भाग्यरेषांची कुणी केली अशी अदलाबदल (तरही)

Submitted by इस्रो on 22 July, 2018 - 00:57

जाहली सटवीस नाही याच प्रश्नाची उकल
भाग्यरेषांची कुणी केली अशी अदलाबदल ?

भांडलो आम्ही भयंकर काल दोघेजण जरी
लाभ ना होणार कोणी घ्यावया तिसरा सफल

फोडते खापर चुकांचे मागच्या सरकारवर
अन नवे सरकार देते सर्व प्रश्नांना बगल

जाहलो श्रीमंत आहे काय सांगू केवढा !
वानवा नाही कशाची माझियापाशी गझल

सत्य हे सांगून गेली थोर काही माणसे
एक आहे स्थिर जगी या गोष्ट ती म्हणजे बदल

वेगळेपण हेच माझे मी तयांना सांगतो
खास ना माझ्यात काही मी असे साधा सरल

----------------------------- नाहिद नालबन्द 'इस्रो '

Group content visibility: 
Public - accessible to all site users