आवडते दहा ग्रंथ

Submitted by थॅनोस आपटे on 16 September, 2018 - 12:15

आवडत्या दहा ग्रंथांची नावे इथे लिहूयात. शक्य असल्यास का आवडले हे ही लिहूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नवनाथ भक्तिसार, हरिविजय, पांडव प्रताप, शिव लीलामृत , गुरुचरित्र, एकनाथी भागवत , रामायण, महाभारत, दास गणू महाराजाण्चे चरित्र, साइचरित्र.

कारण अत्यंत रसाळ सांप्रदायिक संस्कार्क्षम ग्रंथ....

इन नो पर्टिक्युलर ऑर्डर

Religio Medici (The Religion of a Doctor) by Sir Thomas Browne
एथिक्स - स्पिनोझा
Letters to a Young Poet - Rainer Maria Rilke
Leaves of Grass Walt Whitman
The Decameron - Giovanni Boccaccio
On the Origin of Species - चार्ल्स डार्विन

रामचरितमानस
ज्ञानेश्वरी
दासबोध
तुकारामाची गाथा

'ग्रंथ' ह्या कॅटेगरी मधे कोणती पुस्तके येतात ते सांगा आधी, मग लिहितो, १० नावे (बहुतेक नाही लिहिता येणार, कारण मी वाचलेली बहुतेक ग्रंथ नाहीत.)

'ग्रंथ' ह्या कॅटेगरी मधे कोणती पुस्तके येतात ते सांगा आधी >> ग्रंथ म्हणजेच पुस्तक. पुस्तक या कॅटेगरीत जे काही आहे ते सर्व. अगदी बालांसाठीचे साहीत्य सुद्धा. पुस्तक हा शब्द मूळचा मराठी आहे कि नाही याबद्दल शंका वाटल्याने ग्रंथ हा शब्द वापरला.
(ग्रंथ म्हणजे जाडजूड, मजबूत धार्मिक ठोकळा असा समज रूढ आहे काय ? माहितीसाठी विचारले आहे )

डँन ब्राऊन ची दा.विंची कोड,डीसेप्सन पॉईंट,एन्जल्स अँण्ड डेमन्स मस्त आहेत..पाल्हाळ पणा नसतो ,घटना वेगाने घडतात,अभ्यासपुर्ण लिखाण, हातात घेतलेले पुस्तक खाली ठेववत नाही..सध्या इन्फर्नो वाचत आहे ...
हिंदी उपन्यास मध्ये वेद प्रकाश शर्मा चे सुलग उठा सिंदूर आवर्जुन वाचा 15-16 पानानंतर कथा वेग घेते लेखकाची आपोआप तारीफ कराल...

http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/23-...

ग्रंथ म्हणजे काय हे वरच्या लिंकवर आहे पण मला पुरेसे आकलन झाले नाही.

माझ्या आकलनाप्रमाणे ग्रंथ म्हणजे केवळ पुस्तक नाही. पुस्तक कल्पित कथांचेही असू शकते. मराठी ग्रंथालयात नॉन फिक्शन गटात भरपूर लोकप्रिय पुस्तके असतात ज्यांना ग्रंथ म्हणता येणार नाही.

वर मेधा यांनी दिलेली यादी ग्रंथांची असावी असे शीर्षक बघून वाटते, जरी मला त्यातली अर्धी नावे अपरिचित असली तरी.

रमेश रावळ यांनी दिलेली यादी फिक्शन गटातली पुस्तके वाटतात, त्यांना ग्रंथ म्हणणे मला अयोग्य वाटते.

मराठीत एकाच गोष्टीसाठी जरी 10 शब्द वापरात असले तरी ते दहा शब्द मूळ गोष्टीचे सूक्ष्म फरक दाखवण्यासाठी वापरले जातात, त्या दहाही शब्दांचा अर्थ एकसारखाच असतो असे नाही. त्यामुळे ग्रंथ = गोष्टीचे पुस्तक = कथासंग्रह = कवितासंग्रह = बालकथा = बालकविता हे समीकरण तितकेसे बरोबर नाही. माझ्या ह्या आकलनात चूक असू शकते.

मी ग्रंथ फारसे वाचलेले नाहीत.

