इंग्रजी मालिका/कार्यक्रम

Submitted by भरत. on 11 October, 2018 - 23:41

स्टार वर्ल्ड, स्टार वर्ल्ड प्रिमियर, झी कॅफे यासारख्या वाहिन्यांवरील तसंच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमवरील इंग्रजी मालिका व कार्यक्रमांबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

मालिकांवर लिहिलेलं वाहून जाऊ नये, इतकं महत्त्वाचं वाटत नाही म्हणून (आणि माझ्याशिवाय इथे कोणी लिहील का याची शंका असल्याने धागा वाहून जाणारच नाही, या भीतीपोटी Wink हा वाहता धागा.
इंग्रजीतल्या मालिका संथपणे न चालता भरभर गरगर वाहत असतात. संथ चालती सारखं काही शीर्षक कोणाला सुचत असेल, तर सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला कोणालातरी दिसला धागा Happy। >>>>> हो मला आज दिसला तो सुद्धा तुम्ही 'संथ चालती' वर लिंक दिली म्हणून. न दिसण्याची कारणं तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये दिली आहेतच त्यामुळे प्लिज याला वाहता धागा करू नका. खूप चांगल्या चर्चा आणि रेकमंडेशन्स वाहून जातील. याला ताबडतोब आवर घाला.

पण तरी मालिकांसाठी मला वाहता धागाच बरा वाटतो >>> थोडं बरोबर आहे, पण या धाग्यासाठी नाही. आणि पूर्वीसारखं TVवरच प्रक्षेपण आणि रिपीट शो झाला की संपलं असं होतं नाही ना. आपण त्या सिरियल्स नंतर नेटफ्लिक्स / प्राईम किंवा इतरत्र पाहू शकतो, त्यामुळे जुनी रेकमेंडेशन्स सेव्ह झालेली बरी.

मला हॉट स्टारची एक महिना फ्री ट्रायल मिळाली आहे. नुकतीच शार्प ऑब्जेक्ट पाहायला सुरुवात केली आहे. माझा फेवरीट जॉनर - सायकॉलॉजीकल थ्रिलर आणि सुंदर कंट्री साईडमुळे सध्या बाजूला टाकता येत नाही, पण GOT चा शेवटचा सिझन पूर्ण पाह्यला नव्हता त्यामुळे तो पण मोह आवरत नाही. मात्र जे बघणार ते एक समज बघून मग दुसरे एपिसोडस पहाणार हे नक्की.

एकदा वाहता धागा काढल्यावर त्याला बांध घालायला admin ला साकडं घालायला लागतं.
हवं तर रेकमेंडेशन्स हेडरमध्ये अपडेट करत जाईन.
शार्प ऑब्जेक्ट्सवर वेगळा धागा आहेच.

अ‍ॅडमिनना साकडं घातलं.

परवाच्या मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या इम्युनिटी चॅलेंजमध्ये १० मिनिटं ५ जिन्नस म्हटल्यावर मला पोह्यांचेच पदार्थ आठवले.

कॉफी विथ करणचे प्रोमोज दिसतात. काजोल आणि अजय देवगण येणार आहेत. आपल्या पुस्तकात करणने काजोलशी मैत्री तुटली त्यावर दोन्तीन पाने खर्च केली आहेत. त्याचा संबंध अजयच्या सिनेमाशी आहे. करणने म्हणे कमाल आर खानला अजयचा सिनेमा पाडण्याकरिता निगेटिह रिव्ह्युज लिहायला पैसे दिले होते . करणचा एक सिनेमा त्याचवेळी येणार होता.

खूप् मागे कधीतरी शेखर गुप्तांच्या वॉक द टॉक मध्ये अजयने कंपूबाजी आणि गॉसिपिंगबद्दल नापसंती व्यक्त केली होती.

म्हणजे या लोकांनी मांडवली केलीय किंवा मतं बदललीत.

जेवताना तोंडी लावणं म्हणून कॉफी विथ करणचा अमीर खान वाला एपिसोड होता आणि मलायका त्याला आणि करणला रॅपिड फायर प्रश्न विचारत होती.
अमुक एक व्यक्ती तुमच्याकडून काय उधार मागेल - अमिताभ -> माझी उंची - या उत्तरातला विनोद दोघांनाही समजावून सांगावा लागला.
वांद्र्याच्या पुढलं आणि मागलं स्टेशन कोणतं हे करणला माहीत नाही . विलेपार्ले सांगितलं. दुसरीकडे महीम.

