अंगूर-आदी सिनेमे - अनेक जुळ्यांची धमाल

Submitted by भोजराज on 3 September, 2018 - 00:15

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा "अंगूर" पाहिला आणि ह-ह-पु-वा झाली.

देवेन वर्मांचा रश्शीचा भाव करतानाचा सीन म्हणावं किंवा संजीव कुमारांचा "जोकर आ गयाSSS" चं टाईमिंग - सगळंच अफलातून.

सिनेमाच्या सुरुवातीला उत्पल दत्त आणि शम्मीजींचे छान डायलॉग आहेत:
उत्पल दत्त : सच्ची बात बोलूं? मुझे तैराना नहीं आता. इसीलिये पानीमें (जहाजसे) सफ़र करते हुये मुझे डर लागता हैं.
ह्यावर शम्मी यांचा सुरेख जवाब
शम्मीजी : और मैं एक बात बोलू? मुझे उडना नहीं आता. इसीलिये हवामें सफ़र करते हुये डर लागता हैं. Lol Lol

चार जुळ्यांचा हा सिनेमा बहुधा एकमेवाद्वितीय असा असावा. किंवा माझ्या ज्ञानात तरी दुसरा ४ जुळ्यांचा सिनेमा नाही.

नाही म्हणायला अमिताभचा "महान" आठवतो ज्यात अमिताभने ट्रिपल रोल केला होता.

असे आणखी कोणते सिनेमे आहेत ज्यात एका जोडीपेक्षा जास्तं जुळी पात्रं आहेत? भाषेचं बंधन नाही.

हे जाणून घेण्याकरिता हा धागा. ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, लिंक द्यावी. मी शोधण्याचा प्रयत्नं केला, पण मला काही सापडलं नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जुळ्यांची धमाल टायटलच्या लेखात एक तर डबल रोल्स सिनेमाची यादी टाकून आधीच प्रचंड गोंधळ घातलाय. त्यात पुन्हा पुनर्जन्म किंवा तत्सम सिनेमे ज्यात दोन्ही पात्रं समोरासमोर (की अमोरासमोर ?) येत नाहीत त्यांचाही उल्लेख केलाय.

टेक्निकली जेव्हा एकसारखी दिसणारी दोन्ही पात्रं समोर येतात त्यांच्यात काहीतरी संवाद घडतो किंवा निदान दृश्य तरी साकारतं तेव्हाच त्याला डबल रोल इफेक्ट मिळतो. वर कोणीतरी रंगभुमीवरच्या डबल रोल्सचा उल्लेख केलाय तिथे ते टेक्निकली अशक्य आहे पण एकच कलाकार गेटअप बदलून चटकन प्रेक्षकांसमोर येतो त्याचं त्याला श्रेय द्यायला हवं या अर्थाने त्याला डबल रोल म्हणत असाल तर दिलीप प्रभावळकरांची वासूची सासू आणि हसवाफसवी व विजय चव्हाणांची मोरुची मावशी चटकन आठवते.

सिनेमात एक कलाकार दुसर्‍या गेटअप मध्ये प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा त्यात फार काही विशेष नसते कारण दोन्हीचं शुटींग शेड्यूल वेगळं असतं. पण दोन्ही भुमिकांत वेगळा माणूस समोर आलाय असं वाटावं इतपत देहबोलीत फरक केला असेल तर त्याचं कौतुक करायलाच हवं. मुनिमजी मध्ये देव आनंदचा डबल रोल नाही पण प्राणच्या भीतीमुळे देवची आई (तसं ती त्याला भासवत असली तरी खरं तर ती प्राणचीच आई असते) देवला वेगळ्या रुपात वावरायला सांगते. मुनिमजी सिनेमा पाहण्याआधी प्रत्येक महाशिवरात्रीला छायागीत / चित्रहार मध्ये दिसणारं
https://youtu.be/bIGJymRn5tQ?t=56 हे गाणं पाहताना कधी जाणवलंच नव्हतं की हा देव आनंदच आहे.

