आतल्या खोलीत निघुन गेला...अंधाराकड़े !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

सर्व प्रतिसाददात्यांचे अर्थात मायबोली कुटुंबातील हितचिंतक आप्तांचे मनःपूर्वक आभार __/\__
खरे तर ही शशक म्हणून जन्मायच्या आधी मनातील वादळ शांत करण्यासाठी डायरीत उतरलेली साधारण पाच पानी लघुकथा होती. पण त्या सहा महिन्यातील अगतिकता आणि भावनिक फरफट कागदावर उतरली तेव्हा इतिहास उगाळता निव्वळ दुःख पदरात पड़ते हेच पुनः एकदा अनुभवले म्हणून मला ते सर्व पोस्ट करणे इष्ट वाटले नाही. ह्या सर्व गोष्टीत मी कोणाला दोष देत नाही ... ना त्या मुलीला ... ना परिस्थितीला !

जे काही झालं ते प्रारब्धभोग समजून मी ह्या सर्वातून बाहेर पडलो होतो. पण काळ हेच औषध म्हणता म्हणता अवचित प्रसंगी ते कडु किंवा झोंबणारेही असतेच तसे काहीसे परवा घडले. अन् जसे आधीच्या प्रतिसादात म्हटले होते की शारीरिक फिटनेस तर वर्षात पूर्ववत झाला ... अगदी माझे मार्शल आर्ट्सचे क्लासेसही पुन्हा सुरु झाले पण मनातल्या जख्मा अश्वत्थामा बनतील हे माहीत नव्हते. ह्यासगळ्यात मला कधीच कोणाची सिंपथी अपेक्षित नव्हती किंवा कोणी कोणाला दोषी मानत पिंजऱ्यात उभे करणे हेही नकोच आहे. पण जसे आधी म्हटले तसे मायबोली एक कुटुंब आहे म्हणून मला ईथे व्यक्त व्हावेसे वाटले. बस्स इतकेच !

अगदी साखरपुड्याच्या दिवशी नवरा मुलगा गायब होतो आणि मुलीला / मुलीकडच्यांना त्याच्याबद्दल काहीही कळत नाही. किंवा लोक कळवत नाहीत?
लग्नाचं / सापुचं फक्त दोघांचच ठरलं होतं का? नातेवाईक कुणी इन्वॉल्व नव्हते का?
अगदीच फिल्मी आहे स्टोरी.

जे काही घडले असेल , सोडून पुढे चालू लागलात याने बरे वाटले.
भावनिक नुकसान पूर्णपणे भरुन निघत नाही, पण आयुष्य नव्याने जगा ह्याच शुभेच्छा Happy

> लग्नाचं / सापुचं फक्त दोघांचच ठरलं होतं का? नातेवाईक कुणी इन्वॉल्व नव्हते का? > दोघांचच रजिस्टर लग्नाच ठरलं होतं. दोन्ही घरच्यांचा विरोध होता किंवा त्यांना माहीत नव्हतं. मुलगी रजिस्टर हापिसात तिच्या जवळच्या दोन विश्वासु व्यक्तींसह वाट बघत बसली आणि बाहेरगावाहून येणारा नवरामुलगा ऐनवेळी उगवलाच नाही.
∆ असा बदल कथेत केला तर ठीक राहील.

अंबज्ञ Rofl

मला काही रुचले नाही तुमचे स्पष्टीकरण, तरी असुदे बापुडे. तुमची कथा, त्यावरचे तुमचे प्रतिसाद, स्पष्टीकरण पाहता एकच नमुद करु ईच्छितो कि जमल्यास मानसोपचार करुन घ्या. तुम्हाला त्याची नितांत गरज आहे असे जाणवितेय.

get well soon Happy

दोघांचच रजिस्टर लग्नाच ठरलं होतं. दोन्ही घरच्यांचा विरोध होता किंवा त्यांना माहीत नव्हतं. मुलगी रजिस्टर हापिसात तिच्या जवळच्या दोन विश्वासु व्यक्तींसह वाट बघत बसली आणि बाहेरगावाहून येणारा नवरामुलगा ऐनवेळी उगवलाच नाही. >>> टिपीकल मुवी, तरी हे सुद्दा चालले असते हे असले काही लिहीण्यापेक्शा. लोकांना मुर्ख समजतो xxx

