तुझ्या चष्म्यातुनी मी सांग का माझ्याकडे पाहू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 June, 2018 - 09:49

प्रवाहाला बदलण्याचा कशाला यत्न करते तू ?
जिथे उतरंड ही, तेथेच पाणी लागते वाहू

तुझ्या शहरात आल्यावर नव्याने हे कळाले की,
मनामध्ये कुणाच्याही कुणी नाही शकत राहू

खुरटलेल्या पिकाला दोष द्यावा तर कसा द्यावा ?
बियाणे पेरले तिथली जमिन नव्हतीच उपजावू

कुणाला दुःख देताना जराशी काळजी ही घे
दिले आहेस ते व्याजासकट होणार परतावू

विनाकारण मला भेटायचे असल्यास नक्की ये
सकारण मीच आहे लागले हल्ली मला टाळू

मनाचा कोपरा अन् कोपरा मी जाणते माझ्या
तुझ्या चष्म्यातुनी मी सांग का माझ्याकडे पाहू ?

( टिप - गैरमुरद्दफ़ स्वरकाफिया )

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< प्रवाहाला बदलण्याचा तुझा आटापिटा चालू
जिथे उतरंड ही, तेथेच पाणी लागते वाहू >>>
...
कविता प्रसवण्याचा तुझा आटापिटा चालू
शोधत होतो कणसातले मोती, पण पदरी पडले गहू
...
सॉरी सुप्रियातै, यावेळी नाही पटले.

प्रवाहाला बदलण्याचा कशाला यत्न करते तू ?
उताराच्या दिशेने ऐक पाणी लागते वाहू

तुझ्या शहरात आल्यावर नव्याने हे कळाले की,
मनामध्ये कुणाच्याही कुणी नाही शकत राहू

खुरटलेल्या पिकाला दोष द्यावा तर कसा द्यावा ?
बियाणे पेरले तिथली जमिन नव्हतीच उपजावू

कुणाला दुःख देताना जराशी काळजीही घे
दिले आहेस ते व्याजासकट होणार परतावू

विनाकारण मला भेटायचे असल्यास नक्की ये
सकारण मीच आहे लागले हल्ली मला टाळू

मनाचा कोपरा अन् कोपरा मी जाणते माझ्या
तुझ्या चष्म्यातुनी मी सांग का माझ्याकडे पाहू ?

हवे असल्यास घे हातामधे हे हात माझे तू
जगाच्या घोळक्यामध्ये कदाचित हरवले जावू

असे वागू तसे वागू .... कसे नक्की कसे वागू ?
तुझ्या पश्चात फुललेल्या ऋतूंना जाब चल मागू

तुझ्या नजरेतला परकेपणा सांगून जातो की,
खरोखर केवढा असतो सुखी माणूस विसराळू !

घराचा उंबरा ओलांडताना खेचतो मागे
जगाच्या शर्यतीमध्ये शकत होते पुढे धावू !

( गैरमुरद्दफ स्वरकाफिया योजलेली गझल )

सुप्रिया