Submitted by अनन्त्_यात्री on 1 October, 2018 - 08:47
*पितृ"पक्षी"*
माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो
माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो
माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो
पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा !
व्वा !
छान ...
छान ...
छान लिहिलीय ..
छान लिहिलीय ..
आपल्या कविता विचार करायला लावणार्या असतात..