यु कॅन विन?

Submitted by प्रथमाद्वितिया on 6 July, 2018 - 13:59

शिवा ऐथल यांचा लेख.

"यु कॅन विन" ~ बुलशिट

भाग ~ ०१
शिक्षकांच्या रिफ्रेशर कोर्स संपत असताना बंगळुरू युनिव्हर्सिटीमध्ये पद्धत आहे की तिथे आलेले सर्व प्राध्यापकांना शेवटच्या दिवशी एक पुस्तक भेट देतात. त्यांची विशिष्ट पद्धत म्हणजे ते प्राध्यापकांनाच विचारतात की तुम्हाला कोणता पुस्तक पाहिजे ते. माझ्या दुसऱ्या रिफ्रेशर मध्ये आम्ही तीस सहभागी प्राध्यापकांमध्ये अठरा लोकांनी शिवखेराचा "यू कॅन विन हे" पुस्तक सुचवले. पाच लोकांनी पाच वेगळे पुस्तके सुचवले, काही सहाएेक लोक गप्प होते. तीसवा मी ही गप्प होतो. पण जेव्हा बघितला की "यू कॅन विन" जिंकत आहे तर मीअचानक उठलो व सांगितले की "आय स्ट्राँगली ऑब्जेक्ट टु थिस बुक, आय वुड रादर प्रिफर सम अनादर बुक". देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले, पण जास्त संख्येत असलेले बेंगळूरचे प्राध्यापक स्तब्ध झाले. एकाने लगेच जाब विचारले "कॅन वि नो द रिजन फॉर थिस?" मी म्हटलो "देर आर न्यूमर्स. व्हाय डोन्ट यु स्टार्ट वित्त विकिपीडिया टाइपड विथ धिस ऑथर्स नेम इन इट! अँड फॉर माय स्टुडंट्स आयएम बेटर दॅन शिव खेरा, सो आय डोंट नीड हिम!" "कोर्स संपायला अजून एक आठवडा होता. एक आठवडाभर चर्चा झाली सगळ्यांनी म्हटलं अम्हाला माहितीच नव्हतं आणि शेवटी मी सुचवलेला सिद्धार्थ मुखर्जींचं "द जीन" हे पुस्तक सगळ्यांना वाटण्यात आले.

भाग ०२
वर सांगितलेली गोष्ट काही वर्षांपूर्वी घडलेली. आता काही दिवसांपूर्वी माझे एक मित्र व त्यांचा मुलगा एक शैक्षणिक केस घेऊन माझ्या घरी आले. दरवर्षी जुन जुलैपर्यंत आम्हा शिक्षकांचा महत्त्वाचा काम म्हणजे काऊंसीलींग. पण ह्याच्यात सुद्धा सक्सेस रेट पेक्षा फेल्युर रेटच जास्त. व्यवस्थित कौन्सिलिंग आम्ही करूच शकत नाही. ह्याचा कारण की पालक व विद्यार्थी शेवटी काहिच ऐकतच नाही. घोडे पाण्यापर्यंत येतात पण पाणीच पित नाही. तर हा मुलगा तिसऱयांदा नीटची तयारी करण्यासाठी आग्रह धरत होता व आई बाबाही कुठंतरी नको असताना सुद्धा मनातुन त्याच्या सुरातसुर आलाप करीत होते. मी जेव्हा त्याला सुचवले की "बेटा दोनदा व दोन वर्ष झाले आता तिसऱयांदा वेळ वाया न घालवता बीएससी कर" तर तो म्हटला, "नाही काका या वेळेस माझा स्कोअर चांगला येणाऱच आहे, मला माझ्यावर खात्री आहे, आय नो दॅट आय कॅन विन". मला लगेच लक्षात आले. थोड्या वेळानंतर मी त्याला विचारले "पुस्तके वाचतो का?" तो म्हणाला "जास्त नाही पण ऐक वाचलेला आहे आणि ते मला सर्वात जास्त आवडलेला आहे"

