Built in gas shegdi or पारंपारिक शेगडी

Submitted by anamika_दे on 27 September, 2018 - 01:09

नवीन घरासाठी Built in gas shegdi घ्यावी की पारंपारिक शेगडी घ्यावी असा प्रश्न पडलाय... पारंपारिक उत्तम च आहे फक्त माझी उंची कमी असल्यामुळे कढै मध्ये टाचा उंचावून डोकवावे लागते.
Buiit in मधे क्लेअनिंग प्रोब्लेम होतो का.
कोणी वापरत असाल तर कृपया इथे सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्ट-इन मध्ये स्वच्छ करायला काही त्रास होत नाही. एकदा ग्रॅनाइट कापला की मग परत नॉर्मल गॅस स्टोव्ह शेगडी वापरावी वाटलं तर पूर्ण रिमोडेल करावं लागेल. इटालियन का हायब्रीड ते नीट बघून घ्या. बऱ्याच जणांना इटालियन वर स्वयंपाक करायला त्रास होतो. कापलेला ग्रॅनाइट शक्य झालं तर जपून ठेवा.

बिल्ट इन सुद्धा व्यवस्थित साफ करता येते, फक्त आपल्या ट्रॅडिशनल वे - मग्स भरभरून किचन प्लॅटफॉर्मवर पाणी ओतता येत नाही. ओला कपडा आणि मग कोरडा कपडा वापरून साफ केलं कि चकाचक साफ होत. त्यातही मेटल आणि ग्लास टॉपचे ऑप्शन मधला, ग्लास टॉप साफ करायला अजून सोपा.

नोट - MNGL कनेक्शन असेल तर हॉब्जना गॅस प्रेशर कमी पडत (मला टेक्निकल रिझनिंग माहीत नाही, पण अनुभव आहे) आणि गरम व्हायला थोडा वेळ लागतो. पण माझ्या 'बॉश'च्या हॉबचा मोठा बर्नर, अतीच मोठा असल्याने मला काही त्रास होत नाहीए.

पुसून घ्यायचं -वर सांगितल्याप्रमाणे कोरडया ओल्या फडक्याने / टिश्यू पेपर टॉवेल आणि मग mr. Muscle / cif/ vinegar/ lemon जो काय personl प्रेफेरेन्स cleaner असेल. लहान मुलांचे wet wipes असतात ते घरभर सगळीकडे फार उपयोगी पडतात.

त्रास होत नाही.

तुमच्यावर आहे काय हवंय ते. बिल्ट इन हॉब्स दिसायला वापरायला खूप सुरेख असतात, पाण्यानी 'धूवून' साफसफाई नाही करता येत हे एक सोडल्यास. तुम्ही सोत्ता वापरणार असलात तर काही अडचण नाही...
तुमच्याकडे बै कामास येत असतील तर हे ग्लास टॉप न घेतलेलेच उत्तम (अर्थातच माझ्यामते). त्यांच्या धबडग्यात किती टिकतील हे सांगण अशक्य. गरमाफरम ग्लास वर गार पाणी ओतणे, जड कुकर दाण्णकन ठेवणे इ छोटीं छोटीं बातें होती रेहेती हे... Wink

सगळ्यांना प्रतिसादासाठी धन्यवाद..
@ योकु : हो.. बाई च येते कामाला.. या पोइंट बद्दल धन्यवाद.. आणि माझ स्वतह्चा वापरणे फार उच्च कोटीचे नाहीये.. फार धांदरट असल्याने. :p सो बहुतेक नोर्मल च घेउ बहुतेकपुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.