पवारसाहेंबाच तपासकार्य सुरूच होतं पण म्हणावे तसे कुठलेच धागेदोरे हाती लागत नव्हते..ईस्माईलचा बॅकग्राऊंडही चेक झालं त्यातही त्यांना हव असलेले काहीच गवसलं नव्हतं..
ही पहिलीच केस पवारसाहेबांची डोकेदुखी बनून त्यांना छळत होती आणि म्हणूनच लवकरात लवकर त्यांना ही केस क्लोज करायची होती.. पवारसाहेब रात्रीचा एक वाजला तरी घरातल्या गॅलरीत विचार करत येरझारा घालत होते..
विचार करून करून त्यांच डोक जरा जड झालं होतं..
म्हणूनच की, काय त्यांनी खिशातून सिगारेट काढून शिलगावली..
सिगारेटचा एक पफ घेतल्यानंतर त्यांना जरा हलकं वाटलं..
अचानक त्यांना त्या भिंतीवरचे खरवडलेले शब्द आठवले..
" बदला घेणार... एकालाही नाही सोडणार मी..सगळेच मरणार"
याचा अर्थ स्पष्ट होतो जो कुणी खुनी आहे त्याच्या मनातलं ईस्पित अजून साध्य झालं नव्हतं..अजून कुणालातरी त्याला मारायचं होतं..पण कोण ?? याच उत्तर शोधणं खुप मुश्कील होतं..आणि तो खुनी खुप हुशार असला पाहीजे कारण तपासात त्याची एकही फिंगरप्रिंटस म्हणा किंवा दुसरा कुठलाही पुरावा त्याने सोडला नव्हता...
पवार विचार करू लागले ईस्माईलने केलेला जेलरचा आणि कैद्याचा खुन आणि ईस्माईलचा असा अचानक झालेला खुन ह्यात नक्कीच काहीतरी जुळत आहे..असा राहून राहून सारखा विचार त्यांच्या मनात येत होता..
त्यांनी लगेचच गाडी काढली आणि निघालेच...
पवारसाहेबांनी गाडी पोलीसस्टेशनच्या बाहेर लावली.
पोलीसस्टेशनच दार नेहमीप्रमाणेच सताड उघडच होतं..
रात्रीचे दोन वाजल्या असल्याने सकाळी असते तशी गडबड नव्हती..आतमध्ये त्यांचा सहकारी निकम झोपला होता एक पाय खुर्चीवर आणि एक पाय टेबलावर, हात उगाचच लाच घेत असल्यासारखे पसरलेले, शर्टाची वरची दोन बटने खोललेली.. आणि त्याच्या फाटक्या बनियनातून दिसणारे त्याचे छातीवरचे दाट केस, आणि प्रत्येक घोरण्यामागे त्यांच कमी जास्त होणारा पोटाचा नगारा त्याला असं घोरत पडल्यावर बघितलं आणि पवारसाहेबांच डोकच फिरलं..त्यांनी पटकन बाजूलाच असलेल्या बाॅटलने फरकन त्याच्यावर पाणी ओतलं...
"च्या माय वरात...तुझ्या मायची ×××××× " एक जोरदार शिवी हासडून निकम चरफडत उठला व समोर पवारांना पाहताच एकदम आश्चर्यकीत होऊन
"सायब तुम्ही व्हय .मला वाटलं की, त्यो आपला दुसरा कुणीतरी?? स्साॅरी हं.." असं काहीतरी पुटपुटला..
बर बरं..मला काही फाईल हव्यात तपास करायला..चल लवकर त्या जेलरच्या खुनाची, दुसरी त्या जेलमधल्या कैद्याची आणि तिसरी ईस्माईलची..दे पटकन..
"बसा तुम्ही आता आणतो बगा.." इतक बोलून निकम फाईल शोधायला गेला..
दहा पंधरा मिनिटातच निकम त्या सार्या फाईल घेऊन आला..
एक एक फाईल बारकाईने पाहत पवार साम्य शोधू लागले..
पहिला खुन दिनांक 29 एप्रिल 2014 रोजी ..
दुसरा खून दिनांक 28 मे 2014 ..
आणि तिसरा खुन 27 जून 2014..वेळ सारखीच रात्री 12 ते 12: 30 च्या दरम्यान. .
काहीतरी कळून पवारांनी निकमला कालनिर्णय आणायला सांगितले..
तिघांच्या तारखा एक महिना अंतराने, उतरत्या क्रमाने आणि वीसच्या पटीतल्या होत्या आणि अजून एक महत्वाच म्हणजे त्या सर्व दिवशी अमावस्या होती..
आणि तिन्हीही खुन जेलच्या परिसरात झाले होते..
वरील सर्व मुद्दे लक्षात घेता पुढचा खुन
26 जुलै 2014 रोजी चोथा आणि बहुतेक शेवटचा खुन होणार होता..हे पवारांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही कारण 25 जुलै ला बरोबर अमावस्या होती...
पवारांच्या चेहर्यावर काहीतरी गवसल्याचा आनंद साफ दिसत होता.. पण क्षणात तो मावळला कारण जेलमध्ये एकूण 365 कैदी 100 स्टाफ कार्यरत होते इतक्या सगळ्यामधून कुणाचा नेमका खुन होणार हे सांगण कठीण होतं..
त्यांनी सर्वांच्या नावाची यादी काढण्याचा आदेश निकमला देऊन ते घरी निघाले...
.........
26 जुलै 2014 वेळ रात्री 11:30 ची..
पवारसाहेबांच्या प्लॅननुसार सर्व अगदी तयारीनिशी कडेकोट बंदोबस्तात तयार होते....
