ह म बने तु म बने - सोनी मराठी वाहिनी

Submitted by soha on 11 October, 2018 - 03:44

नविनच सुरू झालेल्या सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका रात्री १० वाजता असते. मी ह्याचे काही एपिसोडस तुनळीवर बघितले. चांगली मालिका आहे. मुलांना मोठ करताना पालकांना जाणणवणार्‍या समस्या/ प्रश्न आणि त्याबाबतचे उपाय ह्यांचे हसत खेळत, रंजक पद्धतीने सादरीकरण आहे.
एका एकत्र कुटुंबात रहाणारे दोन भाऊ, त्यांच्या बायका, आई-वडिल आणि मुलं अशी पात्र आहेत. पण इतर मालिकात दिसतं तसं मेलोड्रामा, राजकारण, भडक सादरीकरण असं काहीही नाही. अतिशय निखळ आणि आपल्या रोजच्या जगण्याशी तुलना करता येईल अशी मालिका आहे ही.
कलाकार ही चांगले कसलेले आहेत. दिग्दर्श्क कोण आहे ते मला कळले नाही.
कोणी बघतं काही मालिका? नसाल बघत तर जरूर बघा. सलग कथानक नसल्याने मधूनच बघायला सुरवात केली तरी चालेल. तुनळीवर आत्तापर्यंत ४० एपिसोड उपलब्ध झाले आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

वर तुरु यांनी दिलेली निकाळजे यांची पोस्ट आहे >> हो,पोस्ट शेवटी त्यांच्या naming credit सह शेयर केली आहे >>> हो हो तुम्ही नावासहच दिलीय, वाचलं मी आधीच. मी आधी नुसतं निकाळजे यांची पोस्ट लिहीलं होतं मग वाटलं की निकाळजे आयडी वाटेल सगळ्यांना म्हणून परत एडीट करुन तुमचं नांव लिहीलं. तुम्ही नांवासह छान पोस्ट शेअर केल्याबद्दल थँक यु.

ह. म.बने
तु. म. बने
Hats off to these guys
Today's episode was too good man too good!!!
आजचा भाग अतिशय सुंदर होता !!!

इतके उत्तम विषय इतक्या संवेदनशीलतेने हाताळूनसुद्धा लोकांचा प्रतिसाद नाही! Sad
हबतुब आतापर्यंतच्या मराठी मालिकांतल्या सर्वोच्च मालिकांमध्ये नक्कीच असेल.
ग्रेट!!!

हा विषय हाताळणार ते पेपरमधे आलं होतं ते वाचून मी, हा भाग लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून बघा असंही अनेकजणांना कळवलं होतं.

इथे पण लिहायला हवं होतं की हा भाग नक्की बघा. ते मात्र राहीलं.

मी नेहेमीच बघते ही सिरीयल. सोनी लिव वर आता ह्या मालिकेचे भाग बघायला मिळतील. युट्युबवर नसतात आता पुर्ण इथे.

लहान मुलांना good touch, bad touch समजावलं आहे. पूर्वी सत्यमेव जयते मध्ये हा विषय घेतलेला बघितलेला. ह्या मराठी सिरियल्समध्ये असे विषय चांगले हाताळतात, एरवी पण छोटे मोठे सामाजिक विषय, घरगुती विषय ह्या मालिकेत अगदी सहजपणे सादर करतात.

येईल online.

खरोखरच ही मालिका अपवादात्मकरीत्या सध्याची बेस्ट मालिका आहे. निखळ आनंद व समाधान..

युट्युबवर बरेच एपि आहेत पण नेमका कालचाच नाहीये. कोणी लिंक देऊ शकेल का? अजून कुठे असेल तर.
इकडेदिसत, वूट नाही दिसत

Pages