वर कोणी बलराज साहनीला डबल रोल मिळाला नसल्याची खंत व्यक्त केलीय. पण बलराज साहनीने स्वतःची एकच एक इमेज निर्माण केली होती. डबल रोल करायचा तर दोन्ही रोल्सची वेगळी इमेज त्याला कितपत उभी करता आली असती हा एक प्रश्नच आहे. तसा प्रयत्न अमिताभने अनेक सिनेमांत यशस्वी करुन दाखविला आहे. गंभीर डॉन तर विनोदी विजय पण ते एकमेकांच्या समोर येत नाहीत म्हणजे खरा डबल रोल नाहीच. मग जर एकमेकांच्या समोर येणारच नसतील तर सिनेमांत खरंच दोन भुमिका केल्यात काय आणि एकाच भुमिकेने दोन वेगवेगळे रंग दाखविले काय - काय फरक पडतो? कोहराम मधला कर्नल आणि दादाभाई हे दोघेही एकच असतात पण दोन्ही वेळेस अमिताभने अगदी दोन ध्रुवांइतका फरक करुन दाखविला आहे. ट्रिपल रोल हा अजुन एक अवघड प्रकार. महानमध्ये तोही छान जमलाय - कनवाळू बाप आणि मुलांपैकी एक विनोदी उटपटांग नट दुसरा अत्यंत गंभीर व कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी.

रेखाला मॅडम एक्स मध्ये डबल रोल जमला नसला तरीही खुन भरी मांग मध्ये तिने एकाच व्यक्तिरेखेच्या दोन वेगवेगळ्या रंगछटा छान दर्शविल्या आहेत. संजीवकुमारचाही असा एक सिनेमा आहे ज्यात तो गरीब स्वभावाचा माधव असतो तर सगळे त्याला छळतात मग तोच गँगस्टर लाखन बनतो तर त्याला सगळे घाबरतात. सिनेमात शेवटी लाखनला माधवच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात तेव्हा डॉ. श्रीराम लागूंच्याच पिंजर्‍याची आठवण येते. अर्थात पिंजरा प्रमाणे हा सिनेमा शोकांत नाही.

रंजनाला धाकटी बहीण असते पण ती प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करते म्हणून आपल्याला जुळी बहीण आहे असल्याचे नाटक छान वठविले होते तो गुपचुप गुपचुप हा सिनेमा. त्यातही दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये आणि विशेषतः आवाजात रंजनाने लक्षणीय फरक करुन दाखविला होता.

पेयिंग गेस्ट नाटकात विक्रम गोखलेंनी स्वतःचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर लपविण्याकरिता जुळा भाऊ असल्याचं नाटक केलंय जसं गोलमाल मध्ये अमोल पालेकर (आणि नंतर दीना पाठकही) बॉसला फसविण्याकरिता करतो. विक्रम गोखलेंनी द्विधाता मालिकेत पत्नी (स्मिता तळवळकर) चा घात करण्याकरिता जुळ्या भावाचा बनाव उभा केला होता. पण यात काहीही विनोद नव्हता ही प्रचंड गंभीर आणि काहीशी भीतीदायक मालिका होती. तशीच अजून एक मालिका होती ज्यात एक बाहेरख्याली उद्योजक आणि सरळमार्गी प्राध्यापक असे खरोखरच डबल रोल्स विक्रम गोखलेंनी केले होते. बर्‍यापैकी बदमाशी करुन अडकल्यावर उद्योजक प्राध्यापकाला स्वतःच्या जागी पाठवितो आणि स्वतः प्राध्यापकाची जागा घेऊन तिथेही एका विद्यार्थिनीला (सुकन्या कुलकर्णी) फशी पाडून पोबारा करतो तर मूळचा प्राध्यापक असलेला पण नंतर उद्योजकाची जागा घेतलेला सज्जन नायक त्या उद्योजकाच्या पत्नीशी ( बहुदा फैय्याज - नक्की आठवत नाही आता) सौजन्याने वागतो. इकडे प्राध्यापक बनलेल्या उद्योजकामुळे विद्यार्थिनीला दिवस गेलेले असल्याने तो तिथून पळून येतो आणि खर्‍या प्राध्यापकाने इथली घडी व्यवस्थित बसविली असल्याने पुन्हा स्वतःच्या जागेवर शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या बदमाश उद्योजकाला त्याचाच साडेसहा फूटी आडदांड सहाय्यक (परमवीर) ठार मारुन प्राध्यापकालाच उद्योजकाच्या जागी कायमचे राह्यची विनंती करतो अशी एक कथा होती. या मालिकेचं नाव आठवत नाही.

