जर्मनी

Submitted by chamaki on 1 October, 2018 - 03:26

माझी मुलगी पुढच्या आठवड्यात जर्मनी (hamburg)ला शिकायला जात आहे
इथून काय काय घेऊन जायला हवे याबद्द्ल माहिति हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटा कूकर, त्याची एखादी जादा रिंग आणि safety valve. सपाट बुडाची छोटी कढई. घरचा मसाला. पोळपाट लाटणे. हे मी स्वतः घेऊन गेले होते. तिथे indian stores आहेत बाकी सामानासकट.

जर्मनी बद्दल मला फारशी माहीती नाही पण मी अमेरिकेत येताना पहिल्यांदा केलीली चुक म्हणजे विनाकारण साबण, मसाले वगैरे भर्भरुन घेउन गेले होते. आपल्याला वाटतं भारतात स्वस्त मिळतं, जातं,घेऊन पण तिकडे गेल्यावर ते एखादं महिना पुरतं आणि मग जाणवतं महत्वाच्या वस्तू आणल्याच नाहीत या सगळ्यात.

धनवन्तवची लिस्ट बेस्ट! त्या हव्यातच!

मला या गोष्टी मनासारख्या इथे मिळत नाहीत त्यामुळे मी भारतातुन आणते -
कूकर, कढई, तवा, पोलपाट लाटणे, उलथणे, चिडाव/ सांडशी, डाव
नेलकटर,
डोक्याच्या क्लिपा,
छोटे क्लचर्स,
सेफ्टी पिना,
कंगवा,
टिकली,
भारतीय कपडे (सणावारांसाठी) ,
औषधे,
सुरुवातीला एक - दोन आठवडे खाण्यासाठी रेडी टू कूक गोष्टी,
इनर वेअर्स, चश्मा/ लेन्सेस ,
चहाचं गाळणं,
कांदा लसुण मसाला,
देवावर विश्वास आणि करायची आवड असेल तर एखादी मुर्ती किंवा फोटो, घंटा, उबदत्ती स्टॅण्ड, दिवा, मी येताना लोकरीची लहान फुलं करुन आणलीयेत, इथे प्रत्येक वेळेला मनासारखी फुलं मिळत नाहीत किंवा महाग असतात म्हणून

बाकी सगळं इंडियन स्टोअर मधे मिळत असावं

आणायचे असेल तर काहीही आणा, पण घरचा मसाला, आणि भारतीय कपडे सोडले (लिस्ट मधून वगळले) तर पटेल / पाटीदार इतर सगळे पुरवतो.

औषधे क्रोसिन , व्हिक्स, आयोडेक्स असे काही थोडे थोडे आणावे . नव्या देशात पटकन शॉपिंग जमेलच असे नाही. स्वत:ची प्रकृती कशी आहे त्यावरुन मग जेलुसिल, पुदीन हरा, अँटि हिस्तामाइन इत्यादी नित्य वापराची औषधे थोडी थोडी असू द्यावीत.
प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स असतील तर तीनेक महिन्याचा स्टॉक आणि डॉक्टरकडून प्रिस्क्रिपशन लिहून घ्यावे.
चष्मा वापरत असल्यास दोन चष्मे आणि लेट्स्ट प्रिस्क्रिप्शन.
घरचे मसाले, कोरड्या चटण्या , घरचे ( बाजारात सहज न मिळणार्‍या प्रकारचे ) लोणचे , सांडगे , पापड हे पण थोडे थोडे देऊ शकता.
आल्या आल्या खरेदी जमणार / परवडणार नसेल तर २-४ ताटे, वाट्या, पेले असे देऊ शकता.
थंडीचे कपडे त्या त्या देशात घेतलेले बेस्ट . भारतातून आणलेले वाया जातात.
सलवार कमीझ / साड्या मोजक्याच द्या . वर्षाकाठी एक - दोन वेळा वापरले जातील .
चांगला लॅपटॉप ( स्कूल देणार नसेल तर ) देऊ शकता
तिच्या युनिव्हर्सिटीमधल्या इतर भारतीय विद्यार्थ्यांना विचारलंत तर नेमकी माहिती मिळेल