ह्या पुस्तकाचे नाव व लेखक हवे आहेत

Submitted by sneha1 on 24 August, 2018 - 12:09

मी कॉलेज मधे असताना एक जुने मराठी पुस्तक वाचले होते. साधारण अशी कथा होती. कथेतल्या मुलीला एक मुलगा बघायला येतो. त्यचा मित्र खूप सभ्य असतो, पण मुलगा खूप बडबड करणारा,वव्चावचा खाणारा असा असतो. मुलीचा गैरसमज होतो की जो चांगला आहे तोच बघायला आला आहे. लग्नाच्या वेळी ते कळते, पण जुना काळ असल्यामुळे ती बोलत नाही. नंतर केव्हातरी शेतातले वानर मारताना चुकून त्या मित्राची गोळी या मुलीच्या नवर्‍याला लागते आणि तो मरतो. मित्राला शिक्षा होत नाही, पण तो मनाने उध्वस्त होतो आणि शेवटी नायिका त्याच्याकडे जाते असे काहीसे. कोणी सांगू शकेल का पुस्तकाचे नाव आणि लेखक? जु न्या कोकणातली गोष्ट आहे बहुधा.
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडघवली फार पूर्वी वाचलीय पण त्यात असं काही कथानक आहे आठवत नाहीये. त्यावर कुछ खोया कुछ पाया ही सिरीयल पण बघितली आहे, त्यातही आठवत नाहीये, असं काही दाखवल्याचं.

मला 'शीतू'वाचायची आहे,pdf आहे का कोणाकडे?असेल तर प्लिज लिंक द्या न.

धन्यवाद अदीजो...
खूप पूर्वी वाचलेलं ते पुस्तक नाव विसरलेली बहुतेक मी देखील.. पुन्हा एकदा वाचावं लागेल Happy

अदिजो, खूप खूप धन्यवाद ! मला नाव आठवत नाहीच, पण आता तुम्ही सांगितल्यावर नावं आठवली.
बरं, अशी जुनी पुस्तकं कुठे ऑनलाईन मिळतील आता? गेला बाजार पुण्यात तरी? कोणातरीकडून मागवता येईल का बघते.

परफेक्ट आदीजो! मला फक्त माधव आणि विनू नावं आठवत होती आणि नायिकेची एक ज्यू मैत्रीण असते हेही. पुस्तकाचे नाव काही केल्या आठवत नव्हते.