अशोक सराफ व सचिनचाही एक डबल रोल्सचा चित्रपट आहे बहुदा आमच्यासारखे आम्हीच ज्यात श्रीमंत पण स्वार्थी जोडी गरीब आणि दिलदार जोडीला स्वतःची जागा घ्यायला लावते - संकट काळापुरती आणि नंतर संकट ओसरल्यावर पुन्हा जायला लावते. पण यात सचिन व अशोक सराफ एकमेकांचे भाऊ आहेत. जुळे कोणी नाहीत.

प्रेम रतन धन पायोतही गरीब सलमान श्रीमंत राजकुमाराची काही काळ जागा घेतो पण तेही काही जुळे भाऊ नाहीत.

असो. धाग्याचा विषय जुळ्यांचे डबल रोल असा आहे तर वरच्या लिस्टीत न दिसलेले हे काही -

  • कीथ स्टीव्हनसन - अकेला (यात धमाल म्हणजे विनोदी असं काही नाही. स्वतःला जुळा भाऊ असल्याचा गैरफायदा घेत क्रौर्याची परिसीमा गाठणारी गुन्हेगारी कृत्यं करुनही पुन्हा आपण दुसर्‍याच ठिकाणी असल्याचा व्हिडीओ पुरावा कोर्टात दाखवून निर्दोष सुटणारा नराधम आणि त्याचा मतिमंद जुळा भाऊ कीथने प्रभावीपणे रंगविलाय)
  • सलमान खान - जुडवा
  • वरुण धवन - जुडवा
  • प्रशांत - जीन्स (यात ऐश्वर्याची थ्रीडी ग्राफिक्स जुळी भुमिका आहे)

बिपिन, मस्त पोस्ट Happy

तशीच अजून एक मालिका होती ज्यात एक बाहेरख्याली उद्योजक आणि सरळमार्गी प्राध्यापक असे खरोखरच डबल रोल्स विक्रम गोखलेंनी केले होते. बर्‍यापैकी बदमाशी करुन अडकल्यावर उद्योजक प्राध्यापकाला स्वतःच्या जागी पाठवितो आणि स्वतः प्राध्यापकाची जागा घेऊन तिथेही एका विद्यार्थिनीला (सुकन्या कुलकर्णी) फशी पाडून पोबारा करतो तर मूळचा प्राध्यापक असलेला पण नंतर उद्योजकाची जागा घेतलेला सज्जन नायक त्या उद्योजकाच्या पत्नीशी ( बहुदा फैय्याज - नक्की आठवत नाही आता) सौजन्याने वागतो. इकडे प्राध्यापक बनलेल्या उद्योजकामुळे विद्यार्थिनीला दिवस गेलेले असल्याने तो तिथून पळून येतो आणि खर्‍या प्राध्यापकाने इथली घडी व्यवस्थित बसविली असल्याने पुन्हा स्वतःच्या जागेवर शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या बदमाश उद्योजकाला त्याचाच साडेसहा फूटी आडदांड सहाय्यक (परमवीर) ठार मारुन प्राध्यापकालाच उद्योजकाच्या जागी कायमचे राह्यची विनंती करतो अशी एक कथा होती. या मालिकेचं नाव आठवत नाही. >>>> प्रतिबिम्ब. मी बघितलीय ही सिरियल. त्यात तो प्राध्यापक झालेला उद्योजक सुकन्या कुलकर्णीचा कडयावरुन ढकलून देऊन खून करतो .

कीथ स्टीव्हनसन - अकेला (यात धमाल म्हणजे विनोदी असं काही नाही. स्वतःला जुळा भाऊ असल्याचा गैरफायदा घेत क्रौर्याची परिसीमा गाठणारी गुन्हेगारी कृत्यं करुनही पुन्हा आपण दुसर्‍याच ठिकाणी असल्याचा व्हिडीओ पुरावा कोर्टात दाखवून निर्दोष सुटणारा नराधम आणि त्याचा मतिमंद जुळा भाऊ कीथने प्रभावीपणे रंगविलाय >>>> यावरुन आमिर खानचा धूम ३ बेतलाय.

