वेडं प्रेम

Submitted by महादेव सुतार on 25 July, 2018 - 14:06

तिला सगळं पुन्हा आठवतं

तिच्याकडे पाह्त तिचा हात आपल्या हातात घेत बोलतो
महादेव : माझा मलाच विश्वास बसेना तू माझ्यासोबत आहेस
सुप्रिया : खरच का
महादेव : हो गं खरंच
सुप्रिया :विश्वास बसायला काय नाय झालं मी खरच तुझ्यासोबत आहे आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन
महादेव : काय दिवस होते ते ज्यावेळी आपण पहिल्या वेळी  भेटलो
सुप्रिया : हो पण तू लय घाबरत होतास मला
महादेव : तू वागायची तशी ना म्हणून
सुप्रिया : म्हणजे
महादेव : काही नाही
सुप्रिया : बरं झालं काही नाही म्हणालास नायतर तुला सांगितलं असतं मराठी
महादेव :काय
सुप्रिया : काही नाही थोबाड सरळ कर
महादेव : बरं ठीक आहे
सुप्रिया : म्हाधू आपण जाऊया का परत गावी  खूप आठवण येते आईची
महादेव :नको गं
सुप्रिया : मग आपण कधीच जायचं नाही का गावी
महादेव ; जाऊया एक दिवस
सुप्रिया : ok

असं बोलुन ती महादेव ला मिठी मारते
या दोघांची लव्ह स्टोरी कॉलेज मधून सुरू होते. महादेव आणि सुप्रिया एकाच कॉलेज मध्ये होते.
महादेव हा सरळ साधा होता.कोणाशी जादा बोलायचा नाही.कोणाशी मस्ती नाही .मित्र होतें पण जादा करून एकटा असायचा.
एकटा फिरायचा. महादेव गरीब घरातील मुलगा लहानपणापासून वाचनाचा छंद त्याला होता.पार्टटाइम जॉब करायचा.तशी फॅमिली मोठी नव्हती एक लहान भाऊ आणि आई बाबा असे 4 जण आनंदात रहात होते.
एके दिवशी कॉलेजमध्ये जात असताना रस्त्यावर  भांडण चालू होतं काही मुलं मुली जमा होत्या महादेव थोडं पुढं गेला. एक मुलगी
एका मुलाला चपलाने मारत होती. आणि दुसरी मुलगी सोडवण्याचा प्रयत्न करत होती.
महादेव चा मित्र समीर महादेवजवळ आला.

समीर : कसलं मार खातय पोरगं  पोरीकडून हातात बांगड्या भरल्यात वाटतंय
महादेव :गप बसलाय म्हणून एकटीकडून मार खातोय जर त्याने जर हात उचलला तिच्यावर तर ही जमल्यात ना लोकं त्यांचा तो मार खाईल तुला खायचा आहे का सांग
समीर : नको रं आज माझा उपवास आहे

असे बोलत ते कॉलेजमध्ये आले.
दुपारी ते एकत्र जात होते. बोलत बोलत जात असताना पाठीमागून समीर ला एका मुलीने हाक मारली आणि समीर थांबला वळून पाहतो तर काय सकाळची मूलगी समोर तिला पाहून महादेव पण घाबरला
ती : ये सम्या थांब जरा
समीर : काय ताई
ती : ताई हाय व्हय रं तुझी मी
समीर :नाही पण ताई सारखी दिसतेस
ती :मग सकाळी काय म्हणत होतास ताई बद्दल या माकडा
समीर :sorry ताई माफ कर एकदा पुन्हा काय बोलणार नाय तुला
ती : बरं बरं यावेळी सोडते पण ऐक माझं नीट कुणी आपल्या नादाला लागलं ना सरळ चपलांन फोडते चल निघ

हे ऐकल्यावर ते दोघेजण निघनार इतक्यात

ती : ये माध्या तू कुठं निघाला मी याला सांगितलं तुला नाय तू थांब
ये
सम्या निघ पळ
महादेव : मी काय नाय म्हणालो तुम्हाला मॅडम
ती : मॅडम दिसते व्हय रं तुला मी, मी  मॅडम बिडम कोण नाय तुझ्या बाजूला उभा होती सकाळी ती मुलगी प्रिया तिची मैत्रीण मी सुप्रिया
कळलं का
महादेव :कळलं
सुप्रिया : सकाळी लय चांगला म्हणालास प्रिया म्हणत होती राहतो कुठं तू
महादेव : मी व्हय सम्याच्या बाजूला
सुप्रिया : मग एवढा  घाबरतो कशाला सांगायला
महादेव : ते असच
सुप्रिया :असंच कसं
महादेव : मी जाऊ
सुप्रिया : कुणाची जाऊ
महादेव : मी घरी जाऊ शकतो का
सुप्रिया : बरं जा पण उद्या भेटायचं मला कळलं का
महादेव :कशाला
सुप्रिया : जेवढं सांगितले तेवढं करायचं समजलं की इंग्रजी मध्ये सांगू
महादेव :समजलं by
सुप्रिया :by

