हाय!!!

Submitted by अक्षय. on 18 June, 2018 - 22:19

हाय!!!
अरेंज मॅरेज ठरवून केलेला विवाह/लग्न/हातकडी सोहळा. वेळ बदलली, काळ बदलला, अगदी बघण्याची पद्धत ही बदलली पण तरीही तो नाजूक क्षण ती हुरहूर कायमच आहे. हल्ली बायोडाटा आधिच एक्सचेंज होतो. फेसबुकवर प्रोफाइल बघितलं जातं. पाऊट काढलेल्या सेल्फी असतील किंवा कुठेतरी लटकलेला फोटो यावरून साधारण मत ठरवलं जातं. मग होतो प्रॉपर पोह्यांचा कार्यक्रम. अरेंज मॅरेज मध्ये हा भेटीचा पहिलाच क्षण, फोटो मध्ये बघणं वेगळं आणि ते रूप सामोरासमोर बघणं वेगळं. अवघडल्या सारखं बसणं, चोरून एकमेकांना बघणं, चोरटा कटाक्ष वगैरे. ह्यानंतर होकार ह्या होकारा नंतर सुरू होतो दुसरा पार्ट. त्याच्याकडे तिचा नंबर न्हवता तिच्याकडे त्याचा नंबर नाही. मग पुन्हा फेसबुक इन्स्टा वरती एकमेकांना शोधा, मग तिने कुठल्यातरी हिरॉईन चा फोटो लावलेला असणार आणि तिला तो सापडणार पण लाजून ती रिक्वेस्ट पाठवत नाही. शेवटी तोच रिक्वेस्ट पाठवतो तीही पटकन ऍक्सेप्ट करते. मग सुरू होतो पहिल्या मेसेजचा खेळ. प्रत्येकवेळी मेसेंजर उघडला की शी इस अवैलेबल नौ पॉप अप होत आसतं, पण मेसेज काय पाठवायचा ह्यावर घोडं अडतं. कविता पाठवू का एखादी
एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू सार्‍यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू…
काय हे काय वाटेल तिला एकदाच भेटलायस आणि लगेच काय रात्री स्वप्नांत भेटली. काहीतरी वेगळं बरं हे पाठवतो...
पाहिले ज्याने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता
चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता
शीट यार काहीही काय कोणी कविता पाठवतं का पहिला मेसेज? नाही, मग काय मनाचा गोंधळ झालेला, सगळी मनं काहीही सुचवत होती. हे पाठवू काय बंटाई क्या करेली है! अरे ती फक्त मुंबईची मुलगी आहे, टपरीवरचा भाई न्हवे. काय चाललंय? काहीही काय सुचवताय? बस आता कोणीही काहीही बोलणार नाहीये माझं ठरलंय काय करायचा पहिला मेसेज. भरपूर टाईप डिलीट, टाईप डिलीट करून फायनली त्याने तिला पहिला मेसेज केला.....
हाय!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान छान!!!
कोणी भेटली की काय... Lol

पाफा, परीताई, मेघा., च्रप्स, आनंद, शाली, सायू, किल्लीताई आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अक्ष्या लेका,
फूडं सरकले की नाही काही? त्या शेरलॉक सारखं तोंडात तमाखूची गुळणी धरून बसू नको. Rofl

व्हयकी ओ,
म्हणटलं आजकल उसाची शेती बी कमी हून राहिलीय नव्हं !