राजा ❤️राणी

Submitted by पाडस. on 4 October, 2018 - 08:26

आहे हि स्वप्नातली काहाणी,
त्यात मी होतो राजा अन् ती माझी राणी.

धावपळ झाली होती राणीच्या घरात,
मंडपही सुरेख उभा केला होता दारात.

सनई हि वाजू लागे मग सुरात,
वाजत-गाजत आली राजाची वरात.

राजा होता हत्तीवर स्वार,
राजाची ऐट होती भारदार.

वरातीला राजाचे पाहुणे होते फार,
बगूनच राणीचा बाप झाला गार.

मग राजाला बसायला दिला, सोन्याचा पाट,
त्याच्या लग्नाचा होता, काही वेगळाच थाट.

जेवणाला होते जिन्नस साठ ,
वऱ्हाडी शोधतात जेवणाचं ताट.

मग राजाला राणीकडे पाठवण्यात आलं,
लग्नाआधी घोळ नको म्हणून भेटवण्यात आलं.

राजानं राणीला बाशिंगा आडून पाहिलं.
राणीनं राजासाठी मग चक्क एक गाणंच गायलं.

भटजी बुवा म्हणाले अहो पुरे करा खेळ,
वधू-वराला आणा मंडपात झाली लग्नाची वेळ.

राजा-राणीच्या हातात होते हार,
राणीला शालूचा भारीच भार.

भटजींनी मग मंगलअष्टका केल्या सुरु,
आवाज त्यांचा ऐकुन सगळे लागले घोरू.

राजाला हवी होती राणीची साथ,
भटजी बांधणार त्यांच्या पदराची गाठ,
एव्हढ्यात बसली एकाच लाथ,
आणि लग्नाआधीच झाली पाहाट.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लिहीलंय छान, पण सुरवातीलाच स्वप्न आहे म्हणून सांगू नका


"एव्हढ्यात बसली एकाच लाथ,
आणि लग्नाआधीच झाली पाहाट."
>>
या शेवटच्या ओळींवरुन लक्षात येतं स्वप्न आहे ते.