कविता पावसाळी

Submitted by धनुर्धर on 30 June, 2018 - 05:55

कविता पावसाळी
शब्दांनी भिजलेली
वीज बनून आभाळात
ढगात वाजलेली

कविता पावसाळी
वार् याने वाचलेली
घेऊन संगे वादळाला
रानात नाचलेली

कविता पावसाळी
फुलांनी वेचलेली
थेंब होऊनी झाडांच्या
पानावर साचलेली

कविता पावसाळी
हवेत दरवळलेली
रूजलेल्या कोंबानी
माती हिरवळलेली

कविता पावसाळी
मनात कोसळलेली
चिंब शब्दांची सारी
नदी फेसाळलेली

........धर्नुधर.......

Group content visibility: 
Use group defaults

कविता पावसाळी
मनात कोसळलेली
चिंब शब्दांची सारी
नदी फेसाळलेली >>> व्वा क्या बात !!!