ते दोन शब्द.. (शत शब्दकथा)

Submitted by धनुर्धर on 23 July, 2018 - 05:48

वारा बेभान वाहत होता. पावसाची रिप रिप चालूच होती. तो नखशिखान्त चिंब भिजला होता. त्याची नजर कुठेतरी आडोसा शोधत होती. आणि त्याला ते घर दिसले. तो धावतच घरा जवळ पोहचला. घराचा दरवाजा बंद होता. घराबाहेर असलेल्या पत्र्याच्या आडोशाला त्याने आपले ठाण मांडले. पावसाचा जोर वाढतच होता. थंडीमुळे त्याचे अंग थर थर कापत होते. पण आता त्याला थोडा निवारा मिळाल्यामुळे जरा बरे वाटत होते. तेवढ्यात दाराची कडी वाजली. कर कर आवाज करत ते दार उघडले गेले. दरवाजामधून एक तोंड डोकावून पाहू लागले. आणि त्रासलेल्या, रागावलेल्या त्या तोंडातून बाहेर पडलेले ते दोन शब्द तापलेल्या शिश्याप्रमाणे जळजळत त्याच्या कानात ओतले गेले....

"येऽ हाडऽऽ"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol छान