त्या दिवसापासून सुप्रिया नि महादेव एकमेकांना बघायचे बघता बघता कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कळलं नाही चोरुन चोरून एकमेकांना पाहू लागले भेटायला अतूर व्हायचे दिवस एकमेकांना बघितल्याशिवाय जायचा नाही
मुद्दाम सुप्रिया महादेव जवळून जायची
सुप्रिया महादेवाला खूप आवडायची
आणि सुप्रियाला ला महादेव म्हणून त्याला तिने एक दिवस बोलवलं होतं आणि ती आज त्याला prapose करणार होती पण महादेव च्या मनात वेगळंच चालू होतं त्याला भीती वाटत होती तो विचारात पडला म्हणून सम्या ला रात्री तो भेटला आणि सम्याला त्याने सांगितले सगळं पण सम्या त्याला समजावू लागला तिला तू आवडतोस म्हणून बोलवलं असेल कदाचित  पण तू असाच विचार कर सकारात्मक मनात नकारात्मक विचार आणू नको असे तो रात्री सांगत होता  सकाळ झाली भेटण्यासाठी तो कॉलेज च्या गार्डन मध्ये गेला
ती तिथेच उभी होती त्याच्याकडे पाहून तिने simle केली पन महादेव ची smile नव्हती 
समोर गेला नि सुप्रिया त्याच्याजवळ गेली

सुप्रिया ;तू आलास मला खूप भारी वाटलं
मला वाटलं तू येणार नाहीस घाबरून
महादेव : तू बोलवलं म्हंटल्यावर यायला भागच पडलं नायतर उद्या परत काय घडेल काही सांगता येणार नाही
सुप्रिया :काय पण काय मी एवढी वाईट नाही रे जेवढी तू समजतोस कसं आहे ना मला कोणी समजावून सांगणार नाही आणि कोणाला वेळ ही सांगायला नाही पण आता कोणी तरी भेटलं मला समजावून सांगणार
महादेव : बर झालं भेटलं
सुप्रिया : हो ना
महादेव : आहे कोण तो
सुप्रिया : तो व्हय
महादेव : हा कोण
सुप्रिया : तू
महादेव : मी
सुप्रिया : हो I Love you
महादेव :मला नाही आवडत तू
सुप्रिया :कायखरंच तुला मी आवडत नाय
बरं ठीक आहे sorry मी जाते असे बोलून ती डोळे पुसत जात होती तेवढ्यात
महादेव :I love you supriya i love you so much
तुला पहिल्यांदा पाहिलं नि प्रेमात पडलो तुझ्या
पण सांगायला घाबरत होतो तुला पाहिलं की हृदयाचे ठोके वाढायचे बोलायला काही सुचायचं नाही फक्त तुझ्याकडे पहात रहावं वाटायचं तुला तुला पहायला खूप मजा येत होती तुझी smile छान वाटत होती पण नंतर मला कळलं प्रिया कडून की तू माझ्या प्रेमात पडलीस म्हणून ठरवलं
कित्येक मुलं मुलीला आधी प्रपोज करतात पण मुलगी आधी करत नाही त्यामुळे तू आधी प्रपोज करावं ही इच्छा माझी पूर्ण झाली thanks आणि I love you
हे ऐकून सुप्रिया मागे वळली आणि पळत येऊन महादेव ला मिठी मारली
आणि येथून त्यांच्या प्रेमाची सुरवात होते
काही दिवसांनी लग्न करण्याचा निर्णय घेतात पण
घरांच्या लोकांचा लग्नाला विरोध असून
हे दोघे घर सोडून पळून जातात
पण शेवटी ही स्टोरी अधुरी राहते
कारण ..... महादेव घरच नाही तर जगच सोडून जातो पुढे काय झालं असेल लवकर कळेल

Read more next week Coming soon......
By~Ms

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users