ती तू असावी.

Submitted by अतुल असवले on 20 August, 2018 - 00:00

सकाळी उठल्यावर जिचा चेहरा बघावसा वाटतो ती तू असावी.
गरम गरम चहा सोबत स्माईल देणारी ती तू असावी.
ऑफिस ला जाताना "संध्याकाळी लवकर या" अस म्हणारी ती तू असावी.
विसरलेल्या गोस्टी ची आठवण करून देणारी ती तू असावी.
भांडण झाल्या वर आपली चूक नसताना ही लगेच सॉरी म्हणारी ती तू असावी.
विश्वास म्हणताच जिचा चेहरा समोर यावा ती तू असावी.
कामावरून घरी आल्या वर हास्य चेहेऱ्या ने स्वागत करणारी ती तू असावी.
हसण्या पाठच दुःख आणि शांततेच्या पाठच कारण ओळखणारी ती तू असावी.
म्हातारे झाल्यावर हातात काठी ऐवजी जिचा हाथ हातात असावा ती तू असावी.
क्षणो क्षणि जिच्या सोबत असण्याची जाणीव व्हावी ती तू असावी.
आयुष्याचा शेवटच्या क्षणी "मला सोडून कुठे जाताय?" अस विचारणारी ती तू असावी।

खरच कोणी तरी अशी असावी.

- अतुल लक्ष्मण असवले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users