सर! अ कॅन्सर पेशंट इज इन अर्जंट नीड ऑफ फिनान्शियल हेल्प!

Submitted by यक्ष on 1 October, 2018 - 05:35

आजकाल ह्या प्रकारच्या फोन काँल्स मध्ये लक्षणीय वाढ झालीय! नुसता वैताग येतो!
एकदा निराधार वृद्धांसाठी मदत केली तर पोस्टाने पुनःपुन्हा मदत करण्यासठी वेगेवेगळ्या स्किम चा ढिगारा येउन पडतोय.
त्या लहान मुलांच्या मदतीसाठी असलेल्या संस्थेने तर 'आर्त' भावाने आपल्याकडे बघणार्‍या मुलीचा वेगवेगळ्या अँगलमधून शूटिंग करून जाहिरातींचा बाजार मांडलाय!
आत तर त्या गूगल जाहिराती मधून ' ह्याला मदत करा , त्याला मदत करा' ह्याचा सुळसुळाट झालाय नुसता!
फार पूर्वी कुठल्यातरी एअरपोर्ट्च्या बाहेर मराठी कामगार कुटुंबाचा ग्रुप भेटला होता त्यांना भरभरून मदत केली (पहिलाच प्रसंग) तर त्याननंतर असे कुटुंबे बर्‍याच वेळा दिसली. ती नेमकी मराठीच कशी असतात आणी नेमके आपल्याच कशी भेटतात (परप्रांतात सुद्धा!) हा मला पडलेला यक्षप्रश्न!
नेरुळला एक मराठी शेतकरी कुटुंबाला किराणा सामान घेउन दिले त्यानंतर ते कुटुंब नंतर वर्षभर तिथे दिसले!
चौका-चौकात भिकारी येऊन त्रास देतातच...नेमके आपण तोंडात घास घेतला की आपल्याला शरम येइल इतपत आपल्यासमोर ठाण मांडून बसतात!
काय खरे काय खोटे देव जाणे...पण आताशा निराशा यायला लागलीय एवढे मत्र खरे!!
की हा पण एक फसवा फसवीचा धंदा झालाय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hmmm खरे आहे,
एकदा अशाच एका फोनवर सांगितले की मी तमुक तमुक संस्थेला मदत केली आहे, आत्ता माझे बजेट संपले, तर फोन वरची मुलगी सर , it's just 600 rupees per month. Surely you can manage that वगैरे सांगायला लागली.

हल्ली असे कोणाचे फोन आले की, मी अमुक संस्थेबरोबर काम केलंय, माझे चॅरिटी बजेट संपले सांगून फोन ठेऊन देतो.

दुसरी गोष्ट म्हणजे,
आशा मोठ्या NGO ला पैसे दिल्यावर त्यांचे अडमिनिस्ट्रेशन , मार्केटिंग चे बजेट वजा करून प्रत्यक्ष किती पैसे गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचत असतील हा प्रश्नच पडतो.

त्या पेक्षा ओळखीच्या लोकांनी सांगितलेल्या संस्था, किंवा रोजच्या पाहण्यातील गरजू लोक यांना मदत करणे मला जास्त पटते.

त्या पेक्षा ओळखीच्या लोकांनी सांगितलेल्या संस्था, किंवा रोजच्या पाहण्यातील गरजू लोक यांना मदत करणे मला जास्त पटते.>> +१

Submitted by सिम्बा on 2 October, 2018 - 11:08
दुसरी गोष्ट म्हणजे,
आशा मोठ्या NGO ला पैसे दिल्यावर त्यांचे अडमिनिस्ट्रेशन , मार्केटिंग चे बजेट वजा करून प्रत्यक्ष किती पैसे गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचत असतील हा प्रश्नच पडतो.

त्या पेक्षा ओळखीच्या लोकांनी सांगितलेल्या संस्था, किंवा रोजच्या पाहण्यातील गरजू लोक यांना मदत करणे मला जास्त पटते. <<<<<<
अगदी बरोबर...

मी, सध्या माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाही असे सांगून फोन ठेऊन देतो पण नंतर मनाला चुटपुट लागून राहते. मग कधी काळी आपल्यावरसुद्धा अशी वेळ येऊ शकते हा विचार मनातून बराच वेळ जात नाही.