हो. पण पूर्ण लक्ष देऊन पाहायला लागतं. त्यामुळे बाकी काही करत नसेन तेव्हाच पाहतो.

Six feet under repeat telecast on star world premier 8 pm on weekdays, started from today.

युजीनचे संवाद मस्त आहेत, खास करून तो निगनकडे गेल्यावर मजा येते. >>> हो Happy त्याचे कोट्स शोधायला हवेत. धमाल आहेत. लेखकाला अशा मोठ्या सिरीज मधे एखाद्या कॅरेक्टरला अचानक वाव देता येइल असे वाटणे आणि त्याने त्याला एकदम एक पर्सनॅलिटी देणे असा प्रकार झाला आहे. सुरूवातीच्या भागांत तो अगदीच unremarkable कॅरेक्टर दाखवला आहे. आणि नंतर सीझन ७/८ मधे वेगळाच आहे.

नेटफ्लिक्स ने २०१९ करता जवळजवळ $१०० मिलीयन देउन 'फ्रेण्ड्स' आणखी वर्षभर रिन्यू केले. या सिरीजची लोकप्रियता काय आहे ते पाहायचे असेल तर Friends leaving Netflix वर सर्च करा. मागच्या आठवड्यातला ड्रामा दिसेल सगळा. सीएनएन पासून ते अगदी इथल्या स्थानिक चॅनेल्स च्या साइट्सवर, पीपल मॅगेझिन ते टेकक्रंच सारख्या टेकी साइट्स यावर माहिती येउन गेली.

शार्प ऑब्जेकट्स संपवून बरेच दिवस झाले. खुनी कोण याचा उलगडा झाल्यावर धक्का बसला नाही.

कालपासून This is us चा तिसरा सीझन पाहायला सुरुवात केली.
एकाच वेळी तीन किंवा अधिक कालखंडातले प्रसंग गुंफून रचलेली मालिका. पहिल्या सीझनच्या पहिल्या भागात चार व्यक्तींचा छत्तीसावा वाढदिवस असल्याचं कळतं. त्यातला एक त्याच दिवशी तीन मुलांचा बाप होतो. वाढदिवस असलेले इतर तिघे म्हणजेच ही मुलं (हे समजायला मला जरा वेळ लागला).
त्यांचा जन्मापासूनचा प्रवास आणि आता आहेत ते आयुष्य एकाच वेळी दाखवत मागेपुढे घातलेली वीण.
पुढल्या सीझनमध्ये वडिलांचंही मागचं आयुष्य दाखवलेलं.
यातही अमेरिकन समाजजीवनातले अनेक पैलू दाखवलेत. गोर्‍या आईवडिलांना काळ्या मुलाला वाढवताना पडलेले प्रश्न, त्याला पडत राहिलेला स्वतःची ओळख काय हा प्रश्न.
रँडलवर आईवडिलांचं किंवा फक्त आईचं जास्त प्रेम किंवा लक्ष आहे, असं बाकीच्या दोघा मुलांना वाटतं. तसं ते मालिका कर्त्याचंही आहे का असं वाटलं. अतिस्थूल मुलीचे प्रश्न आणि संधी हुकत गेलेल्या मुलाचे प्रश्न तितक्या उत्कटपणे समोर आले नाहीत असं वाटलं. कदाचित त्यांना पडणारे प्रश्न हे त्यांच्या त्यांच्यापुरतेच असवेत. याच्यासारखे ते समाजाचा भाग म्हणून येत नसावेत, म्हणूनही होत असेल.
रँडलची लहानपणीचे व्यक्तिरेखा खूपच गोड आहे. बाकीच्या दोघा भावंडांना साथीचा ताप आल्यावर तो आपल्याला का नाही आला? तो यावा म्हणून तो प्रयत्न करतो. त्याच एपिसोडमध्ये रिबेका स्वतःच्या आईला तू रेसिस्ट आहेस हे ठणकावून सांगते. मनात race related prejudices कसे घट्ट बसलेले असतात आणि त्यात दुष्टावा नसला तरी वागण्याबोलण्यातून ते प्रतीत होतात, हे पाहताना आपल्याकडच्या जातिसंलग्न पूर्वग्रहांची आणि subtle casteism ची आठवण झाल्यावाचून राहत नाही. अर्थात तिच्या मनात तेवढेच= वंशसंबंधी पूर्वग्रह असतात असं नाही,
आपल्याकडच्या मालिका हे दाखवूच शकणार नाहीत - इच्छा आणि कुवत दोन्ही नाहीत.