गंथ हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. संस्कृत मधल्या खंडकाव्य, शास्त्रे, धर्मग्रंथ यांबद्दलच परीचय असल्याने ग्रंथ म्हणजे जाडजूड ठोकळे असं समीकरण डोक्यात बसलेलं असतं. लहानपणापासून पुराणात ग्रंथ हा शब्द धार्मिक या अर्थी येतो, तसेच धार्मिक पुस्तकांना ग्रंथ हा शब्दच वाचनात आलेला असतो. पुस्तक हा शब्द कुठून आला आहे हे लक्षात नाही. मात्र पुस्तक म्हणजेच ग्रंथ.

खरे तर दहा आवडती पुस्तके म्हटले असते तर बालकविता, बालकथा हा प्रश्न विचारला गेला असता का ? ज्यांची आवड बालकथा, बालकविता आहे त्यांनी ती अवश्य लिहावीत. बाकी गुगळे आहेतच मदतीला. आपापल्या अदमासाने ग्रंथ म्हणजे काय यावर चर्चा करण्यापेक्षा आपण आवडती पुस्तके लिहायला सुरूवात करूयात असे सुचवतो.

सध्या तोत्तोचान वाचतेय.
The Design of EVERYDAY THINGS हे वाचून झालं..
आवडल कारण बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या.
Elieच Night सुद्धा आवडल.

महाभारत
श्रीमान योगी
ययाति
स्वामी
युगंधर
दा विंची कोड
केशराचा पाऊस
शाळा
अरेबियन नाईटस्
डायरी ऑफ़ अॅन फ्रँक

पुस्तकेच सांगायची तर:

मृत्युंजय,
छावा,
श्रीमान योगी
मृण्मयी
कर्हेचे पाणी
पुलंची सगळी
अनिल बर्वेची सगळी
काऊंट ऑफ मोंन्टे क्रिस्टो
वुदरिंग हाईट्स
व्हेंडेट्टा
ऍलिस्टेयर मॅकलिनची २०, ३० की चाळीस पुस्तके
लुईस लामुरची डझनभर
जॉन ग्रीशामची सुरवातीचे ४ - ५
जेफरी अर्चरची कित्येक
अगाथा ख्रिस्तीची कित्येक
हेलन केलर, फ्रेडरिक फोरसिथ, सिडनी शेल्डन, मारिओ पुझो,
इत्यादिंचे निवडक.

अशा (यापेक्षा कित्येक लांब) याद्या बहुतेकांच्या असतात, त्यातुन टॉप टेन सांगणे खरच अवघड आहे.

(माझे बहुतेक वास्तव्य महाराष्ट्राबाहेर गेल्याने मराठी वाचन कमी आहे.)

मी ग्रंथ, पुस्तक, बालसाहित्य इ. वर्गीकरण कडे लक्ष न देता या धाग्याचा हेतु उत्तम उत्तम पुस्तकांची माहीती व्हावी हा समजतो. बर्याचदा होत काय कि नावा वरून एखादे पुस्तक चांगले वाटते पण नंतर निराशा पदरी पडते वा एखादया लेखकाचे एक पुस्तक आवडते मग आपण त्याच उत्साहाने त्या लेखकाचे दूसरे पुस्तक घेतो व ते तितकेसे नाही आवडत..उदा. मुत्युंजय वाचल्यावर युगंधर तितके नाही आवडले..असो .
@मेरीच क्रम लावायच म्हणाल तर अवघड आहे कारण ब्राऊन यांची पुस्तके एकाहून एक सरस आहेत तरी मला जे भावले त्या नुसार...
1.दा विंची कोड 2.डीसेप्सन पॉईंट
3.एन्जल्स अँण्ड डेमन्स 4.Digital Fortress
Digital Fortress हे त्यांचे पहिले पुस्तक तितकेसे नाही आवडले कारण आपण नकळत त्यांच्या इतर लिखाणाशी तुलना करतो..
मराठीत धारपांचे चंद्राची सावली(भयकथा),रामनगरी (विनोदी), विज्ञान कथेत नारळीकरांचे वामन परत न आला, लक्ष्मण लोंढे यांचे दूसरा आइन्स्टाइन व असे घडलेच नाही.
हे आवडले गुप्तहेर कथेत
The Hounds of Baskerville ही आत्तापर्यंतची माझ्या वाचनात ली सर्वोत्कृष्ट म्हणेन.
जे. के.रोलिंग ची हँरी पाँटरची जादू..भरपूर आहेत ..
वरील काही पुस्तकावरून चित्रपट ही निघाले मात्र मूळ लिखाणाची सर त्यात नव्हती ...