भाग ०३
जुलैच्या पहिल्या आठवड्यात आमचे ग्रॅज्युएशनची क्लासेस सुरू होतात. तेव्हा सहा महिन्यापर्यंत कधी कधी तर एक वर्ष दोन वर्षांपर्यंत आम्हाला जे त्रास असतो तो म्हणजे, हे विद्यार्थी नीट सीईटीच्या संमोहनातून बाहेर पडतच नाहीत. त्यांनी अटेम्प्ट केलेल्या परीक्षांचे निकाल व स्कोर बघितले तर ऐकणाऱ्यालाच लाज वाटावी असे. पण या मुलांचे स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडन्स गगनभेदी. बरं हा ओव्हर कॉन्फिडन्स शेवटी मुरतो कुठे तर डिप्रेशनमध्ये. ह्याला कारणीभूत पालक आणि फक्त पालकच. आठवीत असतानाच पालकांना कळायला हवे की आपल्या मुलाचे पाय आणि डोके कुठं वळतात ते. पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत दुखणं हे आहे कि ~ आपल्याला काय व्हायचे ते माहीतच नाही आणि दुसऱ्यांसाठी आपल्याला काय बनायचा आहे त्याच्यावर जीव ओतून चुकीच्या मार्गावर पळणं सुरू आहे. सुखदायक अपवाद आहेत खरे पण मोजकेच.

भाग ०४
एन अकॅडेमिक ऑबजर्वेशन
१) ग्रॅज्युएशनला शिकवत असताना फर्स्ट ईयरला मार्चची परीक्षा येईपर्यंत बरेच विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या भ्रमातून सुटलेलेच नसतात व चालू वर्षही वाया घालवतात, कारण त्यांना आत्मविश्वास आहे की "दे कॅन विन".
२) काही मुलं त्यांचे पालक पदवी शिकत असताना तिसऱया वर्षात आले तरीही नीटची तयारी करत रहा असेे सुचवणार असतात. बहुदा हा पालकांनी वाचलेला आहे व त्यांना वाटत आहे की त्यांची लेकरं "कॅन विन".
३) बाकीचे जे उरलेले मेडिकल इंजिनिअर वाले नाहीत, ते असतात एमपीएससी व आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारे. त्यांचं मन शिकण्यात बिलकुल नसतं. ते रेगुलर नसतात व त्यंनी बाहेर क्लासेस लावलेल्या असतात. दे थिंक दाट लाइक धिस "दे कॅन विन". यांची अवस्था पुढचं रस्ता ताठ व मागच्या सपाट आणि आताच काहीच माहीत नाही.

भाग ०५
द कनक्लुजन
परवा लातूरमध्ये एका खाजगी कोचिंग संस्थाचालकाचा (जो खरं तर एकेकाळी पान टपरीचा मालक होता) खून उगीच नाही झाल. याला कारणीभूत पैशामागे वेडे शिक्षक व चोहीकडे चांगल्या कॉलेज असताना, त्यांना कोचिंग वाल्यांना लाखो रुपये ट्युशन मार्फत पुरवणारे पालकच आहेत. बिकॉस द ओनर अॅण्ड द रनर बोत थिंक "दे कॅन विन".

दुसरीकडे "सेल्फ रिअलायझेशन" व "सेल्फ अॅक्च्युअलाईसेशन" व "इमोशनल लिट्रसी" या गोष्टी लुप्त होत असताना, ह्या गोष्टी माहित नसणारे पालक आपल्या पाल्यांसोबत इमोशनल खेळ खेळत आहेत व आपल्या आकांक्षेचे ओझे लादून अत्याचार करीत आहेत. आणि सांगतांना तर आम्ही त्यांच्यावर कोणताच दबाव घालत नाही हे खोटारडे पॉलिटिकल स्टेटमेंट मुख पाठ करून सांगत फिरत राहतात.

अरे करू द्या ना त्याला काय करायचाय ते. आणि दहावी बारावीनंतर त्याच्या उरावर बसू नका. खरे आई बाबा असाल तर अठवीपासून बघा त्याला काय आवडते व त्यांच्यामध्ये "लाइफ स्किल्स" कोणते आहेत ते. अशी किती उदाहरणं कथा तुम्हाला पाहिजे ज्यात सक्सेसफुल डॉक्टरस व इंजिनिअर्स झालेले आहेत पण त्यांना ते व्हायचच नव्हतं व सध्या अपले व्यवसाय सोडुन आनंदाने मनाला वाटतय ते करत फिरत आहेत.

