सरळवास्तु बद्दल काही माहिती आहे का?

Submitted by मी चिन्मयी on 9 September, 2018 - 11:04

टिव्हीवर खुपवेळा जाहिरात बघितली आहे. घरी थोडे तणाव वगैरे चालू आहेत. वडीलांची इच्छा आहे की सरळवास्तुच्या लोकांना बोलवून काही उपाय करुन घ्यावेत. माझा फारसा विश्वास नाही यावर पण आता वडीलांचे मन मोडवत नाहीये.
कुणी 'सरळवास्तु' कडून काही उपाय करुन घेतले असल्यास प्लिज सांगा. अनुभव कसे होते आणि मुळात करुन घ्यावे की नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण वास्तुंमुळे नव्हे तर वास्तुंशिवाय उत्क्रांत झालो आणि म्हणून वास्तु बांधू लागलो, हे लक्षात घ्या आणि त्यांना सांगून बघा.

नाही पटले त्यांना, आणि त्यांच्या समाधानासाठी करायचे असेल तर, करून घ्या. त्याच्या इतरांच्या अनुभवाशी सांगड घालून निर्णय घेणार असाल , दोलायमानच राहाल, किंबहुना अधिक दोलायमान व्हाल.

कसले तरी फोटो आहेत २०-२१. ते घरात लावले की भरभराट होते अशी अंधश्रद्धा आहे. बाकी जास्त जाणुन घ्यायचा प्रयत्न केला नाही.

आपण वास्तुंमुळे नव्हे तर वास्तुंशिवाय उत्क्रांत झालो आणि म्हणून वास्तु बांधू लागलो,
>>>वाह... क्या बात है.. मस्त मानवजी

<वडीलांची इच्छा आहे की सरळवास्तुच्या लोकांना बोलवून काही उपाय करुन घ्यावेत. माझा फारसा विश्वास नाही यावर पण आता वडीलांचे मन मोडवत नाहीये.>
नका फंदात पडू असे सुचवेन. एक तर खर्च सुरूवातीला वाटतो तितका रहात नाही, अनेक नसत्या उचापती करत रहाव्या लागतात. वडिलांना समजवा.

कौटुंबिक समुपदेशन द्वारे तसेच मानसतज्ञांची मदत घेउन अडचणींतून मार्ग काढणे हे अधिक चांगले आहे. तो प्रयत्न करुन पहा

प्रकाश घाटपांडे प्लस १ आपण मानसिक द्रु ष्ट्या कमकुवत अस्तो तेव्हा असले पर्याय लोभावतात. पण मन घट्ट करा. गोइन्ग फॉर वर्ड मागच्या पिढीचे असे अनेक इरॅशनल हट्ट पुरवावे लागतात तेव्हा पहिलेच काय तो स्ट्यांड फर्म घ्या व पॉलिसी बनवा. काही प्रशन सुटत नाहीत जसे एकत्र राहायचेच नसेल तर घटस्फोट मग तो इतरांनी कितीही प्रयत्न केले देव देवस्की केली तरी मनातून नकोच असेल तर कटू निर्णय घ्यावे लागतील.

धंद्यात अपयश आर्थिक त्रास मुलांची वागणूक अश्या प्रश्नांना लॉजिकल परिस्थितिज न्य व प्रॅक्टिकल उपाय, काउसेलिन्ग उपल ब्ध असतात
मदत उपलब्ध असते नक्की घ्या. एकटे पडलोत असे फीलिन्ग येउ देउ नका. आपल्यासारखे हजारो असतात. धीर सोडू नका. बिग हग अँड लव्ह.

Thank u so much लोकहो... अजून थोडी निगेटीव्ह माहिती गोळा करून वडीलांना दाखविन म्हणते. आणि प्रकाश सर आणि अमा... प्राॅब्लेम्स इतके जास्त नाहीयेत..म्हणजे मानसोपचार वगैरे इथपर्यंत तर नाहीच नाही. फक्त आई-वडील दोघेही रिटायर्ड..त्यामुळे मन रमत नाही आणि असे सगळे विचार येतायत...(may b काहीतरी वेगळं हवं म्हणून).
पुंबा, मलाही तेच वाटतंय. नसता खर्च करून घरात आणखी पन्नास वस्तू आणून फक्त त्या चमकवत बसण्यात काही अर्थ नाही.
इथे कुणी करून घेतलंय का तसं काही एवढंच बघायचं होतं.
Happy

प्राॅब्लेम्स इतके जास्त नाहीयेत..म्हणजे मानसोपचार वगैरे इथपर्यंत तर नाहीच नाही. फक्त आई-वडील दोघेही रिटायर्ड..त्यामुळे मन रमत नाही आणि असे सगळे विचार येतायत>>>मनाच्या आरोग्याचे व्यवस्थापन यासाठी तज्ञांची मदत घेणे असा माझा मुद्दा आहे. मनोबल जिम नावाची संकल्पना इथे पुण्यात राबवली जाते. तिथे मनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मनाचे व्यायाम हा प्रकार असतो. त्यात विविध अ‍ॅक्टीव्हिटी असतात.

आई वडिलाना कुठे वॉलेंटिअर वर्क करता आले तर मन गुंतून राहील. योगा क्लास, ज्ञानेश्व री/ गीता वर्ग ध्यानाचे क्लास संगीत हॉबी क्लासेस
असे काही आव ड असल्यास करवता येइल.

प्र काश सर मनोबल जिम बद्दल धागा काढून लिहा की . उत्तर रंग भागात. उपयोग होईल आम्हासनी.