लंगर का करी.. बंदिशीमध्ये लंगर चा अर्थ काय आहे..?

Submitted by Bhaskar Amrutwar on 2 August, 2018 - 02:38

नमस्कार,मी भास्कर अमृतवार, नांदेड.
लंगर का करी.. बंदिशीमध्ये लंगर चा अर्थ काय आहे..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या माहितीनुसार त्याचा अर्थ 'पायाला जखम झालेली' असा आहे.

लंगर का करिया
जिन मारो लंगर
अंगवा लग जाये
लंगर का करिया

म्हणजे ' पायास लागलेली ती काय करेल, बिचारी सजणाच्या मिठीत गेली ' असा काहीसा अर्थ आहे असे मी ऐकले आहे. पुढे मग

सुन पावे मोरी सास नंदिया
दौडी दौडी घर आये

म्हणजे ती कोणी ऐकेल ह्या भीतीने लंगडत असली तरी पळत पळत गेली, असे काहीसे होते.

ही सर्व ऐकीव माहिती आहे. मी ह्यातला अधिकारी व्यक्ती नाही.

ते 'लंगर काँकरिया जी ना मारो' असं आहे - म्हणजे 'लंगड्या (कृष्णा), (माझ्या घागरीवर) दगड मारू नकोस' असं असावं.
(काँकरिया = कंकर = छोटा दगड)

स्वातीजी ,
शब्दांची फोड करून अलगद्पणे सहज अर्थ उलगडलात ! खरच किती सोपं होतं ... पण तुम्हाला अचूक दिसल !

स्वाती धन्यवाद, लंगडा हा अर्थ बरोबर वाटतो आहे. बाफ बघितल्या पासून मालिनीबाईंची लंगर सुर कथिन .. डोक्या त घुमत होती. लहान पणी घरी हजारो चीजांची पुस्तके व दोन संगीत तज्ञ हाताशी होते. अश्या चर्चा कायम चालत.

ते 'लंगर काँकरिया जी ना मारो' असं आहे - म्हणजे 'लंगड्या (कृष्णा), (माझ्या घागरीवर) दगड मारू नकोस' असं असावं>>>>> बरोबर आहे हेच!