गोल्डफिश, आपल्या आजूबाजूलाही भरपूर गरजू असतात. त्यांना मदत करावी.

कुणी फोन करून लहान मूल जीवघेण्या रोगाने आजारी आहे असे सांगितले की हॉस्पिटलचा पत्ता मागावा, भेटायला येतो म्हणून सांगावे. कुणी खरेच असेल तर पत्ता मिळेल, जाऊन भेट द्यावी व योग्य माणसाला मदत केल्याचे समाधान पदरी घ्यावे, कुणी नसेल तर नंतरची रुखरुख राहणार नाही.

धन्यवाद साधनाताई !!! अशा दृष्टीने आधी विचारच केला नव्हता. आता परत असे फोन आले तर माहिती काढण्याचा प्रयत्न करेन.

असा फोन आला तर मी त्यांना सांगतो, "मी तुमच्या संस्थेला नक्की मदत करेन. माझ्या माहितीतल्या अशा गरीब, गंभीर रुग्णांना तुमच्या संस्थेचा नंबर देईन जेणेकरुन ते तुमच्याकडे येऊन उपचार घेतील आणि तुम्हाला दुवा देत राहतील."

मध्ये असाच प्रकार काश्मिरी विस्थापित असल्याचे सांगून घरोघरी येऊन मदत मागण्याचा प्रकार जोरात होता.

मला असे फोन आले की सर्व डिटेल्स मला मेल करा, मी फोनवर कुठलेच कन्फर्मेशन देत नसतो असे सांगतो. आजतागायत एकही मेल आलेला नाही किंवा त्याच संस्थेचा पुन्हा फोनही नाही.

ऑपरेशनसाठी फोनवरून पैसे मागणे आणि काश्मिरी विस्थापित दारी येणे दोन्ही अनुभव घेऊन झाले आहेत.

४ महिन्याच्या बाळाची हृदय शस्त्रक्रिया करायची आहे मदत करा म्हणून फोन आलेला. मी असे फोनवरून मागितलेल्या मदतीला पैसे देत नाही सांगितले तर पलीकडची बाई इमोशनल ब्लॅकमेल करायला लागली. किती लहान बाळ, त्याच्या आईवडिलांचा विचार करा वगैरे. तिला कसेबसे समजावून फोन ठेऊन दिला. काही दिवसांनी परत तसलाच फोन; वेगळा आवाज होता पण मजकूर सेम. Angry माझा एका सेकंदात भडका उडाला. रागाने थरथरणाऱ्या आवाजात "अहो तुम्ही मला असले फोन करत जाऊ नका ओ सकाळीसकाळी" म्हणलं. घाबरलीच ती बाई. नंतर कधी फोन आला नाही.

एकदा थोडी सिनियर बाई काश्मीर विस्थापीत आहोत म्हणून दारी आलेली. लहान मुलं आहेत, घरदार सोडून कॅम्पमध्ये आलो, जेवणाची आबाळ होतेय. तिला नाही सांगितलं. बरंच insist करत होती पण नंतर गेली निघून.
काही दिवसांनी एक टीनेजर मुलगी आलेली, फार सुंदर, गोरी गुलाबी, चांगले कपडे होते जीन्स आणि टॉप, पाठीवर कॅनव्हास बॅग होती. सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणत ती फारच आक्रमक झालेली. मला धक्का देऊन घरात घुसेल असे वाटत होते Uhoh

इट्ट्स अ बिझनेस... मध्यमवर्गियांच्या खिशातला सर्व पैसा काहि ना काहि कारणाने बाहेर काढावा लाग्तो नाहि तर तो एफडी नामक डम्पिंग ग्राउंडमध्ये कुजतो. शेअर बाजार, म्युचुअल फंड, मनोरंजन, हेल्थ, पोलिटिक्स, धर्म, खेळ अशा अनेक क्लृप्ती वापरुन तो पैसा हुशारीने काढावा लागतो. त्यातलाच आणखी एक प्रकार म्हणजे गरजूंना मदत. सिम्बा म्हणतात तशी मदत स्वतःहून जाऊन स्वतःच्या डोळ्याने पाहून प्रत्यक्ष करावी....

