स्वच्छता ट्रेनिंग

Submitted by सचिन पगारे on 18 September, 2018 - 10:56

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिम राबवली.उच्चभ्रु लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आपल्या आलिशान मोटारीतुन येउन स्वच्छ रस्त्यांवर झाडु मारला व कँमेर्याच्या लखलखाटात येउन निघुन गेले. हेतु चांगला होता पण नेहमीप्रमाणे नियोजनशुन्यता होती. स्वच्छता हा खरोखर महत्वाचा प्रश्न आहे. जर देश खरोखर वच्छ व्हावा अशी ईच्छा असेल तर त्याकरता स्वच्छता ट्रेनिंग ही कायद्याने सर्वांसाठी ६ महिन्यांसाठी कम्पलसरी करण्यात यावी.

काही देशांत लष्करी ट्रेनिंग कंपलसरी आहे. प्रत्येक नागरिकाला सहा महिने ते वर्षभर ही ट्रेनिंग करावी लागते. त्याचप्रमाणे भारतात स्वच्छता ट्रेनिंग ही कंपलसरी केली पाहीजे.देशातील प्रत्येक नागरीक मग तो कुठल्याही धर्माचा,जातिचा असो वा त्याचा आर्थिक स्तर हा उच्च असो वा निम्न,किमान सहा महिने तरी ही ट्रेनिंग अनिर्वाय करण्यात यावी.

यातुन स्वच्छतेचे महत्व जनतेवर ठसेल तसेच कुठलेही काम हे निम्न दर्जाचे मानले जाणार नाही. ठराविक जातिंनीच वा लोकांनी सफाईची मोनोपोली घेतलि आहे
ती काढण्यात येउन प्रत्येक नागरीकाला ही देश स्वच्छ करण्याची संधी द्यायलिच हवी. सहा महिन्याचे कोष्टक ही ठरलेले असावे जसे शौचकुप साफ करणे, कचराकुंडी सफाई , रस्ते झाडणे, मेनहोल मध्ये उतरुन गटार साफ करणे अशी ट्रेनिंग असावी. जेणेकरून देशही स्वच्छ होईल व ज्या कामांना.हलक्या दर्जाचे समजले जाते तो समजही नष्ट होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पूर्ण अनुमोदन.

स्वतः साफसफाई केलेल्या जागेत माणसे कचरा करायला कचरतात. मी जिथे पीजी केले त्या इन्स्टिट्युटमध्ये कायझन या सदराखाली रोज दुपारी वीस मिनिटे प्रत्येक विद्यार्थी/नी नेमून दिलेल्या जागेत स्वच्छता करीत असे. यात वर्ग, संगणक खोली/ग्रंथालय, हॉस्टेलच्या सामायिक जागा, सामायिक स्वच्छतागृहे, खुले मैदान, कँटिन सर्व काही अंतर्भूत होते. रोज दुपारी २० मिनिटे स्वच्छता केल्यावर कोणीही कुठेही घाण करत नसत.

>>
यातुन स्वच्छतेचे महत्व जनतेवर ठसेल तसेच कुठलेही काम हे निम्न दर्जाचे मानले जाणार नाही. ठराविक जातिंनीच वा लोकांनी सफाईची मोनोपोली घेतलि आहे
>>
हे होईल की नाही ते मात्र माहिती नाही. माझे आई-वडिल राहतात त्या आमच्या गावात कॉलनीत लोकं सेप्टिक टँक बांधत नाहीत. काय त्यात कमीपण/घाण वाटते माहिती नाही. गटाराचे पाणी बाहेर उघड्यावर सोडतील मात्र सेप्टिक टँक नाही बांधत. अनेक वर्षे माझे वडिल खोरं घेउन तुंबलेली गटारे उघडतात, प्रत्येकाला जाऊन सेप्टिक टँक बांधा असे सांगतात. हे वीस वर्षे चालू आहे. कुणालाही काडीचा फरक पडलेला नाही.

सध्यातरी 2019 च्या एप्रिल मध्ये मोठ्या स्वच्छता मोहिमेची गरज आहे,त्या साठी लोकांना ट्रेनिंग दिले जावे

शेवटी स्वच्छता ही आपण करायची असते. मोदीनी नाही. जोपर्यन्त स्वत: केलेला कचरा आपण स्वत: उचलायचा असतो ही आपली जबाबदारी आहे हे आपण समजत नाही तोपर्यन्त देश स्वच्छ होणार नाही. यात जातीपातीचा काही सम्बन्ध नाही हे सर्वान्चे काम आहे ही जाणीव असल्याशिवाय देश स्वच्छ होणे अशक्य आहे.

सध्यातरी 2019 च्या एप्रिल मध्ये मोठ्या स्वच्छता मोहिमेची गरज आहे,त्या साठी लोकांना ट्रेनिंग दिले जावे
>>>

मागल्या वेळी राहिलेला कचरा लोटून टाकायला का? ☺️