पहिली ट्रेक - भीमाशंकर हिल्स

Submitted by सुमित बागडी on 1 August, 2018 - 08:58

लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मी आधीच होणाऱ्या चुकांबद्दल माफी मागतो.
तसा मी गिर्यारोहण या विषयामध्ये अजूनही नवीनच आहे. मायबोलिवर अनॆक दिग्ग्ज गिर्यारोहक आणि त्यांचे लेख पहिले, वाचले. कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या घाटवाटा आणि त्यांचं वर्णन वाचताना फारच मजा येते. ते लेख वाचताना आपण जणू काही तिथेच आहोत असा भास मला नेहमी होतो. या घाट वाटा कारण्याचा योग कधी येईल कोण जाणे. पण आयुष्यात एकदा तरी स्वतःला वेळ देऊन अशी ठिकाण आपण केलीच पाहिजेत असा मला वाटतं. जेमतेम ४-५ गड किल्ले आणि घाटवाटा करण्यापर्यंतच माझी मजल गेली आहे.
सगळ्यात पहिली ट्रेक मी केली ती म्हणजे भीमाशंकर, जिथे मी आजहि दरवर्षी श्रावणात जातो. भीमाशंकरला निसर्गाचा वरदहस्त आहे असाच म्हणायला पाहिजे. पावसाळ्यात इथल्या काड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे दृश्य जबरदस्त असते. जिकडे पाहावे तिकडे गर्द हिरवळ. पावसाळ्यात इथला निसर्ग आपल्या सौंदर्याच्या सर्वोच्च शिखरावर असतो.
कधीकाळी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी भटकत असताना भीमाशंकर बद्दल ऐकले होते. तेव्हाच तिथे एकदातरी जाऊन येईन असं ठरवलं. तसा मित्रांसोबत प्लॅन ठरला. १५ ऑगस्ट २००९ च्या दिवशी आम्ही भीमाशंकर ला जायचं ठरवलं. आधी कधीच अशा ठिकाणी गेलो नसल्याने घरच्यांना सुद्धा काळजी वाटत होती. आमच्या आजूबाजूचे ४-५ सिनियर मित्र माझासोबत होते. माझ्याआधी अनेक वेळा ते भीमाशंकर ला जाऊन आले होते.
आम्ही दादर वरून शेवटची कर्जत लोकल पकडणार होतो. दादरला आम्हाला अजून १५-२० जण जॉईन झाले. त्यात माझ्यासारखे काही नवखे शवखे सुद्धा होते. रात्री १२-१२:३० ची कर्जत लोकल पकडून आम्ही दोन - अडीच तासात कर्जत ला पोचलो. तिथून आम्हाला खांडस या गावात जायचे होते. खांडस हे भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेले छोटे टुमदार गाव आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी आधी याच गावात यावे लागते. रात्र असल्याने आम्हाला खांडस पर्यंत एस. टी. सकाळीच मिळणार होती म्हणून आम्ही पहिली एस. टी. येईपर्यंत स्टॅन्डवरच रात्र घालवली. हळूहळू आमच्या सारखेच भीमाशंकर ला जाणारे बरेच गिर्यारोहक स्टॅन्ड वर येऊ लागले. बघता बघता रात्रीच्या त्या वेळी स्टॅन्ड पूर्ण गजबजून गेला होता.
सकाळची पहिली एस.टी आली आणि अर्धा पाऊण तासातच आम्ही खांडस ला पोचलो. अजूनही पूर्णपणे उजाडले नव्हते त्यात पावसाळी हवामान आल्याने हवेत फारच आल्हाददायक गारवा जाणवत होता. खांडस गावापासून भीमाशंकरच्या मुख्य पायथ्याशी जाण्यासाठी थोडी पायपीट करायला लागली. एका छोट्या नदीवरवचा पूल पार केल्यावर आम्हाला उजविकडे वळून गणेश घाटाकडे जायचे होते. तसं भीमाशंकर ला जायला दोन वाट आहेत, एक म्हणजे गणेश घाट आणि दुसरी म्हणजे गिर्यारोहकांची आवडती शिडी घाट रास्ता. शिडी घाटावर नावाप्रमाणेच ठीक ठिकाणी शिड्या ठेवल्या आहेत असे ऐकून होतो. आमच्यापैकी कोणीच त्यावेळी शिडी घाटाने गेले नसल्याने आम्ही त्या वाटेने न जात नेहमीचा गणेश घाटाचा रास्ता निवडला.
थोडीशी चढाई केल्यावर मधेच गणपती चे सुंदर टुमदार मंदिर लागते. याच मंदिरामुळे या रस्त्याला गणेश घाट असे नाव पडले आहे. पुढे हाच गणेश घाट आणि शिडी घाट एका छोट्या पठारावर येऊन मिळतात. गणेश घाटावर ठीक ठिकाणी रास्ता दाखवणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत ज्या रात्रीच्या वेळी येणाऱ्या गिर्यारोहकांसाठी खूप उपयुक्त पडतात. ज्याठिकाणी शिडीघाट आणि गणेश घाट एकत्र येतात त्याठिकाणाहून पुढे सुरु होते खडी चढाई. पहिल्यांदाच अशा ठिकाणी आल्यामुळे आणि काहीच अनुभव नसल्याने त्या चढाईने अक्षरशः माझा जीव काढला. माझा मित्र संदीप मला अदे मध्ये मंदिर जवळच आहे असा सांगून प्रोत्साहन देतच होता (नंतर मी सुद्धा खूप लोकांना असेच प्रोत्सहन देत ट्रेक पूर्ण करवला आहॆ) नंतर लक्षात आला कि ते एक प्रकारच गाजर होतं. नवख्या ट्रेकर्स साठी हे गाजर खूप उपयोगी पडतं.