व्यथा इथे संपत नाही ज्यांना मेडिकल इंजिनिअर नाही व्हायचं त्यांना मोठा सरकारी अधिकारी व्हायचंय आणि त्यांना एकच द्वार दिसते ते म्हणजे एमपीएससी व यूपीएससी. आशांना विचारा तुम्ही पुस्तक किती वाचले आणि कोणते वाचले तर वाचणे हे प्रक्रिया त्यांना मुऴात आवडत नसल्याचे बाहेर येते. अशा बऱ्याच भावी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर तीन पाच वर्षांत एकही हसू उमलतं नसते. ते प्रामाणिक तर राहतात पण त्यांच्यात कोणत्याच गोष्टींमध्ये स्वारस्य नसतो. समोर आलेले आई बाबा, नातेवाईक, प्राध्यापक, मित्र, मैत्रिणी यांच्याशी कसा संवाद घालायचा, कसं वागायचं हे माहित नसते. आयुष्यातल्या सुवर्ण दिवस मोबाइलमध्ये मुंडके घालून आपण काढत आहोत ह्याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. आनंदी राहणे कशाला म्हणतात हे कधी त्यांना कोणी शिकवलेच नाही. आपले कपडे, आपली वर्तणूक, आपली बॉडी लँग्वेज, यात कुठलाच चांगल्या अधिकाऱ्यांचा भास नसतो. आम्हाला दिसतात पाळण्यात पाय म्हणून आम्ही सांगतो.

पण ह्या सगळ्या "थेरॉटिकल विनर्स" च एक ब्रीद वाक्य मनात पक्का ठरलेला असते ते म्हणजे "आय नो आय कॅन विन" कारण त्यांना एका करोडो रुपये कमावणाऱ्या एका व्यापाऱ्याने, ज्याने एका पुस्तकाद्वारे सांगितलेला आहे की 'यू कॅन विन'. ही बाब वेगळी आहे की याच लेखकाच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यावर कोर्टात प्लाजारिजम्च आरोप केले होते की या माणसाने दुसर्या पुस्तकातल्या गोष्टी संदर्भ न देता सरळ चोरलेल्या आहेत. पण शेवटी खरच आहे चालू द्या ~ "यु कॅन विन"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते प्रामाणिक तर राहतात पण त्यांच्यात कोणत्याच गोष्टींमध्ये स्वारस्य नसतो. समोर आलेले आई बाबा, नातेवाईक, प्राध्यापक, मित्र, मैत्रिणी यांच्याशी कसा संवाद घालायचा, कसं वागायचं हे माहित नसते. >>

मनापासून पटलं. किती मुलं पहिलीयेत ज्यांना पुस्तकी अभ्यासाच्या रेट्यापुढे बाकीचे स्किल्स डेव्हलप करायला वेळच मिळत नाही.
माणूस मुळातच सामाजिक प्राणी आहे, आणि संवाद कला हा आपल्या समाजाचा प्राणवायू. तो पुरेसा मिळाला नाही पहिल्यांदा सामाजिक आरोग्य बिघडते, मग पाठोपाठ नैराश्य, चंचलता अशी मानसिक दुखणी डोकं वर काढायला लागतात.

स्वतःच मत प्रदर्शन करणे, मनातल्या भावना बोलून दाखवणं , इतरांबरोबर काम करणं अशा गोष्टींना जितकं तुमचं पुस्तकी ज्ञान लागतं त्याच्या पेक्षा जास्त तुमचं संवादकौशल्य लागतं . अन ते आपोआप येत नाही, सततच्या प्रयन्तांनी ते अंगवळणी पडतं. 'use it or lose it'.
पण गंमत म्हणजे लहान पोरं सोडा, अनेकदा मोठ्यांच्याही गावी नसतं या social skills च महत्व. उगाच नाही गल्लोगल्ली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास चे पेव फुटले.