स्त्री

Submitted by शब्दरचना on 8 August, 2018 - 20:48

थांब! अशी ह्या आरशासमोर ,
निरखून बघ स्वतःला खरंच
गरज आहे का तुला कोणाची?

तुझी तुच पडलीस
पुन्हा स्वतःच उभी राहिलीस
तो होता....ते होते...
पण वादळातली परवड
तुझी तुच झेललीस

मग कर ना आता मान्य
तुझी तु खंबीर आहेस
स्त्री म्हणूनी तुही
अलौकिक शुर आहेस !!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults