कार्यकर्ता

Submitted by ashokkabade67@g... on 11 October, 2018 - 13:48

आमच्या गावातील रामदास पाटील हा आमदार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता. आमदारांना निवडून आणण्यासाठी त्याने जीवाच रान केले.आमदारही त्याला मान देत .तशातच झेडपीच्या निवडणुका जवळ आल्या तस आमदारांनी पाटलाला बोलावून घेतले आणि साऺगीतल की पाटील आता कामाला सुरुवात करा पक्ष नेते तुमच्यावर खूप खुष आहेत तिकिटावर तुमचाच हक्क आहे तुम्हालाच उमेदवार म्हणून उभे करावे असे पक्षनेत्यांना वाटत म्हणून आता कामाला लागा ,आता पेरणी केली तरच पुढे मतांचं पिक कापता येईल. ‌‌‌‌‌‌ पाटील तसा राजकारणात मुरलेला गडी. निवडणुका कश्या जिंकून घ्याव्या याच बाळकडू तो आमदारांपासुनच शिकला होता,मग काय पाटील एकदम फार्मातच आले आणि लागले कामाला.गट आणि गणातील प्रत्येक गावात त्यानि दौरे सुरू केले . माणसं जवळ करायला सुरुवात केली, पण खेड्यातील माणूसही आता शहाणा झाला कोण कशासाठी आपल्याला जवळ करतो हे त्याला आता कळायला लागलं. त्यामुळे माणसं जवळ करन एवढे सोपे नव्हते. त्यातच इतर उमेदवारही कामाला लागले , त्यामुळे कार्यकर्त्यांच महत्व वाढले. त्यांच्या अपेक्षा वाढल्या,. ‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌ दररोज कुठे दारू तर कुठे पार्ट्या झडु लागल्या तसा खर्च वाढु लागला.पाटील तसा खाऊन पिऊन सुखी होता पण खर्च वाढला तसा पैसा अपुरा पडु लागला.पण पाटलाला निवडणूकीची नशा चढली होती.पाटलान शेतिवर कर्ज काढून दौरे सुरू केले. निवडणुकीचि रणधुमाळी सुरू झाली . पाटलांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला. हाहा म्हणता तिकीट वाटप सुरू झालं पण पक्षाच्या उमेदवार यादीत पाटलाच नाव आलंच नव्हतं .पक्षाची उमेदवारी मिळाली ती आमदारांच्या मुलाला. पाटील आमदारांना भेटायला गेला पण भेट झालीच नाही.फोन केला पण मोबाइल त्यांनी उचललाच नाही.बिचारा पाटील निराश झाला . पाटील गावातुन बेपत्ता झाला. सर्वांना वाटले तो मुंबईला गेला म्हणून कुणी शोधाशोध केली नाही.पण तिनं दिवसांनी त्याच प्रेत त्याच्याच विहीरीत आढळुन आले त्यांन आत्महत्या केली होती. त्याच्या प्रेतयात्रेला आमदार पुष्पहार घालून गेले. म्हणाले हाडाचा कार्यकर्ता होता बिचारा उगाचच मेला.आला असता कमाला जे

Group content visibility: 
Use group defaults