<< आलिया >>

Submitted by _आनंदी_ on 5 August, 2018 - 00:29

थोड्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एवढी मोठी रेंज दाखवणारी आलियाच्या असेल..
स्टुडन्ट ऑफ द इयर : यात ओके च वाटली पण दिसली खूप छान आणि फ्रेश..
हायवे : एक ना एक एक्स्प्रेशन सही.. छान छोटी मस्त गोड ..
उडता पंजाब : __/\__ ही फिल्म तिने स्वीकारली यातच सगळं आलं
डियर जिंदगी.. त्रासलेली कॉन्फयुज्ड आलीय ते सोर्टेड आलिया..किंवा कायरा च .. सही .. शाहरुखला पण कॉन्फिडन्टली टक्कर दिलीये तिने.. यात शाहरुख पण मस्तच..

कपूर अँड सन्स :- स्वीट इसि गोइंग
राझी :- काय बोलू.. बऱ्याच दिवसांनी सिनेमा पाहिला आणि खूप वेळ डोक्यात रेंगाळत राहिला.. बऱ्याचदा मुव्ही बघून मॉल मध्ये फिरणं होत आणि सिनेमा विसरून पण जातो तासाभरात .. हा मात्र खूप दिवस डोक्यात राहिला ..ती आलीय ना वाटता सेहमतच वाटलीये.. खूप सुंदर पण दिसलीये..

चला बोलूया मग आलिया बद्दल

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तिचा अभिनय ऊत्तमच वाटला नेहमी. मग तिच्याविषयी असे विचित्र विनोद का होत होते? ‘ऊडता पंजाब’मध्ये चांगलं काम केलय तिने असे एकाला म्हणालो तर त्याने ‘किव’ आल्या नजरेने पाहिले माझ्याकडे. कमाले!

मलाही आलिया खूप आवडते☺️
रादर सध्या ही एकटीच अशी आहे जिच्यासाठी मुव्ही आवर्जून पाहते, तेही थेटरात, नाहीतर हल्ली लगेच मिळतात मुव्ही मोबाईल मध्ये तेही नाही पाहत शक्यतो

<<<डियर जिंदगी.. त्रासलेली कॉन्फयुज्ड आलीय ते सोर्टेड आलिया..किंवा कायरा च .. सही .. शाहरुखला पण कॉन्फिडन्टली टक्कर दिलीये तिने.. यात शाहरुख पण मस्तच..>>>>> नाही हा, माझ्यासाठी डियर जिंदगी म्हणजे फक्त अन फक्त आलिया☺️ शरूखच्या जागी इतर कोणी असता तरी फारसा फरक नसता पडला

‘ऊडता पंजाब’मध्ये चांगलं काम केलय तिने असे एकाला म्हणालो तर त्याने ‘किव’ आल्या नजरेने पाहिले माझ्याकडे. कमाले!>>>>> त्याला उडता पंजाब कळला नसेल... कसले काम केलंय तिने... ती मोडक्या घरात लपते व तिथे शाहिद लपायला येतो त्यानंतर तिच्या व शाहिदच्या दृश्यात तिने कसली कमाल केलीय..

STudent ऑफ द इयर नंतर तिच्यावर खूप जोक आले होते..

STudent ऑफ द इयर नंतर तिच्यावर खूप जोक आले होते.. << ते तिने कॉफी विथ करण मधे गुफ अप केले तेव्हा.

मला आलिया हाय वे, उडता पंजाब आणि राझीमधे आवडली. बाकी ओके ओके होते.

कॉफी विथ कारण मध्ये पंतप्रधान कोण यावर तिने चुकीचे उत्तर दिले त्यानंतर ते जोक्स सुरु झाले..
तिने सपोर्टींगलीच घेतलाय पण ते सगळं

Humpty sharma आणि बद्रीनाथ ki dulhaniya राहिलं की.
बद्रीनाथ ची दुल्हनिया जास्त छान वाटली. तिच्यामुळे वरुण धवनची ओवरअॅक्टिंग सुसह्य झाली असं मी तरी म्हणेन.
आलियाला परिणिती चोप्रासोबत बर्याच वेळा compare केलं जातं. आणि परिणिती तिच्यापेक्षा जास्त चांगली अभिनेत्री आहे असं म्हणतात. मला आलिया जास्त चांगली वाटते. तिच्या एकूण अभिनयाचा ग्राफ चढता आहे. प्रत्येक सिनेमामधे आधीपेक्षा जास्त छान काम करते ती. परिणितीला कदाचित तेवढे चांगले प्रोजेक्ट ऑफर झाले नसतील. पण तरीही.
आणि वर आलियाची स्माइल तर जाम क्युटच आहे. वयाने लहान आहे तर थोडा अवखळपणा असणारंच. तिच्यावर तो शोभून दिसतो.

टु स्टेट्स राहिला. यात तिचे कॉश्च्युम्स मस्त आहेत. तिचे राझी, हायवे, उ. पं., डिअर जिंदगी मधले काम मला फार आवडते.

>>>तिच्या एकूण अभिनयाचा ग्राफ चढता आहे. प्रत्येक सिनेमामधे आधीपेक्षा जास्त छान काम करते ती>>> 1111
माझी आवडती.
राझी हायवे मधे उत्तम अभिनय केलाय.
आप की अदालत मधे पन चांगले प्रतिसाद देत होती.
तिच्यावर जळणारे टीका करत असतील. ॲगदि कमी वयात अभिनयाची उंची गाठली आहे.

धन्यवाद ह्या धाग्याबद्दल. off screen अल्लड अवखळ बेफिकिर वाटणारी ही मुलगी भुमिकेत शिरते तेव्हा प्रत्येक भुमिकेचं सोनं करते. student of the year मधे माझ्यासाठी ती फक्त "one more industry kid" होती. पण मग नंतर हाय वे , टू स्टेट्स, हंप्टी शर्मा..., उडता पंजाब, डिअर जिंदगी, आणि आता राझी...
राझी पाहिल्यानंतर तिचे बरेच ivs पाहिले yt वर. offscreen देखिल ती आता खूपच mature वाटते पहिल्यापेक्षा. she should work more with actors like vicky kaushal and randeep hooda. they complement her better. otherwise हीरो category मधली लोकं तिच्यापुढे लक्षातच रहात नाहित.

माझं अस निरिक्षण आहे कि तिने साकारलेल्या भूमिका स्वतःच करूण आणि सहानुभूती जिंकणार्या आहेत. व्यक्तिरेखेच्या सगळ्या भावना प्रसंगातूनच ठळकपणे उध्रुत होतात. त्यामुळे साधारणपणे उत्तम अभिनय जमणार्या कोणीही केल्या तरी समर्पक ठरल्या असत्या.
पण काही भूमिका या अभिनयातून आणि अभिनेत्याने अनुसरलेल्या लकबीतून उभ्या राहतात , प्रसंग असे फार काही स्वतःहून भावनाप्रधान नसतात. तिथे कसोटी असते अभिनेत्याची. त्यामुळे व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे स्वभावविषेश नसलेल्या , भावभावनांचे कंगोरे नसलेल्या व्यक्तिरेखा साकारणे अव्हानात्मक असते.
तसा रोल तिला अजून मिळालेलाच नाही .

मस्त धागा ...
हायवे, उडता पंजाब , डिअर जिंदगी , टू स्टेट्स आणि राझी!!!तिचा ग्राफ दिवसेंदिवस चढताच आहे!!
I like her a lot...
Looks and Acting both Good