अर्थात स्वतःच्या डोळ्याने पाहूनही अनेक प्रश्न पडतात तो भाग निराळा. विदर्भात एक सेवाभावि कुटूंबाच्या नावजलेल्या प्रकल्पासाठी त्यांची सून आमच्या ऑफिसात आमच्या सीइओशी मदतीबद्दल बोलायला आली होती, तेव्हा ती सांगत असलेली संस्थेची परिस्थिती आणि तिची पंधरा-वीस हजार रुपये कींम्तीची फॉरेन ब्रांडेड पर्स बघून प्रश्न पडले होते....

विदर्भात एक सेवाभावि कुटूंबाच्या नावाजलेल्या प्रकल्पासाठी त्यांची सून आमच्या ऑफिसात आमच्या सीइओशी मदतीबद्दल बोलायला आली होती, तेव्हा ती सांगत असलेली संस्थेची परिस्थिती आणि तिची पंधरा-वीस हजार रुपये कींम्तीची फॉरेन ब्रांडेड पर्स बघून प्रश्न पडले होते....>>>>>>

1. ती इतरांना मदत करतेय, स्वतःसाठी मागत नाहीय. स्वतःसाठी ब्रँडेड पर्स तिला परवडत असेल. तिचे कुटुंब प्रकल्प चालवतेय म्हणजे त्यांनी आधी सर्वस्वदान करून मग इतरांकडे हात पसरावेत असे नाही. असे करणारेही खूप आहेत पण तसा काही कायदा नाहीय. आणि संस्था जितकी मोठी तितकी मदतीची गरज मोठी, एकट्याच्या प्रयत्नाने ती भागणार नाही.

2. ती अगदीच साधे कपडे घालून आली तर तिला वाचमन दारातून धक्के मारून घालवण्याची शक्यता जास्त आहे.

रेल्वेस्टेशनच्या बाहेर आम्ही चुकलो, पाकीट मारले असे सांगून पैसे मागणारे खुप असतात. हे लोक चेहऱ्यावरून माणसाची मातृभाषा बरोबर ओळखतात. मराठी माणूस दिसला की मराठीत, गुजराती दिसला की गुजरातीत बोलून मदत मागु लागतात.
आताशा हे लोक मुंबईत दिसत नाहीत. बहुतेक दुसरा काही (टोपी घालायचा) धंदा सुरु केला असावा.

पर्वा माझ्याकडे गुजराती वेशभूषा केलेली व फुगे विकत असलेली स्त्री फुगे घे म्हणून मागे लागली. मी म्हटले फुग्याशी खेळणारे घरात कुणी नाही आणि तसेही रात्री 10 वाजता फुगा विकत घ्यायचा मूडही नव्हता. तर ती बाई काहीतरी मदत करा म्हणून मागे लागली. सोबत माझी मुलगी होती, तिने मला ओढत नेले. आमच्या गाडीपाशी पोचलो तर एक 17 18 वर्षाचा फुगेवाला मुलगा 1 किलो पीठ घ्यायचे, मदत करा म्हणून मागे लागला. मी एकटीच असते तर कदाचित एकेक वडापाव घेऊन दिला असता पण मुलगी सोबत होती. हा सगळा 'गंदा है पर धंदा है' यावर तिचा ठाम विश्वास असल्याने ती अजिबात मदत करायला देत नाही. मला नंतर खूप चुटपुट लागून राहिली. मुलगी म्हणाली त्यांचे तेच तर काम असते , तुमच्यासारझे लोक टार्गेट करायचे.

ठीक आहे ना. फुकट तर मागत नव्हती, फुगे विकत होती.

मला पण असे चौकात भर उन्हात गुलाब बुके विकणारे दिसतात, वाईट वाटते. 100 ला देतात बुके, घेतो मी कधी कधी.

