युगंधर

Submitted by Patil 002 on 24 June, 2018 - 14:44

युगधंर-कविता-
रास रंगे गोपिकांसवे
गोपाळा कृष्ण कान्हा
धन्य धन्य ती मथुरा
पावा वाजवीतो कान्हा

गाई चारीशी वनावनात
संगे तुझ्या सुदामा
गोपिकांसवे खेळखेळता
तू युगधंर मी सुदामा

दह्या दुधाचे हांडे
रचवीशी तू एकक
अडवूनी गोपिकांचे
खोड्या तुझ्या अनेक

तुझ्यासवे खुशीत साऱ्या
सदैव मोहवी त्यांना
युगधंर तू युगायुगांचा
हवाहवासा असे त्यांना

हाती घेऊन सुदर्शन
धडा शिकवी गुन्हेगारास
तरी शंभर आकडे मोजुन
करशी सावध अन्यायास

धावून येशी सहाय्याला
परी हाकेस द्रौपदीच्या
पुरवून वस्त्र द्रौपदीला
फजिती उडवी दुर्योधनाच्या

Group content visibility: 
Use group defaults

अहो युगंधर असे नीट लिहा ना, अनुस्वार ध वर नव्हे ग वर हवाय.
अर्थाचा अनर्थ होतोय
अनुस्वार नीट लिहिलात की कविता वाचेन