आयुष्य नागमोडी वळण हे...!(भाग २)

Submitted by प्रिया येवले on 29 July, 2018 - 07:12

त्यांचा बीपी हाय आहे आणि त्यांना पक्षाघाताचा अटॅक झाला आहे संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला
पुढे ....
डॉक्टर गुप्ता : एक काम करा तुम्ही जरा बाहेर बसा. मी गोळ्या सांगतो तोवर तुमच्या मिस्सेस ना ..
दिनकरराव : हो ठीक आहे ..
(दिनकरराव उठून डॉक्टरांच्या केबिन बाहेर येऊन बाकड्यावर बसतात. )
डॉ. गुप्ता : हि एक गोळी आहे हि आता लगेच आणा ऍडमिट करेपर्यंत त्यांना थोडं बळ मिळेल.
(मोनू चिठ्ठी घेऊन मेडिकल मध्ये धूम ठोकतो .)
डॉ. गुप्ता : हे पाहा ! माझ्या अंदाजा प्रमाणे त्यांना बीपी चा आणि शुगर त्रास आधी झाला आणि
त्यामुळे
त्याच्या मेंदूमध्ये जिथे अगदी केसासारख्या नसा असतात . त्याठिकाणी रक्त गोठून त्याचे
स्टोन झाले आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि म्हणून अर्धांगवायू,
पक्षाघात किंवा ब्रेन हॅमरेज हि होऊ शकतो. माणूस कोमात जाऊन मरू हि शकतो.
बकुळाबाई : डॉक्टर पण ते हिंडतायत फिरतायत . त्यांचं काही दुखत खुपत नाही . तुम्ही असे कसे
म्हणताय ?
रीना : पण पप्पाना तर बीपी आणि शुगर काहीच त्रास नाही आजपर्यंत ते पूर्ण खणखणीत आहेत .
बकुळाबाई Sad अश्रू टिपत ) हो ना ! आणि आजपर्यंत एक गोळी का इंजेकशन नाही घेतलाय हो त्यांनी
....एवढाच काय आज तर सर्व नातेवाईकांना दिवाळी घरी पोच करून आलेत ! आजपर्यंत
सर्दी पडसे नाही हो झालेत .(काकुळतीला येऊन बकुळाबाई सांगत होत्या )
डॉ. गुप्ता : मला समजतंय हो सगळं ,पन आजार काई सांगून , माणूस बघून नाही होत ! किंवा ते
कोणाला होतील असेही सांगता येत नाही ! आता कधीही व्यसन न करणारा कॅन्सरला बली
पडतो . हे काही आपल्या हातात नाही. तुम्ही स्वतःला सावरा आणि त्यांच्यासाठी उभे राहा .
मला पूर्ण लक्षणं दिसतायत त्याच्या मध्ये
रीना : पण आम्हाला हॉस्पिटल बद्दल काही माहित नाही हो काही ओळख नाही . किंवा कोणतं
योग्य आहे . काहीच कल्पना नाही. तुम्हीच काहीतरी मदत करा... आम्ही......!!!
डॉ. गुप्ता : ठीक आहे ..समजलं मला मी माझ्या माहितीतला एक नं. आणि पत्ता देतो. किंवा मग
सरकारी मध्ये करणार असाल तर तिथे जा. किंवा तुमच्या पारिजानात अजून कोणतं
असेल तर ते पहा पण हि माझी खास विनंती समाजा पण त्यांना आताच ऍडमिट करा .
मोनू :(केबिन मध्ये येऊन गोळी डॉक्टरांना देतो )हीच ना डॉक्टर ?
डॉ. गुप्ता : दिनकर राव आता तुम्ही हि गोळी घ्या हि हैपरटेंशन वरची आहे जरा अराम मिळेल .
दिनकर राव गोळी घेतात .
बकुळाबाई : तुमची फी ??
डॉ. गुप्ता : माझ्याफी पेक्षा त्यांना ऍडमिट करायला तुम्हाला पैसे लागतील .. आता तुम्ही लवकर
हालचाल करा ...