साधना , ditto अनुभव मला पण

हल्ली आमच्या एरिया मध्ये असे गुजराथी/राजस्थानी फुगे विकणाऱ्यांचा पूर आलाय, बहुदा एकच मोठे कुटुंब असावे,
फुगे घेऊन सायकल चालवणारा एक पुरुष/चालणारी बाई आणि बरोबर एखादे 4 5 वर्षाचे मुल अशी टीम असते, मिठाई/भेळेचे दुकान वगैरेंच्या दारात नक्की दिसतात

शक्यतो संध्याकाळी उशिरा , काहीच फुगे विकले गेले नाहीत वगैरे स्टोरी ऐकवून मुलाचा हवाला देऊन फुगे गळ्यात मारतात, मी स्वतः च्या गळ्यात 2 बांधून घेतले आहेत.
बांधून घेताना फार कळवळा वाटत होता, नंतर परत तिकडेच आणि तसेच फुगे विकताना पाहून येडे बनल्याचे कळले

हम्म... आमच्या इथे हल्ली 'ताई मराठी कळते का?' विचारणारे कमी झालेत व त्या जागी हे फुगेवाले उगवलेत... का तीच लोकं कपडे बदलून फिरतात देव जाणे.

या उलट आलेला अनुभव.
एकदा हृषीकेशला नदीवरील पूल ओलांडून जात होतो. एक १०-१२ वर्षांची मुलगी धावत आली "बाबूजी ये देखो मछली को खिलाओ" असं म्हणून कसलेसे तुकडे तिने खाली टाकले, आणि माशांनी अगदी उड्या मारून ते गिळले.
मला वाटले ती मुलगी अशीच खेळते आहे, मी तिला अरे वा खूप छान म्हणून चालू लागलो. तर ती मागे लागली घ्या ना, तूम्ही खाऊ घाला, पाच की दहा रूपयाला पाकीट.
मला तो प्रकार काही आवडला नाही आणि वेळही नव्हता, मी नको म्हणून चालू लागलो. तर ती मागेच लागली, पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोचलो तरी विनवण्या करत होती. मग मी तिला खिशातून दहा रुपये काढून दिले, म्हटले घे पण मला ते पाकीट नको. तर तिने पुढे केलेला हात मागे घेतला.
म्हणे असे नको! तुम्ही पाकीट घेत असाल तरच.
मी म्हणालो "ठीक है बेटा, मेरे तरफ से तुम ही खिला दे ना".
पण तरीही तिने घेतले नाही. "आपको खिलाना है तो ही ले लो" म्हणाली आणि मागे वळली.

तेव्हा ती सांगत असलेली संस्थेची परिस्थिती आणि तिची पंधरा-वीस हजार रुपये कींम्तीची फॉरेन ब्रांडेड पर्स बघून प्रश्न पडले होते....>> याचकाने कायम हीन दीन राहिले पाहिजे! फाटकी शक्यतो फिक्क्या रंगाची साडी, ढगळं ब्लाउज, विस्कटलेले केस, पण वेणी घातलेली, पायात झिजलेल्या चपला... आणि आम्ही त्यांना मदत करतो म्हणजे फार मोठे उपकार करतोय. त्या उपकाराच्या ओझ्यात मान खाली घालून निमुट चाललं पाहिजे. बरोबर ना?
बाकी असं कोणी भेटले की माझा गिल्ट मारायला मी काही तरी देतो. रेग्युलर मदत करत नाही याचा गिल्ट, अनेकदा काही ना काही कारणाने वस्तू फुकट दवडल्या जातात याचा गिल्ट. आणि तसंही जितके पैसे देतो ते न देउन स्वत:कडे ठेवल्याने मला काहीच फरक पडणार नसतो. ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या नक्कीच पुरेसं कमवत नाहीये. मागून तिला वाईट सवय लागणारे, काळ सोकावतो इ.इ. खरं असेलच... पण...
अशा व्यक्ती तितक्या रेग्युलरली मला भेटत नाहीत म्हणूनही असेल. पण त्या क्षणी द्यावसं वाटतं. तर देतो. मला क्षणिक आनंद मिळतो, सो माझ्या आनंदासाठी देतो.
अर्थात फोन करुन माझा वेळ घेतला तर मी बिझी आहे, मला फोन करु नका सांगून्म फोन ठेवतो.

@मानव पृथ्वीकर
अतिशय चांगला अनुभव सांगितला तुम्ही. मुलगी खरच स्वाभिमानी होती, मी असतो तर एकाऐवजी 2 पाकिटे घेतली असती तिच्याकडून.

