भाषेचे गणित

Submitted by Malkans on 8 September, 2018 - 22:23

प्रत्येक भाषेचे एक वैशिष्ठ्य असत , काही भाषांमध्ये शब्दांचा खूप तुटवडा असतो उदा इंग्रजी , पण मराठी भाषेत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींनाही शब्द आहेत - एखाद्याने हाक मारली " ए मावशी इकडे ये " कि आपल्याला लगेच कळत हाक मारण्यार्यांच्या आईच्या बहिणीला हाक मारतोय , पण हीच इंग्रजीतून हाक मारली " ए ऑन्टी " तर समजत नाही नक्की आईच्या बहिणीला हाक मारतेय कि वडिलांच्या बहिणीला मारतेय कि ,,,,आणखी कुणाला ? त्यामुळे इंग्रजी भाषेतील एखाद्या शब्दाला समांतर अर्थाचा शब्द हवा असेल तर तो जास्त समृद्ध असावा , फोटोग्राफी चा मराठीत शब्द प्रकाश चित्रण हा तितकासा शब्द बरोबर नाही कारण आपण चित्रण करतो ते छायेचे करतो, छाया प्रकाशा मुळे पडते हे जर असलं तरी
चित्रण छायेत करतो आणि मराठीत छायाचित्रण हाच शब्द चपखल आहे , प्रकाशचित्रण म्हणणं म्हणजे मराठी भाषेला degrade करण्या सारखे आहे ! धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाशचित्रण हा शब्द मायबोलीवर वाचण्यापूर्वी छायाचित्रण हाच शब्द मला माहीत होता.

<<आपण चित्रण करतो ते छायेचे करतो>> छाया ही ढोबळमानाने फक्त एकाच रंगात असते. पण आपण जे चित्रण करतो त्यात वेगवेगळे प्रकाश येतात. कदाचित कृष्णधवल काळात छायाचित्रण हा शब्द जास्त योग्य होता.

मावशीच्या नवऱ्याला आणि आतेच्या नवऱ्याला मराठीत काय शब्द आहे?
हिंदीत दादादादी, नानानानी , पोता, नाती वेगळे.
मराठीत आहे का असं.
धोक्याची सूचना ः क्रमशःः येऊ शकेल.

छाया ही अडवलेल्या प्रकाश किरणांमुळे पडते. चित्रण छायेचे नसून परावर्तीत प्रकाश किरणांचे करतात. त्यामुळे छायाचित्रापेक्षा प्रकाशचित्र शब्द योग्य वाटतो.

मराठीत छायाचित्रण हाच शब्द चपखल आहे , प्रकाशचित्रण म्हणणं म्हणजे मराठी भाषेला degrade करण्या सारखे आहे !
>>>> Degrade हा इंग्रजी शब्द वापरून तुम्ही पण हेच केलेय की Light 1

<पण हीच इंग्रजीतून हाक मारली " ए ऑन्टी " तर समजत नाही नक्की आईच्या बहिणीला हाक मारतेय कि वडिलांच्या बहिणीला मारतेय कि ,,,आणखी कुणाला ?>
आँटीला कळल्याशी कारण. दुसर्‍या कोणाला कशाला हव्यात नसत्या उठाठेवी?

* उचापतीचं उठाठेवी केलं.

आँटीला कळल्याशी कारण. दुसर्‍या कोणाला कशाला हव्यात नसत्या उचापती?>> +1 Lol

मी हे कसलं नवीन प्रकाशचित्रण म्हणून बघायला आले तर इथे भलतंच.

मालावून ताक कंस
चेटवून अंक अंक

या इथे गणिताचा
कोठूनी कसा
संबंध?

टीप : ताकातला त अन चेटवायचा ट चुकून नाहीयेत.

अहो तसा प्रकाशचित्र, छायाचित्र, फोटू यांचाहि संबंध नाही. पण प्रतिसाद देणार्‍यांनी आणला.
तसेच दुसरे कुणि गणित, रसायनशास्त्र, तर्क असेहि विषय आणतील.
मग पुढे भाजप वि काँग्रेस हेहि विषय येतील. लोकांच्या अकला निघतील, मेंटॅलिटी निघेल.
आणिक मजा मजा.
अशी असते ही मायबोली!
लै गंमत राव! नुसते वाचतच राह्यचे!

प्रतिक्रिया
१) छाया सुध्दा अनेक रंगात असते हे आपल्याला माहित नाही , असो
२) अहो मी हिंदी बद्दल काही बोललोच नाही , मराठी आणि इंग्रजिची तुलना केली , कायराव
३) चला आता छाया पडछाया ,शब्द काढून टाकायला हरकत नाही
४) अहो मी इंग्रजी वापरू नका असं म्हटलं का ? विषयाला धरून तरी प्रतिक्रिया करा !
५) ६) ७) बरोबर आहे तुमचं - सब घोडे बारा टक्के
८) १०) " माझ्या जीवनाचे सारे गणितच चुकलं "असे मराठीत म्हणतात , माहित नसेल तर माहित करून घ्या , ते जे गणित तेच हे
९) चेटवणे = खान्देशी अहिराणीत पेटवणे , माहिती दिल्या बद्दल धन्यवाद