तुमची अंधश्रद्धा कोणती ?

Submitted by प्रकाशपुत्र on 15 August, 2018 - 23:58

मित्रहो आज एक विचार मांडतोय. आपण इतिहासात वाचायचो की आपले पूर्वज अंधश्रद्धा पाळायाचे. उदा. सती प्रथा, अस्प्रुश्यता, बळी, वगैरे. मी नेहमी विचार करायचो की ते एवढे मागास कसे होते ? त्यांना समाजसुधारकानी सांगेपर्यन्त हे का कळले नाही की या अंधश्रद्धा आहेत ? आपले पूर्वज काही आपल्यापेक्षा मुर्ख नव्हते, मग असे का ? मग लक्षात आले की त्या त्यांच्या श्रद्धाच होत्या जोपर्यंत समाजसुधारकानी त्या अंधश्रद्धा आहेत हे दाखवले नाही तोपर्यंत.

आज आपल्याला वाटतं कि पूर्वीच्या सती, विधवांचे केशवपन करणारा, बालविवाह करणारा समाज किती मागासलेला होतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही कि बहुसंख्य लोकांचा त्यावेळी ह्या रूढींना पाठिंबा होता. त्यावेळी काही सुधारकांनी या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला तेंव्हा त्या सुधारकांना समाजाचा खूप त्रास सोसावा लागला. (तेव्हा जर whatsapp असते, तर कदाचित whatsapp वरून आपणच ह्या रूढी कशा बरोबर आहेत आणि सुधारक कसे चुकीचे हे सांगणारे messages पाठवले असते.) म्हणजे सती सारखी एखादी गोष्ट जी आज सगळ्यांना चुकीची वाटतीय ती १०० वर्षांपूर्वी बहुसंख्य लोकांना बरोबर वाटत होती. तसेच आज जी रूढी आपल्याला बरोबर वाटतीय ती १००% चुकीची असू शकते. त्यामुळे आपण ज्या रूढी, परंपरा पाळतो त्या किती डोळस पणाने पाळतो ते आपणच ठरवले पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्या या आपल्याला मागासच म्हणतील

आता विचार करा तुमची अंधश्रद्धा कोणती ? अंधश्रद्धा म्हणजे कोणतेही पुरावे किंवा प्रमाण नसताना बाळगलेली श्रद्धा. शंकराने देव असताना गणपतीचे मुंडके छाटले पण तेच मुंडके तो परत तिथे का बसवु शकला नाही. त्याने मग हत्तीचे शीर माणसाला बसवले ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? पार्वतीच्या मळा पासून गणपती जन्माला आला ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? जेंव्हा जेंव्हा परकीय आक्रमकांनी हल्ला केला, त्यांनी आपली देवळे, देव तोडले. जो देव स्वता:ला वाचवू नाही शकला, तो आपल्याला मदत करेल ही श्रद्धा ? पोलिसांच्या गराड्यातला लालबागाचा राजा तुमची कष्टे दुर करेल ही श्रद्धा की अंधश्रद्धा ?

तुम्ही स्वता:ला पुरोगामी समजता तर कुणी समाजसुधारक या अंधश्रद्धा आहेत हे दाखवेपर्यंत गप्प बसणार की स्वत:च विचार करून जीवनाची दिशा बदलणार ?

-- प्रकाशपुत्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रती : प्रकाश घाटपांडे

तात , खरं आहे तुमचे म्हणणे, श्रद्धा म्हणजे तर्क बाजूला सारून ठेवलेला विश्वास. त्यामुळे जर श्रद्धा म्हणजे पितांबर तर अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर .

मी श्रद्धेबद्दल पण लेख लिहिणार होतो, पण म्हणलं मायबोलीवरचा पहिलाच लेख एकदम ज्वलंत नको.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रकाशपुत्र, आपल्या मते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात तत्वतः काही फरक आहे की आजची श्रद्धा ही उद्याची अंधश्रद्दा आहे असे आपणास म्हणायचे आहे?

शनिवारी नखे व केस न कापणे..... का तर म्हणे माझा जन्मवार!! लहानपणी आईने भयन्कर ब्लॅक मेल करुन ही गोष्ट पाळायला भाग पाडली!