अ‍ॅमी, जरी तुम्ही लिहिल्याप्रमाणे बदल केला तरी कथा पटणेबल नाहीचे.
सापु परयंत रीलेशनशिप येते तेव्हा एकमेकांबद्दल बरीच माहिती असते. घर कुठे आहे? नातेवाईक कोण आहेत? मित्रमैत्रीणी? शाळा - कॉलेज? नोकरी? वैगेरे तरी माहितच असते.
सापुच्याच दिवशी अपघात झाला (हे एक फिल्मीच) आणि मग मुलाकडुन काहीच कॉन्टॅक्ट होउ शकला नाही (हे दुसरं Happy ) हे एकवेळ ठीक.
पण मुलीनेही कॉन्टॅक्ट करण्याचा/ शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही का?
अगदीच अशक्य कोटीतले योगायोग आहेत. बॉलीवुडी योगायोग Happy

Submitted by Mmmmm on 16 October, 2018 - 14:45 >>> बाकी सगळ ठिक आहे. पण ते तीन क्रॊस कसले????

कथा चांगली आहे.
शारीरिक फिटनेस तर वर्षात पूर्ववत झाला ... अगदी माझे मार्शल आर्ट्सचे क्लासेसही पुन्हा सुरु झाले > मस्त ! शारीरिक असो वा मानसिक - जखमा बर्‍या होणारच ; कदाचित वेळ लागेल आणि त्याबरोबर अनुभवा सोबत आलेली शहाणपणाची शिदोरी पुढील प्रसंगी जखमी होऊ देणार नाही असा विश्वास बाळगा.

कदाचित त्यांच्या सोबत थोडं वेगळ घडलं असेल पण थिम सारखी असेल.. त्यांना काही संदर्भ द्यायचे नसतील म्हणून असं लिहिलं असेल..

> सापु परयंत रीलेशनशिप येते तेव्हा एकमेकांबद्दल बरीच माहिती असते. घर कुठे आहे? नातेवाईक कोण आहेत? मित्रमैत्रीणी? शाळा - कॉलेज? नोकरी? वैगेरे तरी माहितच असते. > माहित असणे 'अपेक्षित' असते. झाली असेल माहितीची देवाणघेवाण. पण ती माहिती खरीच आहे याची खात्री करून घेतली नसेल डिटेक्टीवकडून. सांगणार्यावर विश्वास ठेवला असेल.
आंतरजालावरून सुरु झालेल्या प्रेमप्रकरणात हे होऊ शकतं.
किंवा जब वी मेट मधल्या करिनाचे असते तसे प्रेमप्रकरण.
सगळी लग्नं दहावी-बारावी-ग्रॅज्युएशनच्या अटेस्टेड झेरॉक्स, गेल्या तीन महिन्याच्या पगार पावत्या, गेल्या तीन वर्षांचे आयटी रिटर्न, आतापर्यंतचे कामाचे अनुभवचे पत्र, व्हॅलीड अडड्रेस प्रुफ, पॅन नम्बर, आधार नम्बर मागून घेऊन मग ठरत नसतील असे वाटते Wink

===
> पण मुलीनेही कॉन्टॅक्ट करण्याचा/ शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही का? > केला असेल प्रयत्न. मोबाईल नम्बर लागत नसेल. हापिसला लावला तर ते कधीच सोडलं सांगितलं असेल. घरच्यांचा फोन, पत्ता नसेल तिच्याकडे.

===
> अगदीच अशक्य कोटीतले योगायोग आहेत. बॉलीवुडी योगायोग Happy > Real life can be more dramatic than reel life Lol

अ‍ॅमी, धन्यवाद Happy
<<<<<<<<<सगळी लग्नं दहावी-बारावी-ग्रॅज्युएशनच्या अटेस्टेड झेरॉक्स, गेल्या तीन महिन्याच्या पगार पावत्या, गेल्या तीन वर्षांचे आयटी रिटर्न, आतापर्यंतचे कामाचे अनुभवचे पत्र, व्हॅलीड अडड्रेस प्रुफ, पॅन नम्बर, आधार नम्बर मागून घेऊन मग ठरत नसतील असे वाटते>>>>>>>>> हे भारीच.

