मकरंदाचा मॅक अन जनार्दनाचा जॅक

Submitted by चंबू on 27 August, 2018 - 19:56

मला भारतापासून दूर आता १०-१२ वर्ष झालीयेत. इथल्या चालीरीती आता अंगवळणी पडू बघतायेत. खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे, महिलांचे दागदागिने बरंच काही बदललंय. सणावाराला सोडलं तर इतर दिवशी महाराष्ट्रीयन पोशाख कपाटाबाहेर येत नाही. पण ही झाली इथली गरज. रोम मध्ये रोमन सारखं वागायला हवं अगदी मान्य आहे. विदेशातील संस्कृती प्रमाणे आपल्याला थोडं बदलावं लागणार, ऑफिसात जाता-येतानाचे शिष्टाचार पाळावेच लागणार.
पण आता प्रश्न येतो तो असा; की आपण स्वतःला किती बदलावं ? व्यावहारिकदृष्ट्या सोपे जावे असे कारण देऊन अनेक जण स्वतःच्या नावात बदल करून घेतात. समोर चक्क देशी माणूस असताना आपलया मूळ भारतीय नावाची ओळख देण्याचे टाळतात.

खाणं; पिणं; राहाणं; कपडे अन भाषा सर्व परक्या भूमीला समर्पित करूनही पुढे स्वतःच्या नावात देखील बदल करून घेणे याबद्दल आपले मत काय ?

Group content visibility: 
Use group defaults

मुली लग्न करून परक्या घरी जातात, नावापासून सगळे बदलुन घेतात. यावर काय मत आपले?

तसेच हे समजा. परक्या मुलखाला एकदा आपले म्हटले की बदलांचे काही वाटत नाही. तसे तर सगळे चिनी लोक 2 नावे ठेवतात. एक फक्त चिनी लोकांसाठी, एक इतरांसाठी. त्यांची नावे जास्तीतजास्त दोन अक्षरी असतात, तरी ते बदलतात. मग मकरंद इतक्या लांबलचक नावापेक्षा मॅक बरे. आणि सगळीकडे मॅक म्हणून ओळख झाल्यावर तुम्हाला मकरंद म्हणून सांगण्यात काय पॉईंट? त्या नाबाने कोण ओळ्खते तिथे त्याला?

ज्याचा त्याचा प्रश्न!
बाकी भारतीय लोकांत हे प्रमाण फार कमी आहे. एशियन व्यक्ती नाव न बदललेली अपवादाने दिसेल. आमच्या इथे एक 'अल्ट्रा' असं नाव धारण केलेला आहे. हे नाव का घेतलं हा प्रश्न तोंडावर येऊन गिळून टाकतो दरवेळी. Happy
मकरंद चे मॅक हे नाव बदल नाही तर हाक मारायचं सोपं नाव झालं. छान वाटतं की ते.
मकरंद चे पीटर केलं असेल तर नाव बदललं.

मकरंद चे मॅक हे नाव बदल नाही तर हाक मारायचं सोपं नाव झालं. छान वाटतं की ते.
मकरंद चे पीटर केलं असेल तर नाव बदललं.
>>> +१

मकरंदचं मक्या, प्रकाशचं पक्या, एवढंच कशाला झुकरबर्गचं झुक्यासुद्धा झालेलं चालत असेल तर मकरंदचं मॅक होण्यात काय प्रॉब्लेम आहे? Happy

२०-२५ वर्षांपुर्वि एफोबीजनी असं नावात बदल करणं बर्‍याचदा व्हायचं, हल्ली तसं होत नाहि. देसी जनता वाढली, आणि त्यामुळे त्यांची ओरिजिनल नांव इथे लोकांच्या अंगवळणी पडली - असं काहिसं असेल... Proud

पूर्वी (~१५-२० वर्षे) चिनी लोक इंग्रजी नावे घेत असत. पण हल्लीच्या चिनी लोकांना सर्रास आपले चिनी नाव वापरताना पाहिले आहे. काही नावे उच्चारायला अवघड असतात पण सवयीने जमते. कॅलिफोर्नियासारख्या राज्यात एशियन (अमेरिकत वापरल्या जाणार्‍या अर्थाने), भारतीय, लॅटिनो असे लोक बहुसंख्य असल्यामुळे हे रुळलेले आहे.

पण भारतीय नावांची असे इंग्रजी वाटणारी शॉर्ट व्हर्जन भारतातही केली जाते की. आमच्या कॉलेज मधे बरेच सॅम, जेजे, मॅक वगैरे होते.

> we dont really care. its your life. your name. > Lol Lol

पण तरी नेमसेक चित्रपट आठवला.

खाऊजानंतर गेलेलं भारतीय नाव बदलत नसावेत. त्याआधीच्या पिढीचं काय? माबोवर आहे का कोणी नाव बदलेला/ली?

खाऊजा म्हणजे काय?

"माबोवर आहे का कोणी नाव बदलेला/ली?" - इथे लोकं टोपण नावं घेऊ-घेऊ लिहीतात, तिथे ह्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देणं म्हणजे, स्वतःच्याच हातानं स्वतःचा पडदा दूर करण्यासारखं आहे.

एक झाले ओल्ड फॅशन
मकरंद हे ओल्ड फॅशन नाव असल्याने मॅक होते. अगदी समीरचेही सॅम होते.

दुसरे झाले व्यावसायिक डिमांड
एकेकाळी युसुफ खानला दिलीप कुमार नाव घ्यावे लागलेले. आणि असे कैक खान असतील. कारण खान नावापेक्षा कुमार कपूर खन्ना नावाला बॉलीवूडमध्ये ग्लॅमर होते.
आता मात्र तीन खान सुपर्रस्टार्सनी चित्र असे बदललेय की खान हे आडनाव ब्रांड बनलेय. आता ते मुद्दाम ठेवत असावेत.

तिसरे झाले नाईलाज.
माझ्या दोन मित्रांची नावे त्यांच्या आजोबांवरून ठेवलेली होती.
एकाचे आत्माराम तर एकाचे पांडुरंग.
त्यामुळे त्यांनी आपली टोपणनावे, अनुक्रमे राजू आणि सोनू हीच घरदार कॉलेज ऑफिस सगळीकडे चालवली होती. फार कमी लोकांना यांची मूळ नावे माहीत होती.

> खाऊजा म्हणजे काय? > खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. १९९१ नंतर.

> इथे लोकं टोपण नावं घेऊ-घेऊ लिहीतात, तिथे ह्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देणं म्हणजे, स्वतःच्याच हातानं स्वतःचा पडदा दूर करण्यासारखं आहे. > Lol हम्म तेपण आहेच म्हणा.