माझी लेखणी

Submitted by विवेक मोकळ on 6 August, 2018 - 06:21

लेखणीला माझ्या अजून
कुठे लागली वेदनेची झळ
दाहक वास्तव मांडताना
अजूनही काढते ती पळ,

तीही देत असते यातनेच्या
त्रासाची कर्कश आरोळी
तिच्यातून मात्र बनली नाही
अजूनही ह्रदयस्पर्शी चारोळी,

सर्वांनाच देत असते लेखणी
वैचारिक भावनेचे मोठे बळ
तिने मात्र माझ्या काळजात
अजूनही ठोकला नाही तळ,

प्रेमात तिच्या पडून पडून
कित्येकदा झालो मी थक्क
तिने मात्र मालकी गाजवण्याचा
अजूनही मला दिला ना हक्क,

दृष्ट विचारात पडावा प्रकाश
म्हणून तिने केले शब्दांचे वार
तिने मात्र काळीज जखमेचा
अजूनही माझा भरला ना घाव...
==========©विवेक मोकळ
#art_by_me

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users