हा धागा वाहताच आहे का अजून?

> शार्प ऑब्जेकट्स संपवून बरेच दिवस झाले. खुनी कोण याचा उलगडा झाल्यावर धक्का बसला नाही. > आधीच अंदाज आला होता का? कधी? मालिका आवडली, आवडली नाही, ठीकच वाटली यापैकी काय?

अंदाज आला असं नाही. पण सुप्त मनाने संशयास्पद ठरवलं असावं.
मालिकेतली पात्रं, कथानक, पार्श्वभूमी सगळंच फार वेगळं होतं..त्यामुळे आवडण्याबाबत न्यूट्रल.
तिच्या अंगावर कसले मार्क्स असतात ते कळलं नाही.

कमिल कटर असते
https://www.urbandictionary.com/define.php?term=cutter
इमोशनल ट्रॉमशी डील करायचा तिचा मार्ग ऍमा आणि अडोरापेक्षा वेगळा असतो. She internalizes it. अडोरा जवळच्यांना हार्म करते आणि एमा जवळच्याच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या बाहेरच्यांना हार्म करते.
माझ्या लेखावरील पहिल्या प्रतिसादात मी लिंक दिल्या आहेत त्या वाचल्या तर नीट कळेल सगळं.
त्या लेखिकेने छान लिहिलंय. ती स्वतः सख्या आईने केलेल्या टॉर्चरमधून बाहेर पडलेली आहे.

त्या धाग्यावर मी राजला रिप्लाय केला आहे तेच परत लिहिते. जर तुम्ही कमिलशी कनेक्ट करू शकला तरच ती मालिका खूप आवडेल.

हं.
मी आता मालिका समजून पुस्तकाचं विकी पेज वाचलं. तिथे कथानक थोडं वेगळं आहे. ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं. पुस्तक वाचायला हवं, असं तुम्ही लिहिलंय खरं.

नाही पुस्तकापेक्षा मालिकाच जास्त चांगली आहे. पुस्तक नाही वाचले तरी चालेल. त्या लिंक वाचल्यातरी पुरेसे आहे.
खरंतर तुम्ही आणि मीराने सुंदर कंट्रीसाईड वगैरे म्हणलं तेव्हाच मला वाटलं होतं कि हे तुम्हाला आवडणार/कळणार नाही.
That all atmosphere was supposed to make you feel sick... give the sense of impending doom....

अ‍ॅमेझॉन प्राइम वरच्या जॅक रायन आणि द इण्डियन डॉक्टर दोन्ही बघण्यासारख्या आहेत.

नार्कोज मेक्सिको (नेटफ्लिक्स) बोअर झाली. पहिल्याची मजा नाही.

स्टार वर्ल्ड प्रीमियरवर २४ लिगसी सुरु झालीय. आज दुसरा भाग असेल.
२४ चे या आधीचे सगळे सीझन पाहिलेत. काही काही अ आणि अ वाटलेले. पण यातलं राष्टाध्यक्षांचं . त्यांच्या कामकाजाचं , जवळाच्या माणसांचं चित्रण आवडलेलं.
२४ लिगसी ची मुख्य पात्रं वेगळी आहेत.

२४ लिगसीबद्दल - या मालिकेचा साचा वापरून वापरून गुळगुळीत झालाय.
पहिल्या सात भागांतच तेच ते फॉर्म्युले दोनदा येऊन गेल्यावर आश्चर्य/उत्कंठा असं काही राहिलंच नाही.

सीटीयू/सरकारी संस्था/बडा पॉलिटिशियन यांच्यातलाच कोणीतरी अतिरेक्यांना सामील असणं.
यात फरक इतकाच की एकावर संशय यावा, त्याचं पुढच्याच भागात निराकरण आणि दुसर्‍यावर संशय मग त्याचं काहीतरी.

बॅकग्राउंडमध्ये प्रेसिडेन्शल पोल्सची गडबड. त्याच्या कुटुंबातले, टीममधले ताणतणाव.

महत्त्वाच्या लोकांच्या जवळच्या नातलगांना किडनॅप करून कार्यभाग साधणं.

जिवावर उदार होणं.

प्रेसिडेंट्/कँडिडेटने कठोर निर्णय घेणं.

टेररिस्टस्चा म्होरक्या मारल्यावर त्याच्या मुलाने सूड घेण्यासाठी येणं.

जो मेला आहे , ज्याला मारण्यासाठी रान उठवलं तोच महाखतरनाक टेररिस्ट जिवंत असणं.

यात मेन प्रोटेगनिस्ट ब्लॅक आहे. त्याच्या सोबत ब्लॅक लोकांची अंडरवर्ल्ड गँग येते हाच एक फरक आहे.

भावनिक ताणतणावाचे तेच क्षण. फॉर द ग्रेटर गुड आपल्या माणसांचा बळी द्यायचा निर्णय. कुटुंबापासून दूर राहावं लागणं. त्यांना समजावून सांगता न येणं.....

मोजकीच चॅनेल्स निवडण्याचा एक तोटा झाला. आवडत्या मालिकेचे पुढले सीझन दुस र्‍या चॅनेलकडे गेल्याचे कळले नाही.
विल & ग्रेस - झी कॅफेवरही याचे रिरन्स पाहिलेले. (झी कॅफेवर रि-रन्स च असतात की काय?)
सहावा सीझन त्यांनी अर्ध्यातच सोडून दिला. आता इंग्लिश एच डी पॅक घेतल्यावर याचे करंट सीझन्स कॉमेडी सेंट्रलवर आहेत असं दिसलं. दहावा सीझन सुरू आहे.
विल , ग्रेस आणि जॅक तिघेही बोटॉक्स ट्र्रीटमेंट घेत असल्यासारखे दिसताहेत.

त्याचे निकष नाहीत. आधी पाहिलेल्या आणि आवडलेल्या मालिकांचे पुढचे सीझन.
कुणाच्या रेकमेंडेशन्स वरून एक दोन भाग पाहून.
प्रोमोज इंटरेस्टिंग वाटले तर.
मागे ललिता प्रीती यांनी बीबी सी फ र्स्ट च्या मालिकांबद्दल (दुसरा सीझन) लिहिलं होतं. त्यातली फक्त एकच द कलेक्शन पूर्ण पाहिली. ए कीचा एक ए पिसोड पाहून कंटाळवाणी वाटल्यावर डिलीट केली.

कथानकवाल्या मालिका मला आठवड्यातून एकदा पेक्षा रोज पाहायला आवडतात. मग मी ते भाग रेकॉर्ड करून सलग पाहतो.
सिटकॉम पैकी विल & ग्रेस बर्‍यापैकी पाहिलीय. टु &हाफ मेन चे अ‍ॅष्टन कुचर वाले काही भाग पाहिलेत.
फ्रेंड्स, बिग बँग थिअरी, हाउ आय मेट युवर मदर कधी पाहावेसे वाटले नाहीत.
या सगळ्यांचाही एक साचा असतो असं जाणवतं. चुरचुरीत संवाद, प्रत्येक पात्राची काहीशी टोकाची वैशिष्ट्य.

अमेरिकन मालिकांत तिथल्या समाजाचं चित्रण पाहायला आवडतं. सध्या धिस इज अस पाहतोय.
डिटेक्टिव्ह मालिकांत व्हाइट कॉलर, कॅस,, बोन्स आवडलेल्या.

हम्म. माझ्याकडे टीव्ही नसल्याने मला तो प्रश्न पडला बहुतेक. टीव्ही असता तर जे समोर दिसेल तए बघत बसले असते. अगदी तुपारे मानदुबा वगैरेदेखील पाहिलं असतं बहुतेक Wink

कथानक असलेल्या मालिका मीदेखील बिंजच करते.