कदाचित त्यांच्या सोबत थोडं वेगळ घडलं असेल पण थिम सारखी असेल.. त्यांना काही संदर्भ द्यायचे नसतील म्हणून असं लिहिलं असेल..>> >>> DShraddha , हो हे असु शकते.

कथा म्हणून वाचली तेव्हा पटली नाही. कारण वावे यांनी लिहिल्याप्रमाणेच.
पण लेखकाने नंतर सांगितले की यातील कथानायक ते स्वतः आहेत आणि सगळे संदर्भ सांगायचे नाहीत म्हणून त्यांनी लघुकथा बदलून एक छोटी शशक केली तेव्हा त्यांच्यासोबत काही घडलेले, त्यावरून केलेली एक कथा ( पूर्ण सत्यकथा नव्हे) असे वाटले.
आता नक्की काय त्याचा खुलासा लेखकच करू शकतील.(करावा असा आग्रह नाही).
पण हे अनेक वर्षांपूर्वी झालेय, तेव्हा आधी लिहिल्या प्रमाणे काळ हे औषध लागू पडलेले नाहीय असे दिसतेय, त्यासाठी (घटना नव्हे तर दुःख विसरण्यास) विशेष प्रयत्न करावे असा सल्ला.

वुडहाऊसच्या एका कथेत हेडकुक आणि बटलर (कि पार्लर मेड आणि स्टेबल बॉय?) लग्न करायचे ठरवतात. ठरलेल्या दिवशी, वेळी वेगवेगळ्या रजिस्टर हापिसात एकमेकांची वाट बघत बसतात. आणि मग जोडीदार उगवलाच नाही म्हणून त्याला शिव्या घालत, तडफडत आपापल्या माहेरी निघून जातात. १५-२० वर्षांनी एकमेकांना योगायोगाने भेटतात आणि परत भांडतात. तेव्हा कळतं कि कुठल्या रजिस्टर हापिसात यायच हे ऐकण्यात गडबड झाली होती. रोडचे नाव साधारण सारखे ऐकू येईल असे असते Lol

पी के मधे पण झाले होते असे. आरजू या सिनेमात देखील घोडा राजेंद्रकुमारवरून दरीत कोसळतो आणि त्याचा पाय लंगडा होतो. त्यामुळे लग्नात दोघेही न पोहोचल्याने साधना (किंवा माला सिन्हा किंवा आशा पारेख ) निघून जाते. एकमेकांशी त्यांचा संबंध येत नाही. हे असे रिअल लाईफ मधे घडू शकते तर मग कथेत का नाही बरं ?

घोडा राजेंद्रकुमारवरून दरीत कोसळतो आणि त्याचा पाय लंगडा होतो. त्यामुळे लग्नात दोघेही न पोहोचल्याने साधना (किंवा माला सिन्हा किंवा आशा पारेख ) निघून जाते. >>> Rofl

बादवे पाय कोणाचा लंगडा होतो, घोड्याचा की राकु चा Wink

Lol Lol
पीके, आरजू बघितले नाहीत.
हिनामधेपण लग्न कि साखरपुड्याच्या दिवशीच ऋषी कपूरचा अपघात होतो ना?

आरझु मध्ये राकुचा पाय कापावा लागतो. साधना त्याला शोधत राहते पण तोच तिच्या पासून लपत रहातो आणि एकदा अचानक भेट होते, तर तो तिला ओळख दाखवत नाही, मी तो नव्हेच भूमिका घेतो.

हिनामधेपण लग्न कि साखरपुड्याच्या दिवशीच ऋषी कपूरचा अपघात होतो ना? >>> हो, अन अ भा नाचत राहते, देर ना हो जाये कही देर ना हो जाये करत Wink

Pages