वन टु का फोर- जुही चावला ही शाहरुखच्या घरात भाडेकरु म्हणून राहते, ती त्याला आपण खलनायकाची (निर्मल पान्डे) प्रेयसी असल्याच भासवते, पण शेवटी ती इन्टेलिजेण्ट कॉप असल्याच सत्य उघडकीस येत.

बाजीगर- शाहरुखने यात शिल्पा शेट्टीचा प्रियकर आणि काजोलचा प्रियकर असे दोन वेगळे रोल्स केले आहेत.

सोल्जर- यात जॉनी लिव्हर आपले खुप जुळे भाऊ असून ते वेगवेगळया प्रोफेशन्समध्ये आहेत अस बॉबी देओलला सान्गून त्याला कनफ्यूज करत असतो. Lol

रेखाला मॅडम एक्स मध्ये डबल रोल जमला नसला >>>> अभिताभच्या डॉनचे फिमेल व्हर्जन होते ते.

बिपिन - मस्त पोस्ट! कीथ स्टीव्हनसन बद्दल विशेष आभार. मी सिनेमातील दुय्यम रोल्स मधल्यांचे डबल रोल्स आठवत होतो. तेव्हा अकेला मधला तो व्हिलन आठवला पण नाव आठवत नव्हते. अमिताभच्याच 'हम' मधे कादर खान चा डबल रोल आहे. एक मिलीटरी जनरल तर एक स्टेज परफॉर्मर.

एकाच व्यक्तिरेखेने दोन रोल करण्याचे गोलमाल हे धमाल उदाहरण आहेच. पण अमिताभच्या शहेनशाह मधेही असे दोन रोल्स आहेत.

धन्यवाद सुलु आणि फारेण्ड

- बरोबर आहे प्रतिबिम्बच मालिका ती आणि हो तो ड्युप्लिकेट प्राध्यापक सुकन्याला कड्यावरुन खाली ढकलुन देतो. खरं तर तिला त्याच्याकडे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारा तिचा एक प्रेमीही दाखविला आहे पण तो अगदीच हणम्या असल्याने आणि विक्रम गोखले त्यामानाने बराच स्मार्ट दिसत असल्याने ती विक्रमकडे आकर्षित होणे तितकेसे आश्चर्यकारक वाटत नाही.

{{{ अमिताभच्या शहेनशाह मधेही असे दोन रोल्स आहेत. }}}

तोच तो गंगाधर - शक्तिमान फॉर्म्युला. दुबळा नायक हाच वेष बदलून शक्तिशाली महानायक (सुपरहीरो) बनणे. अलीकडच्या काळातली उदाहरणे म्हणजे - द फ्लाईंग जाट आणि मराठीत बाजी (श्रेयस तळपदेचा). लहान मुलांना दाखवायला असे सुपरमॅन स्पायडरमॅन छापाचे चित्रपट प्रत्येक काळात बनतात / बनवावेच लागतात. महाभारतापासूनची प्रथा आहे - बृहन्नडाच अर्जुन असतो.

डबल रोलचा अत्यंत प्रभावी उपयोग तोही सस्पेन्स म्हणून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा म्हणजे - बी आर चोप्रांचा कानून. सहसा दोन व्यक्तिरेखा एकच असणे हा सस्पेन्सचा शेवट असतो पण कानूनमध्ये अशोक कुमारचा डबल रोल आहे हाच सस्पेन्स शेवटी कळतो तेव्हा फार मोठं कोडं सुटल्याचा आनंद होतो.

अशोक कुमारच्याच ज्वेल थीफ मध्ये देव आनंदचा डबल रोल नाही हा सस्पेन्स साधारण मध्यंतरानंतर कळतो पण रिटर्न ऑफ ज्वेल थीफ मध्ये खरोखरच डबल रोल ठेवून सगळी मजा घालवून टाकली आहे. देव आनंदचा हा आणखी एक डबल रोल. वर कोणीतरी हमदोनोचा उल्लेख केला आहेच. पण त्याने जुळ्यांचा डबल रोल केलेला तो बनारसी बाबू - ज्यात मोहन सोहन हे दोन जुळे भाऊ - लहानपणची ताटातुट वगैरे प्रकार आहे.