हे इंडिया तच नाही तर finland मधेही होत. एकदा एकाने मेट्रो चे तिकीट काढायाला ५ युरो मागितलेले..बघितला तर कपड्यावरून चांगला दिसत होता. दिले आणि गेला तो. नंतर एकदा एक बाई भेटली २ युरो द्या बस तिकिटासाठी ..दिले...नंतर सुपर मार्केट मध्ये जाऊन आलो तर हि बया अजून लोकांकडे पैसे मागत होती.

इथे लिहून पाप घ्यावं का कि लिहावंच अशा मनःस्थितीत शेवटी लिहीतोच आहे...

एक कॉर्पोरेट टाईप एनजीओ आहे लहान मुलांसाठीची. मध्यंतरी त्यांचे एजंट्स (स्वयंसेवक म्हणायचं) घरी येऊन गेले. मी चेक दिला. मग ऑफीस मधे दुसरे आले. तर मी सांगितलं ऑलरेडी दिलाय तरी हुज्जत घालत होते. अजून एक देणगी दिली तरी काय फरक पडणार वगैरे. माझा एक बंगाली सहकारी त्या मुलीला झापायला लागला. आम्हाला कळेना याला काय झालं.
त्याने सांगितलं यांचा जो कुणी मॅनेजर किंवा टीम लीडर होता तो ब्ल्यु डायमंड हॉटेलला दोन पोरींबरोबर आला होता. अगदी दौलतजादा चालू होती. हे आमच्या देणग्यातून करत असाल तर मुलांना काय देता ? तर ती कन्यका म्हणाली की यात वाईट काय आहे ? संस्था चालवायची तर मार्केटिंगचा खर्च आलाच. त्यासाठी मोठ्या हॉटेलात, क्लब्ज मधे, पब्ज मधे जावंच लागतं. शिवाय जे जास्त फंड्स आणतात त्यांना अशा पार्ट्या देण्यात चुकीचं काहीच नाही. शेवटी हे सर्व मुलांसाठी फंड्स आणण्याचाच भाग आहे...
तिचं लॉजीक चूक की बरोबर हे तिच्यापाशी.

छोट्या संस्था आपला जाण्यायेण्याचा, खाण्यापिण्याचा, ऐय्याशीचा खर्च वगैरे संस्थेच्या पैशातून नाहीत काढत. पगार वगैरे आपण समजू शकतो. अशाच ठिकाणी दिलेले बरे.

हॉस्पिटलमधे पेशंट अ‍ॅडमिट आहे वाले फोन कॉल्स हे ऑनलाईन कंपन्यांना तुम्ही झापले किंवा त्यांनी पाठपुरावा करूनही प्रॉडक्ट घ्यायला नकार दिला की सुरू होतात.

मोठ्या मोठ्या NGO ..फ्रेशेर्स ला हायर करतात आणि त्याना टार्गेट्स असतात. इतका फंड जमा झाला पाहिजे वगैरे वगैरे. मला एकदा असाच फोन आलेला. मी म्हणालो तुमच्या कंपनीची वेब साईट द्या...मी वाचून online donate करतो. तर म्हणाली...चालेल पण donate केल्यावर reference किंवा transactan number मला सांगा. म्हणजे हे तिच्या नावावर जाईल.

कोणे एके काळी थंडीच्या दिवसात ऑफीसमधून येत असताना घराच्या नाक्यावर एका बाईने चहासाठी पैसे मागितले.नुकतीच नोकरी लागली असल्याने तिचा कळवळा आला. हॉटेलमधे घेऊन गेले.काऊंटरवरच्या माणसाला तशी ऑर्डर दिली,तर हसत हसत म्हणाला त्या बाईला मस्का खारी+स्पेशल चहा लागतो.म्हटलं कॅन्सल कर ऑर्डर.

८-१० वर्षांपूर्वी नवीन फंडा आला होता.गावावरून आलो होतो पावण्यांकडे.पण त्यांचे घर बंद आहे.आता परत गावी जाणार आहे,लेकराला वडापाव खायला पैसे द्या.सकाळी पाहिलेले जोडपे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तिकडेच होते.एकाने २० रू.काढून दिले.त्याला म्हटलं की बाबा असं असं आहे.तो म्हणाला ते आवडलंच,"माहित आहे मला ते फसवत आहेत,पण जाउ दे.मला मदत केल्यासारखंवाटलं ना"!

Pages