इंजेक्शन(अती लघुकथा)

Submitted by धनुर्धर on 31 August, 2018 - 12:59

तापाने विव्हळत तो बेडवर पडला होता. शेजारी बायको तोंडाला पदर लावून बसली होती. तिच्या डोळ्यात काळजी दाटली होती. तेवढ्यात नर्स इंजेक्शन घेऊन आली. "देऊ का इंजेक्शन?, दिडशे रूपये होतील अं!" नर्स त्या बाईच्या फाटक्या अवताराकडे बघत म्हणाली. "संध्याकाळी आणून देते!"बाईने आर्जव केले. इंजेक्शन देऊन नर्स निघून गेली. नवर् याला तिथेच सोडून बाई आपल्या मजूरीच्या कामाला निघून गेली. संध्याकाळी आली तेव्हा तिच्या हातात दिडशे रूपये होते.

Group content visibility: 
Use group defaults