बिपीन चंद्र मस्त पोस्ट.
ज्वेल थीफ भारी आहे.
प्रतिबिंब मालिका खूप लहानपणी बघितल्याची आठवतेय. द्विधाता फक्त नाव आठवतंय.
गुपचुप गुपचुप मधे रंजनाने खरंच मस्त केलंय काम डबल रोल टाईप.
सीता और गीता मधे खरोखरचा डबल रोल हेमामालिनी ने सुंदर वठवलाय.
बोल राधा बोलचा उल्लेख आलाय का? ऋषी कपूरचा डबल रोल पण जुळे नाहीत. टिपिकल मसालापट.

धागा वाहवत चाललाय, पण तरी..
चाची ४२० मधे कमल हासनचा डबल रोल नाही, पण तरी त्यानेही त्या भूमिका सुंदर केल्या आहेत. चाचीचं पात्र तर गोडच आहे. शेवटचा भाग सोडला तर!
दुसरा म्हणजे मकडी. त्यात त्या लहान मुलीने ( जिने नंतर इक्बालमधे श्रेयस तळपदेच्या बहिणीचं काम केलं) साधी आणि स्मार्ट अशा २ बहिणींचा डबल रोल छान केलाय.
मराठीत ' हापूस' मधे मधुरा वेलणकरनेही जुळ्या बहिणींचं काम छान केलंय.

बिपीनजी , मस्त post.
प्रतिबिंब आणि द्विधाता आठवल्या.
Jewel thief बद्दल +1000000
कहो ना प्यार है मध्ये ही double role चा कथानकात वापर आवडतो.

धन्यवाद वावे आणि स्वस्ति,

चाची ४२० त कमल हासनची कमालच आहे.

बाकी जुळे म्हणजे जुडवा म्हणजेच जोडलेले असे म्हंटल्यास फक्त एकच साऊथचा सिनेमा मी पाहिलाय - चारुलता. ज्यात दोन बहिणी एकमेकींना जोडलेल्या असतात ज्या संगीत शिकत असतात. त्यातली एक बहीण दुसरीचा खून करते असे काहीतरी टिपीकल सौथस्टाईल भडक कथानक होते.

नेहा धुपियाचा शीशा देखील भडक हिंसक आहे. तोच फॉर्म्युला - जुळ्या बहीणी - एक चांगली एक वाईट. मिलींद सोमण व मिंकचा अनामिकाही असाच काहीसा.

बिपाशाचाही मध्यंतरी अलोन नावाचा भयपट आलेला पण मी अजून पाहिला नाही. तो चारुलता सारखाच आहे का?

लहानपणी लक्ष्या महेशचे चित्रपटही तुफान हसवायचे. लक्ष्याने त्याची टिपिकल अ‍ॅक्टींग सुरू करताच आधीच उगाचच हसायला यायचे. मनापासून आणि खळखळून हसायला यायचे.>>>>>अगदी खरं आहे . आता कधी टीव्ही वर ते चित्रपट लागले की वाटतं आपण असे कसे खळखळून हसायचो शाळेत असताना . आताच्या मुलांना फारसं हसू येत नाही लक्ष्याचे चित्रपट बघून .

{{{आताच्या मुलांना फारसं हसू येत नाही लक्ष्याचे चित्रपट बघून .}}}

मध्यंतरी धडाकेबाज पाहिला टीवीवर. एक लक्श्या बाटलीच्या आत. फारसा विनोदी वाटला नाही. शोलेची भ्रष्ट आवृत्ती वाटतो. झपाटलेला मात्र निखळ विनोदी आहे. कितीही वेळा पाहून पुन्हा पुन्हा हसायला येतं. विशेषतः मधू कांबीकरचं काम पाहून.

नया दिन नयी रात बघितला. काही सिन्स कंटाळवाणे असले तरीही, संजीवकुमारच्या विविध भूमिकेतील अभिनयामुळे सुसह्य वाटला. वेड्यांच्या इस्पितळातला सीन फास्ट फॉरवर्ड करावा लागला.