ह्या येणाऱ्या अर्धा एक तासात खुन्याला आपण पकडू याचा आत्मविश्वास पवारांना अगदी 100% होता...
हळू हळू वेळ सरकत होती..
घड्याळात बारा वाजले तसे अचानक जेलच्या आवारातली लाईट गेली आणि पवारसाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..
अंधारात काय होतय हे कळण्याआधीच कुण्याच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला तसा सगळे बंदोबस्तातले पोलीस त्या दिशेला धावले..
पवारही त्या दिशेला धावत सुटले..पण धावता धावता मध्येच त्यांना ईस्माईल ज्या कोठडीत होता त्या कोठडीत त्यांना काहीतरी विचित्र दिसले तसे ते तिथेच थांबले..
अंधारात स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं पण कुणीतरी घोगर्या आवाजात येरझारा घालत बडबडत होतं..
"ये...आत....ये ..ये....आत ये....ज्याला तु शोधतोय तोच मी.."
पवारसाहेबांना त्याचे हे शब्द स्पष्ट ऐकू आले...
हळू हळू पवार त्या दिशेला सरकत होते..सगळे पोलीस दुर अंतरावर आवाज आला त्या दिशेला बंदोबस्तात होते..
इकडे एन्काउन्टर वैगेरे होण्याची शक्यता दाट असल्याने सगळ्या बाकीच्या कैदांना आदल्या दिवशीच दुसरीकडे हलवण्यात आलं होतं .
त्या रिकाम्या कोठडीत हळू हळू करून पवार पुढे सरकत होते त्याला ते मोका बघून मागून झडप घालणार इतक्यातच ती आकृती नाहीशी झाली आणि धापकन पवार जमिनीवर पडले इतक्यातच मगापासून उघडा असलेला दरवाजा अचानक बंद झाला..
तसे पवार घाबरले..त्यांना क्षणाचाही काहीच रिअॅक्ट करण्याचा वेळ न देता त्या आकृतीने त्यांच्यावर हल्ला केला...
अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने पवार साहेब थोडे भांबावले..ते परत सावरून उठणार इतक्यातच एक जोराची लाथ त्यांच्या पोटावर पडली..
पवार परत तसेच कोलमडून मागे पडले..
त्यातुन ते सावरता न सावरता तोच त्या आकृतीने त्यांचा उजवा हात उखडून वेगळा केला...जीवाच्या आकांताने पवारसाहेब वेदनेने कळवळले पण त्यांचा तो आवाज जणू कुणापर्यत पोहचतच नव्हता...
पवार परत कसेतरी उठून उभे राहणार इतक्यातच त्यांचा उजवा पायही त्या आकृतीने वेगळा केला होता..
प्रचंड वेदना आणि रक्तस्राव याने पवारसाहेब खुपच असह्र झाले होते हे थोडेके नसेना म्हणून त्यांचा डावा हातही क्षणात त्या आकृतीने वेगळा केला...
जीवाच्या आकांताने पवार विव्हळत होते किंचाळत होते कसेबसे ते ओरडलेच कोण आहेस तु??
कदाचित ह्याच प्रश्न त्या आकृतीला ऐकायच होता..
क्षणात ती आकृती त्यांच्यासमोर प्रकट झाली...
निळा काळा पडलेला चेहरा, चेहर्यावर रक्ताचे सुकलेले डाग, डोळ्याच्या जागी डोळे नव्हतेच होते फक्त दोन ठिपके..ती आकृती हवेत हलकेच लहरत होती..
इतक असूनही पवारांनी तो चेहरा ओळखला होता...
भराभर सगळा भुतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला...
हीच ती व्यक्ती होती जिला चोरी कबूल करत नाही म्हणून पवारांने मारले होते..
आणि खरं तर तो चोर नव्हताच मुळी चोरी दुसर्यानेच कुणीतरी केली होती पण आळ मात्र ह्याच्यावर आला होता..खुप समजुतदार आणि हुशार मुलगा होता तो हे पवारांना नंतर कळले होते पण हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आलं असतं म्हणूनच त्यांनी
ईस्माईल, जेलर आणि त्या कैदीला खोटा साक्षीदार बनवुन आत्महत्येच नाटक रचून ह्याच कोठडीत त्यांच्या मदतीने त्याला फासाला लटकवलं होतं..
ह्यातुन ते बाहेर पडले होते..
पण आता त्यांच्यासमोर त्यांना मृत्यु दिसत होता..
ते आपल्या प्राणांची भीक मागत होते..
तशी ती आकृती गडागडा बेसूर हसली..क्षणात सृष्टीतली सारी आग त्या डोळ्यांच्या खोबणीत एकवटली गेली आणि झपकन जेलच्या दाराची एक सळई तुटुन त्यांच्या पाठीमागच्या भोकातून चरचर कापत पोटातून आरपार झाली...
पवार जागीच गारद झाले होते..
ती आकृती हळूहळू मानवरूपात आली..तिच्या डोळ्यात ह्यावेळी अश्रू होते तसेच अश्रू पुसत ती आकृती एकाकी नाहीशी झाली..
समाप्त.
मस्त लिहलेय पण अजून थोडा मोठा
मस्त लिहलेय पण अजून थोडा मोठा भाग हवा होता
हॉरर ष्टुरी का यावेळी. छान
हॉरर ष्टुरी का यावेळी. छान आहे.
नाही जमली
नाही जमली
धन्यवाद पाटील 002,
धन्यवाद पाटील 002,
धन्यवाद अॅमी..
L मेय बी ह्या कथेकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील..
पुढच्या कथेत त्या पूर्ण होवो ही अपेक्षा..
बाकी तुमच्या मताचा मी आदर करतो..