एका मित्राने माझ्या हातात बांधलेला धागा आणी एका कागदावर माझ नाव व त्या दिवसाची दिंनाक लिहल त्या कागदाची घडी करून ती अनमोल ठेव मी त्या झाडाच्या खोडामध्ये ठेवलं आणी वरती दगड टाकले का तर कुणाच्या हाती लागू नवे म्हणून खर त्या क्षणाची मला आठवण झाली की आता पण मला हसूच येते. खंरच किती रम्य असत ना बालपन आठवणी सुरक्षित राहव्यात म्हणून आपण कीती धडपड करत असतो.त्या डोंगरावर तशी खुप झाडे होती पण हे झाड माझ्यासाठी विशेष होते कारण माझ्या आठवण सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती.सुर्य मावळत होता मला खाली जावे लागणार होते. मी डोंगरावरून खाली उतरायला केलीच पण थोड दुर गेल्यावर थांबलो झाडाकडे वळून पाहीले.आणी म्हटलं "आता आपली भेट कधी हेईल देव जाणे" आणी सरसर डोंगरावरून उतरत होतो.
सर्व पक्षी आपआपल्या घरट्यात परतले होते.त्यामुळे सकाळीसारखी किलबिल ऐकू येत नव्हती.वातावरण शांत झालं होत मी डोंगराच्या पायथ्याशी आलो . एका नदीच्या पुलावर उभ राहून मंद गतीने वाहणार्या पाण्याकडे पाहत होतो.पण तेवढ्यात आठवले कि संध्याकाळी राहायचं मी विचारात पडलो आणी लॉजच्या शोधात त्या ठाणे शहराच्या चढ-उतार असणार्या गल्यातून नगरात प्रेवश केला.परिक्षा केंदाजवळ एखादी लॉज करून राहायते ठरवले.पण तेथे एकपण लॉज नव्हता तो सर्व परिसर पालथा घातला तरी पण लॉज सापडत नव्हता पाहता पाहता खुप दुरवर आलो होतो.तेव्हा कुठं मला त्या सांयकाळच्या प्रहरी एक लॉज दिसला मी लॉजच्या इमारतीत प्रवेश केला.समोर स्वागत कक्षा दिसला मी त्याच्याकडे गेलो रूम विषय चौकशी केली.
मी स्वागत कक्षात पोहचलो आणी विचारले एक रूम पाहिजे रात्रभर राहणयासाठी त्यावर स्वागत कक्षातला तो व्यक्ति म्हणाला कि,सोबत कोण आहे ? मला संमजलच नाही मी म्हणालो मी एकटाच आहे.स्वागत कक्षतला व्यक्ती म्हणाला "माफ करा सर आम्ही सिंगलला रूम देत नाही." तरी पण तुम्हा राहयचे असेलच तर दुप्पट पैसे देऊन राहू शकता मी त्याना विचारले दुप्पट पैसे म्हणजे नेमके किती पैसे द्यावे लागतील. त्यावर तो म्हणाला कि १२००।- रू देऊन तुम्ही रात्रभर राहू शकता.मला कळाल की हे आपल्या अंदाजपत्रकाबाहेर आहे. मी त्याना म्हणालो "माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद पण हे माझ्या बजेट बाहेर आहे.आणी मी लॉजच्या बाहेर आलो.रस्तेवरून चालू लागलो समोरून एक वृध्द व्यक्ति येत होता.मी त्याना विचारले की जवळपास कुठे लॉज आहे का ? त्यावर तो वृध्द म्हाणाला की "बाळा या परीसरात एकच लॉज आहेे."मी विचारलं कुठ ते म्हाणाले तुझ्या मागची इमारत मी वळून पाहिल आणी म्हटलं मी तेथे जाऊन आलोय आणखी दुसरा नाही का ? मग ते म्हणाले नाही आणी ते निघुन गेले.मी गोंधळून गेलो मला राहीच सुचत नव्हत माझ्यासमोर सर्वात मोठी प्रश्न पडला की,रात्रभर राहायचे कुठं ?
AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)
Submitted by Siddharth Pradhan on 21 June, 2018 - 10:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
उत्सुकता लागलीये...
छान लिहिताय..
छान !
छान !
धन्यवाद मेघा,आंनद
धन्यवाद मेघा,आंनद
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे... पुढचा भाग लवकर टाका....
छान लिहिताय
छान लिहिताय
लिखाण प्रकाशित झाल्यावर ठराविक मुदत मिळते संपादन ऑप्शनसाठी. त्या कालावधीआधी थोडेफार टाइपो झालेत ते दुरुस्त करून घ्या.
khup chhan!waiting for next
khup chhan!waiting for next part