बिपाशाचाही मध्यंतरी अलोन नावाचा भयपट आलेला पण मी अजून पाहिला नाही. तो चारुलता सारखाच आहे का? >>>> हो. पण शेवट वेगळा आहे. दोन्ही चित्रपट एका कोरियन चित्रपटावरुन बेतले आहेत. कथा इतकी वाईट नाहीये, छान आहे. मला चारुलता आवडला अलोनपेक्षा. हा, त्यात काही साउथ इन्डियन स्टाइल्स भडक सीन्स आहेत. पण त्याच्यात मेलेल्या बहिणीच भूत शेवटपर्यन्त दाखवल नाही हे विशेष. 'अलोन' मध्ये मात्र किळसवाण भूत होत. Sad

बिपाशापेक्षा चारुमधल्या प्रियमणीच काम छान झालय. ( ती चेन्नई एक्सप्रेसमध्ये एका आयटम सॉन्गमध्ये होती.) शेवट मात्र पटला नाही.

ऋषिकपूर आणि टीना मुनीमचा एक सिनेमा होता. त्यात टीनावर प्लास्टिक सर्जरी करवून तिला डबल रोल दिलाय. पण त्या दोघीसुद्धा समोरासमोर येत नाहीत असं आठवतं.
सरस्वतीचन्द्र मध्ये जुळा रोल होता का?
'कर्ज'चा उल्लेख यापूर्वी झालाय का?

दोन्ही चित्रपट एका कोरियन चित्रपटावरुन बेतले आहेत. >> कोरियन नाही, मूळ चित्रपट थाई आहे. मूळ चित्रपटाचा शेवट पटण्याजोगा आहे पण करुण आहे. आपल्याकडे असे शेवट खपत नसल्याने तो शेवट बदलला आहे.

>>> ऋषिकपूर आणि टीना मुनीमचा एक सिनेमा होता. त्यात टीनावर प्लास्टिक सर्जरी करवून तिला डबल रोल दिलाय.

ये वादा रहा (तू तू हैं वही फेम)

ऑ ये वादा रहामध्ये पूनम धिल्लोची प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि तिची टीना मुनिम बनते! जुळे, पुनर्जन्म काही नाही त्यात.

ये वादा रहामध्ये पूनम धिल्लोची प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि तिची टीना मुनिम बनते. >>>> बरोबर
त्यात टीनावर प्लास्टिक सर्जरी करवून तिला डबल रोल दिलाय>>>>>>>>>> जरी कुणाची प्लास्टिक सर्जरी केली अत डबल रोल कसा काय देणार? आणि समोरासमोर कसे काय येणार? Uhoh

>>> जरी कुणाची प्लास्टिक सर्जरी केली अत डबल रोल कसा काय देणार? आणि समोरासमोर कसे काय येणार?

आणखी एक मुद्दा असा कि जर प्लास्टिक सर्जरी केली तर चेहरा बदलेल पण उंची कशी कमी झाली? Uhoh

आणखी एक मुद्दा असा कि जर प्लास्टिक सर्जरी केली तर चेहरा बदलेल पण उंची कशी कमी झाली? Uhoh
नवीन Submitted by भोजराज on 19 September, 2018 - 16:28

टाचेची चमडी कापून थोबाडावर चिटकवली की असे होते.

कर्जमध्ये जुळे / डबलरोल कोणाचा आहे? >>>>> कोणाचाच नाही. राजकिरणचा पुर्नजन्म होऊन तो ऋषी कपूर होतो.

सरस्वतीचन्द्र मध्ये जुळा रोल होता का? >>>> क्काय? Uhoh

तू तू हैं वही फेम >>>>> माझ हे फेवरिट गाण आहे. अगदी रिमिक्स झालेल सुद्दा. Happy

टाचेची चमडी कापून थोबाडावर चिटकवली की असे होते. .>>>>> Lol

मूळ चित्रपट थाई आहे. >>>> दुरुस्तीबद्दल धन्स, पायस Happy मूळ थाई चित्रपटाचेही नाव 'अलोन' आहे. हिन्दी आणि थाई चित्रपटाचा शेवट एकच आहे. वाईट बहिण जळक छप्पर डोक्यावर पडून मरते.

पण चारुलताचा शेवट पटला नाही. नवरा वाईट बहिणीला शेवटी बायको म्हणून स्वीकारतो. ( मृत बहिण त्याला तस सुचवते.)

Pages