अंगना फूल खिलेंगे...

Submitted by सयुरी on 29 September, 2018 - 00:35

दुपारच्या शांततेत नीता पुस्तक वाचत बसली होती. तेवढ्यात अभि आला पण ती पुस्तकात एवढी गुंग होती की तीला त्याच्या येण्याची चाहूलही लागली नाही. तो आला आणि तिच्या पुढ्यात येऊन बसला, हातात असलेली सोनचाफ्याची फुलं त्याने अलगद तिच्या ओट्यात टाकली. तिने दचकून वर पाहिले तर अभि तिच्याकडे एकटक पाहत होता, तीही त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यात हरवणं हा तिचा छंदच होता जणू. तिने ओट्यातली फुलं हातात घेतली आणि मनभरून त्यांचा सुवास घेतला. त्या सुवासाने प्रसन्न झालेल्या नीता च्या चेहऱ्यावर तेज आले होते. अभि तिचा हात हातात घेऊन बाहेर चालू लागला, तीही संमोहित झाल्यासारखी त्याच्या मागे चालू लागली. तो तीला बाहेर गार्डन मध्ये असलेल्या सोनचाफ्याच्या झाडाजवळ घेऊन आला. ज्याची फुलं त्याने तीला मगाशीच दिली होती. त्या झाडाखाली वेळ घालवणे हा त्यांचा नेहमीचाच कार्यक्रम. अभि नीता ला घेऊन खाली बसला. दुपार असली तरीही फार ऊन नव्हते, आजूबाजूला शांतता होती आणि नीता ला झाडं लावायची आवड असल्याने घराच्या समोर छान गार्डनच तयार झालं होतं. खाली बसल्यावर नीताच्या मांडीवर डोकं ठेवुन अभि आडवा झाला. दोघेही समोर दिसत असलेल्या त्यांच्या लहान पण गोड अश्या घराकडे बघत बसले होते, बराच वेळ झाला कोणी काहीच बोलले नाही. अचानक अभि ला काहीतरी आठवलं म्हणून तो "परत येतोच" असं म्हणून घरात निघून गेला, आणि नीता त्याची वाट बघत तिथेच बसून राहिली. नीता त्यांच्या आठवणीत रामतेय ना रामतेय तेवढ्यात एका जीवघेण्या किंकाळीचा आवाज तिच्या कानावर पडत घरात एक मोठा स्फोट झाला.

नीता दचकून जागी झाली. तीला दरदरून घाम फुटला होता. तीने मान वर करुन पाहिलं तर समोर अभि होता, हार घातलेल्या फोटो मध्ये. आज त्याला जाऊन दोन वर्ष झाली होती, पण नीताच्या आठवणीत त्याचा सोनचाफा मात्र अजूनही ताजा होता.

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
असेच लहान लहान प्रसंग एकमेकांत गुंफून छानशी मोठी कथा जमवता येईल..
पुलेशु !

छान लिहिल आहे
(तीला अस न लिहता तिला अस लिहा)

छान प्रयत्न!
रामतेय ना रामतेय >>>> रमतेय ना रमतेय Happy