आजचा शब्द....'ईन्टलेक्चुअल सबव्हर्जन' (=मराठी शब्द?)

Submitted by यक्ष on 21 June, 2018 - 22:44

आज कायप्पावर एका विदुषिची video clip बघत होतो त्यात एक नवीन शब्द (माझ्यासाठी)....'ईन्टलेक्चुअल सबव्हर्जन' ऐकला. ह्याला मराठी प्रतिशब्द सुचवता येइल काय? तो उपलब्ध असल्यास ज्ञानात भर पडेल....नसल्यास अशा शब्दांची भर आपल्या भाषेत पडली तर उत्तमच! छान शब्द!!

त्या video त परदेशस्थित काही निवडक आय.आय. टी. यन्स काडून एक विशिष्ट मतप्रवाह जो की परदेशी धनदांड्ग्या संस्थांच्या प्रभावाखाली 'हिंदूराष्ट्र' संकल्पनेला विरोधासाठी मुख्यत्वे प्रचारात येतोय त्याबद्दल आहे. ते भाषण ऐकताक्षणी विचारास प्रवृत्त करणारे वाटते व वक्तृत्व प्रभावशाली जाणवते. प्रमुख भारतीय शहरांतील मोक्याच्या ठिकाणी परदेशी धनदांड्ग्या संस्थांच्या दबावाने 'पब्लिक युटिलिटी स्पेसेस' चा छुप्या धर्मप्रसारासाठी कसा गैरवापर होतोय (उदा. चेन्नै ला 'तांबरम' स्टेशनच्या समोर अनेक वर्षे मोकळी असलेल्या मोकळ्या जागेवर नुकताच उभारलेला एका धार्मिक 'प्रभु'ती चा भलाथोरला पुतळा') हेही विदित केले आहे.

कालच इथे-मायबोलीवर एका सन्माननीय सभासदाने 'शेअर'(=योग्य मराठी शब्द?) केलेल्या मराठी पुस्तकांच्या दुव्यातून (त्यांन्ना मनःपूर्वक धन्यवाद!) अल्लौद्दीन खिलजी आक्रमण, दक्षिणेत बहामनी ('ब्राम्हणी!) राजवट ह्याविषयी वाचत होतो. तर हे तसे सुरू होतेच व कालातीत राहील.

दरम्यान असे शब्द, लेख मराठीतून वाचण्यास समाधान वाटेल. आहेत कुठे?

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या लिंकमध्ये बर्‍यापैकी (मला वाटते साधारण कल्पना येण्याइतपत) माहिती आहे. (धन्यवाद च्रप्स!)
माझे इंग्रजीचे ज्ञान मर्यादित असल्याने माझ्या इंग्रजीतून लिहिण्यालाही मर्यादा आहे. त्याबद्दल क्षमस्व.
इथे जाणकार त्यांची मते व्यक्त करतील व त्यातून मलाही नवीन शिकायला मिळेल अशी आशा आहे.
आजूबाजूला काय सुरू आहे ते तर काळावे, हा उद्देश!

शेयर साठी सहप्रचीत हा शब्द कुठेकुठे वाचला आहे.
इंटेलेक्च्युअल सबव्हर्शनसाठी योग्य शब्द सुचवणं ठीकच पण त्या विदुषींचं भाषण प्रचंड म्हणजे प्रचंडच गंडलेलं वाटलं(मी जे ऐकलं त्याबद्दलच तुम्ही म्हणताय की नाही हे ठाऊक नाही परंतू हा पुतळ्यांसंबंधीचा मुद्दा त्यांनी सांगितलेला).