गणपती

Submitted by prajganesha on 31 August, 2018 - 23:28

आम्हाला घराला सुंदर टेरेस होति जी आम्ही छान सीलिंग घालून मोठ्या खिडक्या घालून एक रूम केली खरतर आमचा तो डायनिंग अरीआ आहे आम्ही या वर्षी गणपती आणत आहोत ती जागा दिशेन सुधा योग्य आहे तर आम्ही गणपती स्थापना तिथे करू शकतो का .
कारण ती एक स्वतंत्र रूम होईल जिथे फक्त गणपती बद्दल च पूजा अर्चना होईल .इथे तिथे कोणाचे हात लागणार नाही पण ती टेरेस होति अस चालेल का

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ताई, तुमच्या घरात काय करायचे ह्याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही जेवढ्याना हा प्रश्न विचाराल तेवढी भिन्न मते मिळतील व डोके भंजळून जाईल.

बाकी देव सर्वत्र असतो. तुम्ही रस्त्यांशेजारी गटाराच्या वर स्टेज बांधून गणपती बसवलेले अद्याप पाहिले नाहीत का?

.इथे तिथे कोणाचे हात लागणार नाही>> कोणाचे हात लागू नयेत? देव सर्वांसाठी आहे. आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे.

रूम कवर्ड असली तर डेकोरेशन खराब हो णार नाही नाहीतर पावसाचा धोका आहे. माझ्यामते गणपती घरातल्या हॉल मध्ये बसवून येणारे व्हिजीटर्स व त्यांना तुम्ही जी डिश प्रसाद वगैरे देतात त्याची व्यवस्था ह्या टेरेस रूम मध्ये करावी. तिथेच काय तो पसारा कचरा होईल.

ते सीलिन्ग चे बांध काम लीगल व मजबूत आहे का? नाहीतर विजिटर्स वर पडायचा धोका असेल तर तसे करू नका.
योग्य ते परवाने घेउन अधिकृत बांधकाम आहे का? जिवाला धोका होउ शकतो म्हणून विचारले.

देव सदैव व सर्वत्र आहे जातात येतात ती माणसेच.

अहो इथे तिथे हात लागणार नाही म्हणजे घरात पांच सहा बायका आहेत कधी कोणाची अडचण असेल तर गणपती वेगळा रूम मधे असेल तर मोठ्या लोकांचा ओरडा कमी जरा बायका ना .टेरेस पूर्णता लीगल आहे कोणावर काही पडण्यास कारण नाही .तेवढी खात्री नसती तर हा वीचार मनात सुधा आणला नसता .मी टेरेस चा प्रश्न फक्त गणपती स्थापना करायचा आहे या वास्तू च्या साइड ने केला , ती जागा हॉल मधे च आहे सर्वांना दर्शन होणारच .

साधना ताई तुमच मत छान आणी योग्य वाटले .दहा डोकी दहा वीचार असले तरी थोडी सकारात्मक उत्तर आणी लोकांचे अनुभव उपयोगी पडतात म्हणून हा प्रश्न केला होता .

साधना ताई तुमच मत छान आणी योग्य वाटले .दहा डोकी दहा वीचार असले तरी थोडी सकारात्मक उत्तर आणी लोकांचे अनुभव उपयोगी पडतात म्हणून हा प्रश्न केला होता .

घरात पांच सहा बायका आहेत कधी कोणाची अडचण असेल तर गणपती वेगळा रूम मधे असेल तर मोठ्या लोकांचा ओरडा कमी जरा बायका ना
>>> धन्य आहात !