मायबोली गणेशोत्सव २०१८ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 2 August, 2018 - 23:26

मायबोली गणेशोत्सव २०१८ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला स्पर्धा आणि उपक्रमात भाग घ्यायला आवडते. आयोजकांना शुभेच्छा. स्वयंसेचकांचे आभार. स्पर्धेचे युग आहे. छान छान स्पर्धा घ्या. जास्तीत जास्त लोकं सहभागी होवोत.

दीव, काही कुणाला कुठे भेटायला जायची गरज नसते ओ, वर दिल्याप्रमाणे जरा वेळ देऊ शकत असाल आणि इंटरनेट असेल तर तुम्ही स्वयंसेवकगीरी करू शकाल.