देवळं आणि गणपती इ. नेहमीच्या यशस्वी अंधश्रद्धा बद्दल लिहायला फार काही अभ्यास, ज्ञान लागत नाही हो आजकाल. कोणीही उठतो आणि लिहितो, it's fashionable and properly funded industry Happy जरा आंधळा बघायला लागला, मुका बोलायला लागला, पांगळा चालायला लागला बद्दल काही माहिती काढून, अभ्यास करुन लिहिलेत तर बघू Happy

कठोर नास्तिकाचार्य यनावाला यांचे जालीय लेखन रवंथ करण्यासाठी देत आहे.
अंगारकी चतुर्थी
http://mr.upakram.org/node/3844

गॅस गणराज
http://mr.upakram.org/node/3941

गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789

विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719

कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645

त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597

महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579

ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526

चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474

बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379

अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356

बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362

देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323

उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313

अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276

भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161

ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928

यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883

हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820

गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525

कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503

विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580

भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388

सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450

सदसद्विवेक बुद्धी
http://www.misalpav.com/node/17008

दैव जाणिले कुणी |
http://www.misalpav.com/node/17364

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा
http://www.misalpav.com/node/21383

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
http://www.misalpav.com/node/24886

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
http://www.misalpav.com/node/33424

मंत्रसामर्थ्य
http://www.misalpav.com/node/33686

भावना दुखावणे
http://www.misalpav.com/node/33757

माझी भूमिका
http://www.misalpav.com/node/33826

आस्तिक वैज्ञानिक
http://www.misalpav.com/node/33950

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
http://www.misalpav.com/node/34081

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
http://www.misalpav.com/node/34344

श्री.जपे यांचा युक्तिवाद
http://www.misalpav.com/node/34727

विज्ञानदिनाच्या निमित्ताने
http://www.misalpav.com/node/35123

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
http://www.misalpav.com/node/41229

अठ्ठावीस लक्ष रुपये
http://www.misalpav.com/node/41400

आनंददायी इहलोक
http://www.misalpav.com/node/41497

श्रद्धेमुळे विकृती
http://www.misalpav.com/node/41567

भाव तेथे(च) देव:......यनावाला
http://www.misalpav.com/node/41667

मानवी ज्ञानभांडार
http://www.misalpav.com/node/41745

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
http://www.misalpav.com/node/41821

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
http://www.misalpav.com/node/41913

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
http://www.misalpav.com/node/42032

मूलभूत नीतितत्त्वे
http://www.misalpav.com/node/42134

कटप्पांच्या धाग्यावर लिहील्यात की सगळ्यांनी सगळ्यांच्या अंधश्रद्धा. काही एक्स्ट्रापण आहेत तिथे.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व

हा माझा मायबोलीवरचा पहिलाच लेख. गेले काही वर्षे मी लिहितोय, पण ते "स्वान्त: सुखाय" प्रकारचे. कधी ते छापून आणावे असे वाटले नाही (माझे लिखाण पाहून काहीजण म्हणतील कि तोच निर्णय कायम ठेवा म्हणून ). पण मायबोली आवडली आणि काही लेख यावर टाकत जाईन .

मला वाटते कटप्पांचा धागा होता ज्यात ज्याने त्याने आपापल्या अंधश्रद्धा लिहायच्या होत्या.
हा एक लेख आहे. लेखकाने एक विचार मांडला आहे की आज आपण ज्याला सर्रास श्रद्धा समजतो त्या गोष्टी आणखी काही वर्षांनी अंधश्रद्धा म्हणून गणल्या जाणार आणि ती पिढी आपल्याला अशीच हसणार जसे आपण त्या सती काळाला हसायचो.

असो, विषयावर बोलायचे झाल्यास, जोपर्यंत या जगात देव ही संकल्पना आहे तोपर्यंत नवनवीन श्रद्धा अंधश्रद्धा हे चक्र चालूच राहणार.

"एक" माणूस सुधारेल ही माझी मायबोली वरची अंधश्रध्दा. Rofl
"अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है" शाखा स्पेशल Wink

माझी अंधश्रध्दा श्रध्देत बदलते आहे. "तो" बदलतो आहे. .....

श्रद्धा म्हटले की ती अंध आहे की डोळस याला चर्चेला काही अर्थ नाही. विज्ञान पुरावे मागते व सर्व जगभर ते पुरावे तेच रिझल्ट देणार ही अपेक्षा ठेवते, श्रद्धेला जे पुरावे दिले जातात ते पुरावे कुठल्या परिस्थितीत खरे ठरणार हे पुरावे देणारेच ठरवतात.

तरीही जगभरचे लोक कशा ना कशावर तरी श्रद्धा ठेवतात. पाश्चिमात्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन व पौर्वात्य म्हणजे अंधश्रद्ध ही सुद्धा अंधश्रद्धाच. जगातील अब्जावधी लोकांपैकी फक्त एकाला श्रद्धेने उर्फ चमत्काराने बरे केले यावर विश्वास ठेवून बरे करणाऱ्या व्यक्तीला संत घोषित केले जाते, घराण्यात येणाऱ्या सुनेचा आपल्या श्रद्धेप्रमाणे परत बाप्तिस्मा केला जातो. हे सगळे एकविसाव्या शतकात पाश्चिमात्य देशात घडते.

हे घडते कारण धर्म ही माणसाची गरज आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या श्रद्धा त्याला हव्या आहेत. तसे नसते तर सोविएत युनियन खालसा झाल्यावर लगेच परत धर्माने डोके वर काढले नसते. लोकांनी धर्माला नाकारले असते.