ॲक्युप्रेशर पॉईंट्स

Submitted by सुतो on 11 September, 2018 - 22:55

मला ॲक्युप्रेशर पॉईंट्स , सुज्योक थेरपी याची माहिती हवी आहे. हे उपाय कितपत परिणामकारक असतात, त्याबद्दलची संकेतस्थळे, तुम्हाला आलेले अनुभव सांगा..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फेसबुक वर अधून मधून चित्रे येतात. तळपायाव र बरेच पॉइंट आहेत. मी रात्रीतून तळपायच तेल लावून चेपते. त्यामुळेच बरं चाललं असावं पण ट्रेंड अ‍ॅक्युप्रेशरिस्ट कडून मसाज घेतला तर चांगला इफेक्ट येइल. मला एक माहिती आहेत पण जायला वेळ नाही अ‍ॅज्युज्वल.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार...__/\__
प्रकाश गूगलवर पाहिले होते... खूप जास्त माहिती आणि व्हिडिओ आहेत.. इथे अचूक आणि नेमकी माहिती मिळेल म्हणून विचारले....
के. अंजली तुम्ही अजून सविस्तर माहिती द्याल का... तुम्हाला कुठून माहिती मिळाली किंवा नक्की कसा वापर करता...कोणत्या समस्येवर कसा फायदा होतो वगैरे.....

डॉ. लुथरा यांचे काही व्हिडीओज मी मागे सह्याद्री वाहिनीवर पाहिले होते. मग जरा माहिती काढली इथून तिथून. युट्यूब वर फारसे व्हिडीओ नाही दिसले. मी याचा वापर स्नायूंच्या दुखण्यासाठी केला बहुतेकदा. सोपे आणि सहज करता येतात. काल एक व्हिडीओ मिळाला लुथरा म्हणूनच आहे कुणीतरी. वेटलॉसवर पॉंईट्स दाखवतेय.