जेल - भाग दुसरा

Submitted by अजय चव्हाण on 22 September, 2018 - 08:56

सकाळचे सहा वाजले होते.. इन्सपेक्टर पवार आपल्या बेडरूममधे मस्त साखरझोप घेत होते इतक्यातच " सारे जहाॅ से अच्छा" अशी रिंगटोन असलेला त्यांचा मोबाईल वाजला
चरफडतच त्यांनी तो उचलला..भलीमोठी जांभई देत त्यांनी ओशाळून तो रिसीव्ह केला...
हॅलो...
"काय, कुठे?? येतोच मी तोपर्यंत तुम्ही जागेच बारकाईने निरीक्षण करा..एकही पुरावा हातातून सुटता कामा नये.."
इतकं बोलून ते घटनास्थळी निघण्याची तयारी करू लागले..
इन्सपेक्टर पवार म्हणजे अगदी साफसुथर आणि डॅशिंग व्यक्तीमत्व त्यांच्या ह्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक केसेस हाताळल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरीही केली होती आणि त्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कार आणि पदके मिळालेली होती..
असं जरी असलं तरी त्यांची काम करण्याची पद्धत जरा वेगळी होती..ते कधीच कुणाला मारहाण करीत नसतं किंवा त्याची त्याना कधी आवश्यकताच भासत नसत..
एकदा फक्त दरारा निर्माण केला की मारहाण न करता काम होतात अशी एकंदरीत त्यांची समजूत होती..
आणि असला दरारा त्यांनी निर्माण केला होता..
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल..
पवार साहेब नविनच रूजू झाले होते.. एक चोर कबुलच करेना की, त्याने चोरी केली आहे ते अगोदर त्यांनी त्याला समजावले तरीही तो ऐकना म्हणून पवारसाहेबांनी त्याला डायरेक्ट यमसदनी धाडल स्वतः पवारच पोलीस असल्याने हे प्रकरण फारस त्यांच्या अंगाशी आलं नाही तुरूंगात असताना त्या चोराने आत्महत्या केली असा बनाव करून ते आरामात त्या प्रकरणातून सुटले पण खरं काय ते हे सार्यांना माहीत होत म्हणूनच त्यांचा दरारा गुन्हेगारांमध्ये फेमस होता.

सुरूवातीला 'तो मी नव्हेच ' अशी भुमिका घेणारे मोठमोठे गंन्हेगार पवार साहेब आले की, पोपटासारखे बोलून गुन्हा कबूल करत कारण न कबूल केलं तर परिणाम त्यांना माहीत होतेच..
तर असे हे पवार घटनास्थळी दाखल झाले
ईस्माईलची बाॅडी पाहून पाषाणहृदयी पवारसाहेबसुद्धा हादरले...
तशी ईस्माईलची आणि पवारसाहेबांची चांगली ओळख होती..
पवारसाहेबांनी स्वतःला सावरून बाॅडी पोस्टमार्टेमला पाठवण्याचे आदेश दिले व ते तुरूंगात जाऊन नीट बारकाईने पाहू लागले...

समोरच त्यांना ते रक्ताने खरवडलेले शब्द दिसले..त्या शब्दावरून तरी ईस्माईलचा कुणीतरी खुन केला आहे ही बाब जाहीर होती..
ही केस आतापर्यंत च्या केसेस पेक्षा वेगळी आहे हे एव्हाना त्यांना कळून चुकलं होतं..
तपासाला सुरूवात कशी करायची हे एकंदरीत ईस्माईलच बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय कळलं नसतं त्यांने भराभर आपल्या सहकार्राना माहीती गोळा करण्याचे आदेश दिले..

तुरूगांचा कोपरा न कोपरा तपासताना त्यांना सतत कुणीतरी त्यांना पाहतय असा भास होत होता..पण
भासाला बळी पडणार्यातले पवारसाहेब नव्हते..त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं..

आणि तुरूगांच्या छताला ती काळी आकृती लटकून
फिदी फिदी फिदी हसत होती..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम दुसरा भाग उशिरा टाकल्याबद्दल क्षमा असावी...
आय नो दुसरा भाग खुपच लहान आहे पण हल्ली थोडासा बिझी असल्यामुळे जमेल तितकचं लिहलं आहे...तिसरा भाग शेवटचा पण मोठा असेल आणि लवकरच इथे पोस्ट करेन...

तोपर्यंत समजुन घ्या आणि असाच लोभ असू दया..

पवार साहेब नविनच रूजू झाले होते.. एक चोर कबुलच करेना की, त्याने चोरी केली आहे ते अगोदर त्यांनी त्याला समजावले तरीही तो ऐकना म्हणून पवारसाहेबांनी त्याला डायरेक्ट यमसदनी धाडल
काSSSSSय??????