तिथून गळलेल्या अवस्थेत बकुळाबाई आणि रीना दिनकररावांना घरी घेऊन येतात . आल्या आल्या बकुळाबाई बसकण मारतात ..दिनकरराव सोफ्यावर आडवे होतात
रीना आणि मोनू वर जातात मीना त्यांची वाट पाहत असते . रीना चा चेहरा पाहून मीनाही आतून हलते .
मीना : काय झालं ? काय म्हणले डॉक्टर ? (रीना रडत असते .) मोनू तू तरी सांग !!
मोनू : अरे पण मी मेडिकल मध्ये गेलो होतो. यांनाच माहित सर्व मलाही काही सांगत नाही .....
रीना : ताई पप्पाना ऍडमिट करायला सांगितलंय त्याच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या असू
शकतात, आणि जर वेळेवर ऍडमिट नाही केलं तर काहीही होऊ शकत त्याच्या जीवावर येऊ शकत
..त्या नसा ब्लॉक होऊन ......(आणि रीना रडायला लागली )
मीना आणि मोनू हे ऐकून सुन्न झाले . मीनाच्या डोळ्यासमोर पप्पांचा चेहरा आला . आणि तीच डोकंच बधिर झालं . मेंदूने विचारांचा वेग धरला . २ दिवस झाले ते थकल्यासारखे वाटतायत. पण म्हणून एवढं मोठं ???
मीना : नाही नाही असे काहीही नाही होणार ...!!चाल आपण त्यांना मनवूया आणि ऍडमिट होयला
सांगूया असे बोलून तिघेही डोळे पुसून खाली आई पप्पांकडे गेले .
रीना : पप्पा असे झोपू नका एकदा चला आपण सर्व टेस्ट करू ...
बकुळाबाई : अहो माहित तरी पडेल काही आहे कि नक्की का थकवा येतोय .
दिनकरराव : गप्प बसा मला काही झालं नाहीये ... मी ठीक आहे सकाळी उठल्यावर बघा कसा फ्रेश
वाटेनं वाटणार पण नाही काही झालाय म्हणून हे डॉक्टर लोक हरामखोर असतात . पैसे
लुबाडायचं काम करतात. काही नाही सतराशे साथ टेस्ट सांगतील . रिपोर्ट नॉर्मल आले
कि झालं . तुम्ही ठीक आहेत तरी या या गोळ्या घ्या . यांचे खिसे भरले कि बस्स!!!
रीना : अहो पप्पा असे काही नाही एकदा रिपोर्ट तरी बघू ...
बकुळाबाई :अहो माझ्यासाठी तरी चला ... नका असे करू ....
मोनू : बरोबर बोलतायत पप्पा आजकाल हॉस्पिटल बिझनेस झालाय ...
मीना : पप्पा आई म्हणतेय तर एकदा मनाची शांती तरी होईल . उगाच तुमच्या हट्ट पायी
पराचा कावळा नको व्हायला ...
दिनकर राव : उद्या माझं काम चालू होतंय मला काम करायचंय त्या माणसाला शब्द दिलाय उद्या
काम चालू करतो म्हणून ....आणि ते लोक काही कारण नसताना मला ऍडमिट
करणार त्याशिवाय त्यांचा बिल कसं बनेल.
रीना : पप्पा आता जाऊ सलाईन लावू म्हणजे सकाळ पर्यंत तुम्ही कामाला जायला मोकळे !!
आता मात्र दिनकर राव तयार झाले . आता ऍडमिट कुठे व्हावे यावर विचार चालू झाले .
मीना :सरकारी नको आताच्या वेळेनुसार तिथे सकाळ पर्यंत काहीच हालचाल नाही करणार ...
रीना : मग दुसऱ्या एका सरकारी मध्ये जाऊ तिथे चांगल्या सोयी आहेत .
मोनू : अरे पण तिथलं काही माहित आहे का ? शिवाय एवढं मोठं आहे ते ... आपल्याला
काहीच माहित नाही .
बकुळाबाई : जे होईल ते होईल डॉ. नि सांगितलेल्या हॉस्पिटलमध्येच जाऊ .. मीना चा दिवाळीचा
बोनस आहे
आता मीना सोडून बाकी सर्व अपोलो हॉस्पिटल मध्ये निघाले .जाताना बकुलाबाईंनी स्वतःजवळचे ४ हजार घेतले .
क्रमश.......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults