स्फुट - रेश्मा गोसावी

Submitted by बेफ़िकीर on 28 June, 2018 - 11:20

स्फुट - रेश्मा गोसावी
========

रेश्मा गोसावी
वय वर्षे आठ
पत्ता - एक नगण्य वस्ती
शाळा - जि. प.
यत्ता - दुसरी

'जात' - गोसावी

वर्गात बसण्याची जागा - इतर गोसावी मुलांबरोबर, वेगळी रांग, मध्ये अंतर

कारण - अस्वच्छ

रेश्मा गोसावी!

वस्तीत मुबलक पाणी!

रोज आंघोळ!

नखे स्वच्छ!

दात स्वच्छ!

डोळ्यांत उत्सुकता, कुतूहल, निष्कारण अपराधीपणा, अंगी बाणवण्यात आलेला कमीपणा, आपल्याला वेगळे काढले जाते ह्याची जाण, अंगाला मेडिमिक्सचा वास, आईबापांना 'कुठेही थुंकत जाऊ नका' हे सांगण्याचे धाडस!

रेश्मा गोसावी!

एका विद्यार्थिनीच्या जवळ गेली

लाथ बसली कंबरेत

घरी आली

डोळ्यांत टिपूस नाही

दुसऱ्या दिवशी आंघोळ केली नाही

शाळेतही गेली नाही

तिसऱ्या दिवशीही आणि चौथ्याही

पालक निवांत

शिक्षक निवांत

शाळा निवांत

वर्ष - इसवीसन २०१८

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users