का ?

Submitted by कल्पेश. on 18 July, 2018 - 14:24

गेली चार वर्षे कॉलेज मधले फेमस कपल असलेल्या मंदार आणि मिहिरीकाचे ब्रेक अप झाल्याचे आज सकाळी समजले. ही बातमी म्हणजे आम्हा सर्व ग्रुपसाठी ९ रिक्श्चर स्केलच्या भूकंपापेक्षाही जास्त हादरवून टाकणारा मोठाच धक्का होता. कॉलेजमधून डिग्री मिळाल्यावर जो तो आपल्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करत विविध दिशाना पांगला होता तरी २०१३ च्या बॅचची ही १२ जणांची स्वीट डेव्हील्स टीम आपल्या मैत्रीत अजिबात दुरावा येणार नाही ह्या बेताने कायम एकमेकांच्या संपर्कात राहत होती. हाताशी स्काईप, व्हाट्सएप तर २४/७ असायचेच; त्याशिवाय महिन्यातून एक वार, बहुदा दुसरा शनिवार संपूर्ण दिवस ह्यातील १० मंडळी एकत्र जमून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करायचे. ह्याकामासाठी नरिमन पॉईंटपासून पार अगदी कर्जतपर्यंत कुठलेही ठिकाण चालत असे. अपवाद फक्त दोघांचा अर्थात मंदार आणि मिहिरीकाचाच; जे कॅंपस इंटरव्ह्यू मधून सिलेक्ट झाल्यावर डायरेक्ट बंगलोरला जॉईन झाले होते.

एकमेकांना पहिल्याच वर्षी भावी आयुष्याचा जोडीदार म्हणून मनापासून पसंद केलेले हे लव्हबर्ड्स आज चार वर्षांनंतर चक्क अँग्री बर्डस झालेले आणि ह्याचीच परिणीती म्हणून दोघांनीं आपापले स्टेट्स जिकडे तिकडे पुन्हा एकदा सिंगल म्हणून अधोरेखित केले. दोन्ही बाजूला एकच प्रश्न फक्त कायम मनात येत होता ...
'का ?'

हे असं का ?
हे माझ्याच बाबतीत का ?
आपलीच हक्काची माणसंच असं आपल्याशी अंतर राखून का वागतात ?
बरं असे वागतात तर ते खरंच आपले असतात का ?
जर आपले असतात तर असं वागण्यामागचं खरं कारण का सांगत नाहीत?
आणि ही माणसं आपली असतात तर एका क्षणात दुसऱ्यांची कशी काय होऊ शकतात ?
इतर कोणाला विचारलं की प्रेमात असं का असतं ? तर ते म्हणतात - असंच असतं !!
मग हे असंच का असतं ?

नेमक्या आपल्याला हव्या असणाऱ्या क्षणी आपलं माणूस दूर का जातं ?
आणि जायचंच असेल तर जीव जाईल अशा आठवणी तरी का देऊन जातात ?
मुळात निव्वळ असे छळणे हीच जगाची रित असेल तर अशी रितच का आहे ?
प्रेम जर उत्कट भावनांचं खरंखुरं प्रागट्य आहे तर मग त्यात रीती, नियम का असतात ?
मग ही नाती, प्रेम आपली माणसं आनंद देण्यासाठी असतात की दुःख देण्यासाठी ?
आणि आपण जितके एखाद्याला जवळचं मानतो, तर त्यांच्याकडून आनंदापेक्षा दुःखच जास्त का मिळतं ?
हे अपेक्षा केल्यामुळे होत असेल तर अपेक्षा आपण आपल्याच माणसाकडून करू नये का ?
प्रेमाचं नात आयुष्यभर साथ देत असे म्हणतात मग आयुष्यभर साथ देत तर ते मध्येच सोडून का जात ?
आणि सोडून जात तर ते प्रेमाचं नातं कशावरून मुळात नातं असतं ?
नातंच नसेल तर त्या व्यक्तीकडून मिळालेलीे अनुभूती कशाचं द्योतक असू शकेल ?

ह्या अनेक "का" चं उत्तर ना आजतागायत मंदार शोधू शकलाय, ना ते अजून मिहिरिकाला मिळालंय.
तुमच्या कडे काही उत्तर असेल तर प्लिज कळवा !

- कल्पेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही पूर्वी केकताच्या मालिकांसाठी स्क्रिप्ट लिहायचात का?
एकाच गोष्टीवर वेगवेगळ्या अँगलने तेच तेच प्रश्न नव्याने विचारत लेख लांबवायचं तुमचं कसब अफलातून आहे.

कल्पेश - जेंव्हा माणूस समोरच्याला गृहीत धरू लागतो तेंव्हा असे होते. कंट्रोल आपणच सुटू द्यायचा नसतो.

कल्पेश - जेंव्हा माणूस समोरच्याला गृहीत धरू लागतो तेंव्हा असे होते. कंट्रोल आपणच सुटू द्यायचा नसतो.

नवीन Submitted by च्रप्स on 19 July, 2018 - 06:42 >>> +११११११

नात्यात खोटेपणा केला की असेच होते, दुसर्याला दुख देवुन स्वत : आंनदी राहने प्रत्येकाला जमते असे नाही

हे सगळे प्रश्न खरेतर स्व्तलाच विचारा, प्रामानिक उत्तरे शोधा, कुठलाही पुर्वग्रह न थेवता , उत्तर मिळेल

मुलात जिथे प्रेम असते तीथे खोटेपना नसतो, जो हल्ली सर्र्स केला जातो. मुली हलव्या असतात , काही वेळ माफ करतात समोरच्याला पन दरवेळी असे वागने कोन सहन करेल
मग येतो दुरावा आनी एक दिवस ती कठीन निर्नय घेते

पतला नाही प्रतिसाद तर इग्नोर करा, पन वाद नको प्लिज नेहमी सारखा

धन्यवाद च्रप्स
मुद्दा पटला Happy
अतिशय योग्य सल्ला / विचार

आज नजरेस पडले हे

यावर फक्त ईतकेच प्रतिसाद कसे

खुप छान डिस्कसन घडु शकले असते यावर

मलाही आवडले असते ते