कसौटी जिंदगी की - २

Submitted by अविका on 21 September, 2018 - 10:56

कसौटी जिंदगी की फॅन्स साठी एक गुड न्युज आहे
दुसरा सिजन चालू होतोय २५ तारखे पासून स्टार ला रात्री 8 वाजता

तर त्याच्या जुन्या आठवणी साठी आणि नवीन पिसे काढायला हा धागा

तर होऊ दे चर्चा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरोईन खास वाटली नाही आणि पार्थ आवडत असला तरी एकता कपूरची मालिका आहे हा लक्षात घेऊन कार्यक्रम बघावा की नाही याचा विचार चालू आहे.

सुरूवात बघूनच ठरवता येईल कितपत मजल जाईल ती. जोडी मुळातच विजोड दिसते. पार्थ अजूनही काॅलेज बाॅय वाटतो, त्यामुळे अनुरागच्या 'नाॅट सो फन' कॅरॅक्टरमधे कसा दिसेल माहिती नाही. एरिका दिसते छान पण तिचे डायलाॅग्ज म्हणावे तितके प्रभावी वाटत नाहीत कारण ते नीट ऐकूच येत नाहीत.
एनीवेज्....मी मि. बजाज ची फॅन असल्याने त्याची ऐंट्री झाल्याशिवाय बघेनसं वाटत नाही. Wink

मी नाही बघत पण नकुल मेहता मिस्टर बजाज म्हणून येणार आहे ते वाचलं, नकुल आवडतो मला.

पण जुनी कास्ट जास्त आवडायची अनुराग, प्रेरणा, बजाज. बजाज जास्तच आवडायचा. अनुरागची ती तिसरी बायको पण आवडायची, मराठी होती टिकेकर.

मी बघतेय. मी पार्थ समथान ची पंखी आहे. and he is looking fantabulous as anuraag! >>> +११११

मला पण खुप आवडतो पार्थ, अन यात तर काही सिन मधे तो सेझान खान सारखाच दिसतोय अगदी.