देव

Submitted by सदा_भाऊ on 8 September, 2018 - 21:15

देव

देव भेटाया पहावे, तो भेटणार नाही
देवळांच्या गाभाऱ्यात, देव लपणार नाही

भेटेल का तो मुर्तीत, दिसेल का भक्तीत
किती काही यत्न केले, नजरेसी दिसणार नाही

अभंगाची गोडी भारी, सुरामधे जादू न्यारी
किती सुर आळवीले, समोरी येणार नाही

पुजा अर्चा प्रपंच खरा, साकडं घाला काही करा
इथं तिथं शोधा त्याला, कुठेच तो भेटणार नाही

पोथी कितीदा वाचली, स्त्रोत्रे कित्येक गायिली
कुठे लपला कोण जाणे, काही केल्या मिळणार नाही

देव आईच्या कुशीत, देव चिमणीच्या चोचीत
चराचरा वास त्याचा, आसमंती लपणार नाही

देव नाही बाह्य रूपात, वास त्याचा अंतरंगात
शोधूनी पाही मनामधे, तो मुळी हरवणार नाही

~संदीप कुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !
( संतानी किती झलं हें कोकलून
पालथ्या घडयावरच पाणी ओतून II ) Wink