शेवटी पडत धडपडत आम्ही भीमाशंकरच्या मंदिरात जाऊन पोचलो. मंदिरात दर्शन वैगेरे घेऊन आजूबाजूला बाजारपेठेत फिरुन नाश्तापाणी करून आम्ही परतीच्या वाटेल लागलो. ज्या वाटेने आलो त्यावाटेनेच जायचंय हे ऐकून मला धडकी भरली होती. अशी भीती प्रत्येक नवीन गिर्यारोहकाला वाटते. उतरणीला सुरुवात केल्यावर माझ्या लगेचच लक्षात आले कि चढाई पेक्षा उतरणी खूपच कठीण असते. चढाई करण्यातच आपली अर्धी ताकद गेलेली असते त्यात परत थकलेल्या घुडग्यांवर ताण देत उतरायच असतं. रविवार असल्याने अनेक हौशी पर्यटक तिथे आले होते आणि त्यामुळे गर्दी खूपच वाढली होती. आधीच अरुंद वाट त्यात वादात चाललेली गर्दी, त्यामुळे आम्हाला उतरायला बराच वेळ लागत होता. दम काढणाऱ्या चढाईचा भाग उतरल्या नंतर आम्ही मोकळ्या मैदानात आलो तेव्हा तेथे तर जणू काही जत्राच फुलली होती. बरीच मंडळी नाश्ता पाण्यासाठी त्याठिकाणी थांबली होती (आणि तेवढाच आजूबाजूला कचरा करत होती ). आम्ही न थांबता सरळ खाली चालत राहिलो आणि थांबलो ते थेट छोट्या पण सुंदर धबधब्याजवळ. आमच्या आधी बरीच मंडळी त्याठिकाणी दबा धरून होती. आमचा नंबर येईपर्यंत आम्ही वाट पाहिली आणि मनसोक्त धबधब्यावर भिजून अंघोळ करून पुन्हा खाली उतरू लागलो. दुर्दैवाने त्या धबधब्यावर दरड कोसळल्याने आता त्याठिकाणी फारच कमी पाणी राहिले आहे, किंबहुना तो धबधबा नाहीसाच झाला आहे.
पुन्हा खाली गणपतीचे मंदिर आले तेव्हा कुठे हायसे वाटले. आमच्या आधीच आमच्यासोबत आलेले काही लोक पोचले होते. आम्हीच सगळ्यात शेवटी पोचलो होतो. आता मात्र पायांवर प्रचंड ताण जाणवत होता, धड चालवत हि नव्हते. चालता चालता माझा मित्र संदीपने थांबवून मला सांगितले कि पाठी वळून बघ तू कुठपर्यंत गेला होतास. ते दृश्य बघून मला खरोखर रडूच कोसळले होते. माझा माझा डोळ्यांवर विश्वासच बसता नव्हता कि मी इतक्या वर पर्यंत जाऊन आलोय. तो क्षण खरोखरच अविस्मरणीय होता, माझासाठी आणि माझासाख्या नवख्यांसाठी. त्याठिकाणी खरोखर तुमच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचा कस लागतो. त्यानंतर मी ८ वेळा भीमाशंकर जाऊन आलोय. प्रत्येक वेळी कोना नवख्याला सोबत घेऊन गेल्यावर मला माझा पहिला अनुभव आठवतो आणि त्यावर खूप गप्पा रंगतात. आज मला भीमाशंकरची ती पायवाट आपल्या घरचीच पायवाट असल्याप्रमाणे भासते. हे शरीर जो पर्यंत साथ देत राहणार तो पर्यंत मी येथे येत राहणार हे नक्की.

(पहिलाच लेख असल्याने आणि लिखाणाची अजिबात सवय नसल्याने मराठीत काही चुका घडल्या असतील तर क्षमस्व )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! असेच लिहीत रहा व जमल्यास फोटो पण टाका. आमच्या घरचे पण असेच उड्या मारत गेले होते भिमाशंकरला. मला आता न्या म्हणले तर तोंडातुन शब्द फुटत नाही त्यांच्या. Angry

केवळ सुटी न घेता भटकंती होते म्हणून आदल्या दिवशीची रात्रीची गाडी - दुसरे दिवशी जाऊन परत येणे हाच कार्यक्रम खूप जणांचा असतो. त्याच दिवशी फार गर्दी होते.
अनुभव आवडला.

धन्यवाद योगेश दादा, तुझे लिखान मला खूप आवडते आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन मी सुद्धा लिहायचं ठरवलं आहे. तुझे ट्रेकिंग चे अनुभव खूप मस्त आहेत . एकदा तरी तुझ्यासोबत ट्रेक करावी अशी इच्छा आहे.

अरे बापरे ! सुमित.... सह्याद्री आहेच तेवढा प्रेरणादायी आपण तर निमित्तमात्र, लिहित रहा.. भेटू एखाद्या ट्रेकला.